
दीपावलीच्या सणाने अंतिम चरण गाठला असला, तरी मराठी पडद्यावरची दिवाळी पुढेही सुरु राहणार आहे; कारण १ नोव्हेंबर रोजी रुपेरी पडद्यावर भाऊबीजेची ओवाळणी केली जाणार आहे. हे कसे काय शक्य आहे, हे अनुभवण्यासाठी मात्र या दिवशी प्रदर्शित होणाऱ्या ‘खारी बिस्कीट’ या चित्रपटाची वाट पाहावी लागणार आहे. लहानग्या भाऊ-बहिणीचे विश्व या चित्रपटात उलगडले गेले असून, त्यांच्या नात्यातल्या गोडव्याची पखरण या चित्रपटात दिसणार आहे.
अवघ्या पाच वर्षांची गोंडस मुलगी आणि तिचा आठ वर्षांचा भाऊ, यांची कहाणी या चित्रपटात दिसणार आहे. वेदश्री खाडिलकर आणि आदर्श कदम ही लहानगी जोडगोळी या चित्रपटात चमकत आहे. त्यांच्यासह सोहम जाधव, स्वानंद शेळके, शर्व दाते या बच्चेमंडळीच्या सोबत नंदिता पाटकर, सुयश झुंझुरके आणि संजय नार्वेकर यांच्या या चित्रपटात भूमिका आहेत. आता या चित्रपटाला ‘खारी बिस्कीट’ असे शीर्षक का दिले असावे, हे मात्र गुलदस्त्यात आहे. ‘झी स्टुडिओज’ आणि ‘ड्रीमिंग ट्वेन्टी फॉर सेव्हन’ यांनी चित्रपटाची निर्मिती केली आहे.
Leave a Reply