झी5’ ची नक्षलवादावरील आगामी ऍक्शन-थ्रीलर मालिका ‘नक्सल’च्या चित्रिकरणाला होणार लवकरच सुरुवात

भारतातील अस्सल कार्यक्रमांची निर्मिती करणारी सर्वात मोठी व आघाडीची कंपनी ‘झी5’ने ‘नक्सल’ या दमदार अॅक्शन-थ्रीलरमधील कलाकारांची घोषणा केली आहे. राजीव खंडेलवाल (राघव), टीना दत्ता (केतकी), आमीर अली (केसवानी), श्रीजीता डे (प्रकृती) आणि सत्यदीप मिश्रा (पहन) हे कलाकार या मालिकेमध्ये दिसणार आहेत. या मालिकेच्या चित्रिकरणाला निर्माते लवकरच सुरुवात करणार आहेत. त्यासाठी कोविड-१९च्या पार्श्वभूमीवर योग्य आणि कठोर असे सुरक्षा उपाय योजले जाणार आहेत.

IMG-20200624-WA0001

अॅक्शनने भरलेली ही आठ भागांची मालिका काल्पनिक कथेवर अवलंबून असून यात ‘नक्सल’ चळवळीविरोधात लढणाऱ्या एका योद्ध्याची कथा साकारण्यात आली आहे. राघवसाठी (राजीव खंडेलवाल) ही काळाच्या विरोधातील लढाई आहे. राघव हा एक पोलीस अधिकारी आहे आणि तो सर्व आव्हानांचा सामना करत लढतो आहे. महाराष्ट्रातील दाट जंगलांपासून महानगरांपर्यंत सर्वच अंगे व्यापणारी अशी ही मालिका असून ‘नक्सल’ चळवळ या दोन्ही वातावरणात कशी फोफावत चालली आहे, त्याचे चित्रण या मालिकेमध्ये घडणार आहे.

“कोविडच्या पार्श्वभूमीवर या मालिकेतील कलाकार आणि तंत्रज्ञ यांच्यात फार मोठ्या प्रमाणावर बदल केले गेले आहेत. पण सरतेशेवटी यात निवडण्यात आलेले सर्वच कलाकार व तंत्रज्ञ हे खूपच ताकदीचे आहेत. आमीर, सत्यदीप, टीना आणि इतर कलाकारांबरोबर काम करण्यास मी अत्यंत उत्सुक आहे. त्यांच्यापैकी एकाहीबरोबर मी अद्याप काम केलेले नाही. त्यामुळे उत्सुकता अधिकच वाढली आहे. या मालिकेसाठी आम्ही संहितावाचन केले आहे. या काळात मी माझ्या व्यक्तिरेखेवर काम केले आहे. मला असे वाटते की माझ्या चाहत्यांसाठी ही एक मेजवानी असेल, कारण त्यांनी आत्तापर्यंत मला यासारख्या व्याक्तीरेखेमध्ये कधीही पाहिलेले नाही. ‘एसटीएफ’ एजंटची माझी व्यक्तिरेखा ही प्रेक्षकांना चकित करून जाईल. कारण या व्यक्तिरेखेला खूप कंगोरे आहेत. विनोदी अंदाजात सुरुवात होवून ही व्यक्तिरेखा अॅक्शनपर्यंत विविध अंगाने जाते. त्याचवेळी अनेक भावनिक छटाही तिच्याशी जोडल्या गेल्या आहेत आणि त्या संपूर्ण मालिकेत पुढे येतात,” असे उद्गार ‘‘नक्सल’’ मधील प्रमुख भूमिका साकारणारा राजीव खंडेलवाल म्हणतो.

“झी5’बरोबर या अत्यंत महत्वाच्या अशा वेबसिरीजवर काम करण्याची उत्कंठा लागली आहे. आज भारतामध्ये जे काही घडत आहे, त्याच्याशी सुसंगत अशीच ही मालिका आहे. आज देशाला जी गोष्ट पोखरत आहे, अशा कथेवर ही मालिका बेतली आहे. पण त्याचवेळी त्यातून पूर्ण मनोरंजन होईल, याची काळजी घेतली गेली आहे. राजीव खंडेलवाल यांची या मालिकेत प्रमुख भूमिका आहे.

‘‘नक्सल’’ काही महिन्यांनी केवळ ‘झी5’वर प्रदर्शित होणार आहे.
IMG-20200624-WA0000

लॉकडाऊन मधील घरगुती हिंसेवर डॉक्टर डॉन सांगतोय त्याचा फंडा !!

