– राज चिंचणकर
नाटक, चित्रपट, मालिका अशा विविध प्रातांत मुशाफिरी करणारा अभिनेता सागर कारंडे आता ‘इशारों इशारों में’ हे नवीन नाटक घेऊन रंगभूमीवर अवतरला आहे. सागर कारंडे म्हटले की रसिकांच्या डोळ्यांसमोर त्याच्या ज्या भूमिका येतात, त्यापेक्षा वेगळी भूमिका त्याने या नाटकात रंगवली आहे. या नाटकाच्या निमित्ताने अभिनेत्री संजना हिंदूपूर हिच्यासोबत सागरची जोडी जमली आहे. उमेश जगताप यांचीही या नाटकात महत्त्वाची भूमिका आहे.

या नाटकाचे मराठी रूपांतर स्वप्नील जाधव यांनी केले आहे. जय कपाडिया यांचे दिग्दर्शन या नाटकाला लाभले असून, अजय कासुर्डे यांनी या नाटकाची निर्मिती केली आहे. ‘सरगम क्रिएशन’ या संस्थेतर्फे हे नाटक रंगभूमीवर आले आहे. नेहमीच्या परिचयाच्या विषयांपेक्षा वेगळा विषय या नाटकाद्वारे या टीमने हाताळला आहे.
Leave a Reply