– राज चिंचणकर
भारतीय हवाई दलाने आतंकवादी तळावर जी कारवाई केली, त्याने प्रत्येक भारतीयाची मान उंचावली आहे. या पार्श्वभूमीवर आम्ही आमचा ‘छत्रपती शासन’ हा चित्रपट भारतीय सैन्यदलाला समर्पित करत आहोत, अशी घोषणा या चित्रपटाचे दिग्दर्शक खुशाल म्हेत्रे यांनी या चित्रपटाच्या संगीत अनावरणाचे औचित्य साधून केली. छत्रपती शिवाजी महाराज हे आपल्या रक्तात आणि हृदयात आहेत; मात्र ते आपल्या मेंदूत कधी पोहोचणार, असा सवाल करत छत्रपती शिवरायांच्या विचारांची पूजा होणे आज गरजेचे असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले. या चित्रपटातून उपलब्ध होणाऱ्या निधीतील दहा टक्के निधी आम्ही सैन्यदलाकडे सुपूर्द करणार आहोत, असे या टीमच्या वतीने सांगण्यात आले.

संतोष जुवेकर, किशोर कदम, अभिजित चव्हाण, प्रशांत मोहिते, अनिल नगरकर, सायली काळे, प्रथमेश जोशी, श्रेयसचंद्र गायकवाड, विष्णू केदार, पराग शाह, अभय मिश्रा, धनश्री यादव, किरण कोरे, राहुल बेलापूरकर, सायली पराडकर, रामचंद्र धुमाळ, मिलिंद जाधव, जयदीप शिंदे आदी कलाकारांनी या चित्रपटात भूमिका साकारल्या आहेत. १५ मार्च रोजी हा चित्रपट पडद्यावर येणार आहे.
Leave a Reply