 

कोरोना आणि हे सुरु असलेले लॉक डाऊन आता लोकांना सवयीचे झाले आहे अर्थात लवकरच हे सर्व संपेल आणि एक नवीन आनंदी सुरुवात सर्वांनाच करायला मिळेल . अनेक नवीन चांगल्या गोष्टी सुरु होतीलच मात्र त्यासाठी आता या वेळेला सर्वांनीच एकमेकांशी चांगलं वागणं महत्वाचं आहे . लोकडाऊन आणि वर्क फ्रॉम होम मुळे कौटुंबिक हिंसाचार वाढल्याची धक्कादायक माहिती सध्या सर्वत्र पाहायला मिळत आहे .यासाठी आता झी युवा वाहिनीवरील डॉक्टर डॉन या मालिकेतील देवा म्हणजेच देवदत्त नागे एक विशेष कविता घेऊन आला आहे.

घरगुती हिंसाचार ह्याविषयी कोणीही काहीच बोलत नसले तरीही हा विषय खरंच गंभीर आहे. आणि अनेक घरात हा सुरु आहे .सर्वच जाती, धर्म आणि वर्गातील बायकांवर हिंसाचार होताना दिसतो. घरातील हिंसाचारामुळे बायकांना शारीरिक आणि मानसिक ञास आणि वेदना गप्प बसून सहन कराव्या लागतात. बायकांनी या गप्प बसा संस्कृतीचा आपल्या आयुष्याचा एक भाग मानला आहे. याला छेद देऊन आज पुढे येण्याची गरज आहे . मारहाण हे स्ञियांवरील हिंसेचं उघड रूप आहे, पण फक्त मारहाण म्हणजे हिंसा नाही. मानसिक जाच, शिवीगाळ, अपमानकारक, हीन वागणूक, लैंगिक छळ, जबरदस्तीने शारीरिक संबंध, छेडछाड ही देखील हिंसाच आहे. त्यामुळे देवा ने अगदीच हलक्या फुलक्या अंदाजात या लॉक डाऊन मध्ये घरात अडकलेल्या जोडप्यावर कविता केली आहे. तर तुम्हाला ही कविता कशी वाटते ते देवाला त्याच्या सोशल मीडिया अकाउंट द्वारे कळवा.

WhatsApp Image 2020-05-12 at 10.39.12

हि श्टोरी हाये घरात अडकलेल्या एका जोडीची खरंतर काही घरातल्या डोमेस्टिक वोईलन्स ची

सर्वाना माहीतेय की जगात सर्वत्र पसरला आहे कोरोना
पण आपल्या या काही जोडीचं मात्र रोजच चालू आहे रोना नि धोना..

पण इलाज काय? ह्यांचं मॅटर म्हणजे तुझं माझं जमेना आणि तुझ्या वाचून करमेना…

पण डॉक्टर डॉन म्हणतो हा लय महत्वाचा हाये टाईम…
जर समजून नाय घेतलं एकमेकांना, तर व्हावं लागेल दूर एकमेकांपासून टोटल काॅरंटाईन .

आता लग्न केलंत तर प्रेम पण करायचं लय , काळजी घ्यायची भारी…
कोरोनाशी लढायची करायची एकत्र तयारी..
अहो घ्या सबुरीने सध्या, सरकार करतेय त्यांचं काम ते आपलं काम थोडं हाये..
मग देवा भाई तुमाला पण बोलेल , श्रीखंड लय गोड हाये…

देवा भाई बोलतो घरात नाय नडायचं , मॅटर करा सर्व क्लोज..
ही वेळ आहे एकमेकांना सांभाळायची , भांडण काय हे संपल्यावर करू शकता दररोज !

घरात रहा सेफ , कारण बाहेर पडला तो खपला..
प्रेम करा , टेक केअर करा आणि बघा झी युवा आपला !

आणि सोनाली ला रडू कोसळले !

सध्या कोविड लॉक डाउन मध्ये आज आपल्याला आपले जवळचे मित्र मैत्रिणी यांना भेटायला सुद्धा मिळत नाही. पण आपल्या आयुष्यात अशा अनेक जवळच्या व्यक्ती असतात ज्यांना आपण विसरून जातो किंवा त्या आपल्यापासून एवढ्या लांब जातात की त्यांच्याशी आपल्याला कोणताच संबंध ठेवता येत नाही. त्या लोकांनी एखाद्या काळात आपल्याला प्रेम दिलं असत , माया केलेली असते , महत्वाचे सल्ले दिलेले असतात आणि कदाचित आपणच त्याला महत्व दिलेले नसते .

