झी5’ ची नक्षलवादावरील आगामी ऍक्शन-थ्रीलर मालिका ‘नक्सल’च्या चित्रिकरणाला होणार लवकरच सुरुवात

भारतातील अस्सल कार्यक्रमांची निर्मिती करणारी सर्वात मोठी व आघाडीची कंपनी ‘झी5’ने ‘नक्सल’ या दमदार अॅक्शन-थ्रीलरमधील कलाकारांची घोषणा केली आहे. राजीव खंडेलवाल (राघव), टीना दत्ता (केतकी), आमीर अली (केसवानी), श्रीजीता डे (प्रकृती) आणि सत्यदीप मिश्रा (पहन) हे कलाकार या मालिकेमध्ये दिसणार आहेत. या मालिकेच्या चित्रिकरणाला निर्माते लवकरच सुरुवात करणार आहेत. त्यासाठी कोविड-१९च्या पार्श्वभूमीवर योग्य आणि कठोर असे सुरक्षा उपाय योजले जाणार आहेत.

IMG-20200624-WA0001

अॅक्शनने भरलेली ही आठ भागांची मालिका काल्पनिक कथेवर अवलंबून असून यात ‘नक्सल’ चळवळीविरोधात लढणाऱ्या एका योद्ध्याची कथा साकारण्यात आली आहे. राघवसाठी (राजीव खंडेलवाल) ही काळाच्या विरोधातील लढाई आहे. राघव हा एक पोलीस अधिकारी आहे आणि तो सर्व आव्हानांचा सामना करत लढतो आहे. महाराष्ट्रातील दाट जंगलांपासून महानगरांपर्यंत सर्वच अंगे व्यापणारी अशी ही मालिका असून ‘नक्सल’ चळवळ या दोन्ही वातावरणात कशी फोफावत चालली आहे, त्याचे चित्रण या मालिकेमध्ये घडणार आहे.

“कोविडच्या पार्श्वभूमीवर या मालिकेतील कलाकार आणि तंत्रज्ञ यांच्यात फार मोठ्या प्रमाणावर बदल केले गेले आहेत. पण सरतेशेवटी यात निवडण्यात आलेले सर्वच कलाकार व तंत्रज्ञ हे खूपच ताकदीचे आहेत. आमीर, सत्यदीप, टीना आणि इतर कलाकारांबरोबर काम करण्यास मी अत्यंत उत्सुक आहे. त्यांच्यापैकी एकाहीबरोबर मी अद्याप काम केलेले नाही. त्यामुळे उत्सुकता अधिकच वाढली आहे. या मालिकेसाठी आम्ही संहितावाचन केले आहे. या काळात मी माझ्या व्यक्तिरेखेवर काम केले आहे. मला असे वाटते की माझ्या चाहत्यांसाठी ही एक मेजवानी असेल, कारण त्यांनी आत्तापर्यंत मला यासारख्या व्याक्तीरेखेमध्ये कधीही पाहिलेले नाही. ‘एसटीएफ’ एजंटची माझी व्यक्तिरेखा ही प्रेक्षकांना चकित करून जाईल. कारण या व्यक्तिरेखेला खूप कंगोरे आहेत. विनोदी अंदाजात सुरुवात होवून ही व्यक्तिरेखा अॅक्शनपर्यंत विविध अंगाने जाते. त्याचवेळी अनेक भावनिक छटाही तिच्याशी जोडल्या गेल्या आहेत आणि त्या संपूर्ण मालिकेत पुढे येतात,” असे उद्गार ‘‘नक्सल’’ मधील प्रमुख भूमिका साकारणारा राजीव खंडेलवाल म्हणतो.

“झी5’बरोबर या अत्यंत महत्वाच्या अशा वेबसिरीजवर काम करण्याची उत्कंठा लागली आहे. आज भारतामध्ये जे काही घडत आहे, त्याच्याशी सुसंगत अशीच ही मालिका आहे. आज देशाला जी गोष्ट पोखरत आहे, अशा कथेवर ही मालिका बेतली आहे. पण त्याचवेळी त्यातून पूर्ण मनोरंजन होईल, याची काळजी घेतली गेली आहे. राजीव खंडेलवाल यांची या मालिकेत प्रमुख भूमिका आहे.

‘‘नक्सल’’ काही महिन्यांनी केवळ ‘झी5’वर प्रदर्शित होणार आहे.
IMG-20200624-WA0000

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Create a website or blog at WordPress.com

Up ↑

<span>%d</span> bloggers like this: