– राज चिंचणकर
सध्या मराठी चित्रपटसृष्टीत ‘बोनस’ या चित्रपटाची चर्चा जोरात आहे. गश्मीर महाजनी आणि पूजा सावंत हे दोघे कलाकार या चित्रपटाच्या निमित्ताने प्रथमच रुपेरी पडद्यावर एकत्र झळकत आहेत. महत्त्वाचे म्हणजे, या चित्रपटाचे चित्रीकरण चक्क कोळीवाड्यात झाले आहे.

या चित्रीकरणाच्या निमित्ताने या चित्रपटाची संपूर्ण टीम कोळीवाड्यात अवतरली होती. साहजिकच, या चित्रपटाच्या माध्यमातून या कोळीवाड्याला आगळा ‘बोनस’ मिळाला आहे. आता या चित्रपटात नक्की काय आहे आणि त्याचा कोळीवाड्याशी नक्की काय संबंध आहे; ते २८ फेब्रुवारी रोजी चित्रपट प्रदर्शित झाल्यावर समजेलच.
गश्मीर आणि पूजा या जोडीसह या चित्रपटात जयवंत वाडकर यांचीही महत्त्वाची भूमिका आहे. या विषयी बोलताना जयवंत वाडकर म्हणतात, माझ्या जडणघडणीत कोळीवाड्याचा मोठा वाटा आहे; त्यामुळे या चित्रपटाशी मी खूपच रिलेट झालो.
हापूस, ताऱ्यांचे बेट, हृदयांतर, चुंबक अशा गाजलेल्या मराठी चित्रपटांच्या पटकथा लिहिणारा सौरभ भावे याने ‘बोनस’ या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. आता सौरभ भावेला हा चित्रपट ‘बोनस’ देणार का, याची सर्वांना उत्सुकता लागली आहे.
Leave a Reply