 

IMG-20200508-WA0000

कधी ना कधी या सर्व गोष्टींची आपल्याला आठवण होते आणि त्या गोष्टींचे महत्व समजते पण तेव्हा ती वेळ निघून गेली असते. नुकतेच इरफान खान आणि ऋषी कपूर सारखे दिग्गज कलाकार वेळेआधी सर्वाना सोडून निघून गेले आणि सोनालीला तिच्या एका अशाच वेळे आधी सोडून गेलेल्या जवळच्या मैत्रिणीची आठवण आली रडू कोसळले .  शुक्रवारी ८ मे ला मैत्री किती घट्ट आणि प्रत्येकाच्या आयुष्यात किती महत्वाची असते , आणि योग्य वेळी त्या मैत्रीला त्याचे महत्व देणं हे किती छान असतं हे सोनाली कुलकर्णी हॅशटॅग कन्टेक्ट च्या साहाय्याने तिच्या प्रेक्षकांना *हब हॉपर* या ऍप वर पॉडकास्ट च्या साह्यायाने सांगणार आहे .सोनाली ची अशी ही इमोशनल बाजू ऐकण्याची संधी आपल्याला या पॉडकास्टमुळे मिळणार आहे.

जुन्या आठवणींना उजाळा….

सध्याच्या लॉकडाऊनमुळे सारेच घरात राहिलेत आणि या वेळेचा खूप चांगल्या पद्धतीने वापर करत आहेत. काही कलाकार घर बसल्या योगा आणि त्याचे फायदे यांबद्दल आपल्याला सांगत आहे. तर काही कलाकार कुकिंगचे धडे गिरवत आहे.

 

bharat

 

 

 

आपल्या विनोदाने सर्वांचे मन जिंकणारा आपला लाडका भारत जाधव सध्या त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर जुन्या आठवणींना उजाळा देतोय. ८० -९० च्या दशकात अंकुश चौधरी, केदार शिंदे, मकरंद अनासपुरे, संजय नार्वेकर यांच्या सोबतचे काही फोटो त्याने शेअर केले आहेत.

 

 

 

 

 

एक हात मदतीचा… अभिनेता आशुतोष गोखले जपतोय सामाजिक बांधिलकी

कोरोना नामक संकट जगावर आलं आणि घड्याळाच्या काट्यावर धावणाऱ्या आपल्या प्रत्येकाच्या आयुष्याला कुठेतरी ब्रेक लागला. या आजाराची भीती प्रत्येकाच्याच मनात आहे. आजूबाजूचं वातावरण जरी नकारात्मक असलं तरी माणुसकीचं दर्शन घडवणाऱ्या घटना आयुष्याला नवी उभारी देतात. अभिनेता आशुतोष गोखले सध्याच्या कठीण काळात सामाजिक बांधिलकी जपण्याचा मनापासून प्रयत्न करतो आहे.

AASHUTOSH 2

स्टार प्रवाहवरील रंग माझा वेगळा या मालिकेतून कार्तिकच्या रुपात तो प्रेक्षकांच्या भेटीला आला. कोरोनाच्या संकटामुळे शूटिंग थांबलं असलं तरी आशुतोषने हाती घेतलंल काम अविरत सुरु आहे. खान चाहिए डॉट कॉम या संस्थेसोबत तो जोडला गेलाय. ही संस्था मुंबईतील बेघर आणि या कठीण काळात उपासमार होत असलेल्या गरजूंना जेवण पोहोचवण्याचं काम करते. गेल्या काही दिवसांपासून आशुतोष या संस्थेसाठी स्वयंसेवक म्हणून काम करतोय. ही संस्था दररोज ७५ हजारांहून अधिक फूड पॅकेट्सचं वाटप करते. आशुषोत दररोज वांद्रे ते दहिसर लिंक रोड, ओशिवरा, जुहू, गोरेगाव अश्या भागातील गरजूंना अन्न पोहोचवतो. अर्थात सरकारने सांगितलेल्या सर्व नियमांचं पालन करत आणि आवश्यक ती काळजी घेत आशुतोष हे काम नित्यनेमाने करतो.

AASHUTOSH 1

या उपक्रमाविषयी सांगताना आशुतोष म्हणालाआपण ज्या समाजात रहातो त्या समाजाचं देणं लागतो. याच जाणीवेतून हा उपक्रम हाती घेतला. समाजभान जपण्याची ही एक चांगली संधी आहे. माझ्या कुटुंबियांचा देखिल मला पाठिंबा आहे. कोरोनाचा संकट लवकरच सरेल आणि पुन्हा शूटिंगला सुरुवात होईलच. पण सध्या वेळ सत्कार्णी लागत असल्याचा आनंद आहे.

