– राज चिंचणकर
एका डॉक्युमेंट्रीच्या दृष्टिकोनातून समाजात घडणा-या वास्तववादी घटनांचा वेध घेत एक सत्य मांडण्याचा प्रयत्न ‘अन्य’ या चित्रपटाच्या माध्यमातून करण्यात आला आहे. मराठीसह हिंदी भाषेतही हा चित्रपट निर्माण होत आहे. मार्च महिन्यात हा चित्रपट पडद्यावर येत आहे.

सिम्मी जोसेफ हे दाक्षिणात्य दिग्दर्शक या चित्रपटाद्वारे मराठीसह हिंदीमध्ये पदार्पण करत आहेत. दिग्दर्शनासोबतच त्यांनी या चित्रपटाची कथा व पटकथा लिहिली आहे. अतुल कुलकर्णा, प्रथमेश परब, भूषण प्रधान, तेजश्री प्रधान, कृतिका देव, सुनील तावडे या मराठमोळ्या कलाकारांसह हिंदी पडद्यावरील अभिनेत्री रायमा सेन या चित्रपटात भूमिका करत आहे. तसेच गोविंद नामदेव आणि यशपाल शर्मा हे विशेष भूमिकांमध्ये दिसणार आहेत.
Leave a Reply