 

सुमित राघवन आणि ऋता दुर्गुळे घेऊन येतायत स्ट्रॉबेरी शेक

ज्या लघुपटाची म्हणजेच शॉर्टफिल्म ची संपूर्ण महाराष्ट्र वाट पाहत होता ती अवॉर्ड विनिंग शॉर्टफिल्म ‘स्ट्रॉबेरी शेक’ सुद्धा बुधवार १५ एप्रिल पासून झी ५ वर पाहायला मिळणार आहे. अष्टपैलू अभिनेता सुमीत राघवन आणि ऋता दुर्गुळे यांची एक वेगळी केमिस्ट्री आपल्याला पहायला मिळणार आहे.

IMG-20200413-WA0000

‘स्ट्राबेरी शेक’ ही गोष्ट आहे कूल बाबा आणि त्यांच्या हुशार चिऊची. आजच्या पिढितील प्रत्येक आईबाबांना आणि त्यांच्या पिल्लांना ही गोष्ट त्यांची वाटेल यात शंकाच नाही. जेव्हा एक नॉर्मल बाबा आपल्या चिऊ साठी एक ‘कूल’ बाबा बनण्याचा प्रयत्न करतो आणि त्याची चिऊ म्हणजे मुलगी सरळ तिच्या बॉयफ्रेंडलाच घरी घेऊन बाबा समोर उभी करते तेव्हा त्या ‘कूल’ बाबाची उडणारी तारांबळ आणि पुढे घडणाऱ्या घटना प्रेक्षकांना खिळवून ठेवतात. अभिनेता सुमीत राघवन यांनी हा बाबा अतिशय कमाल रंगवला आहे. त्याचबरोबर अभिनेत्री ऋता दुर्गुळे हिने एक अतिशय गोड पण त्याचबरोबर स्पष्टवक्ती मुलीचे पात्र खूप सुंदर रित्या दाखवले आहे. लेखक व दिग्दर्शक शोनील यल्लातीकर याची ही व्यवसायिक दुसरी फिल्म असून त्याची विषयावरची घट्ट पकड आणि दिग्दर्शनातील बारकावे या फिल्म मधून प्रेक्षकांना पहायला मिळतील. ऋता च्या बॉय फ्रेंड ची भूमिका रोहित फाळके या गुणी अभिनेत्याने उत्तमरीत्या केली आहे.

IMG-20200413-WA0001

आपल्या भूमिकेबद्दल सुमीत राघवन म्हणाले ,  ‘मला यंग एनर्जी बरोबर काम करायला खूप आवडतं कारण त्यांची कल्पना शक्ती कमाल असते . शोनील खूप फोकस्ड असल्याने आणि स्टोरी मला आवडल्याने मी या कामाला होकार दिला. त्याचबरोबर ऋताशी एक कलाकार म्हणून सुद्धा सूर उत्तम जुळला. मला वाटते मुलांबरोबर संवाद होणं खूप महत्वाचं असतं आणि हेच आम्ही या स्ट्रॉबेरी शेक द्वारें दाखवण्याचा प्रयत्न करत आहोत. ऋता म्हणते,  ही शॉर्टफिल्म निवडताना नाही बोलण्याचा प्रश्न नव्हता. उत्तम गोष्ट , शोनील सारखा एक उत्तम लेखक आणि दिग्दर्शक , सुमीत सरांसारखे एक दिग्गज अभिनेते तुमच्या समोर असल्यावर एका कलाकाराला आणखी काय हवे ? आणि विषय – ‘ स्ट्राबेरी शेक’ ही आजची गोष्ट आहे. आजच्या पिढीला खूप काही सांगायचं आहे, आजच्या पिढी कडे स्वतःचे निर्णय स्वतः घेण्याची क्षमता आहे. मात्र त्याचबरोबर पालकांची साथ सुद्धा त्यांना हवी आहे. मात्र त्यासाठी सध्या घरात संवाद होत नाहीत. हेच आम्ही या शॉर्टफिल्म द्वारे दाखवण्याचा प्रयत्न करत आहोत.

१५ एप्रिल पासून स्ट्राबेरी शेकचा झी ५ वर पाहता येणार आहे.

‘हॉस्टेजेस’ वेब सीरिज १३ एप्रिलपासून प्रेक्षकांच्या भेटीला

लॉकडाऊनच्या काळात प्रेक्षकांसाठी मनोरंजनाचे नवनवे पर्याय घेऊन स्टार प्रवाह वाहिनी सज्ज आहे. १३ एप्रिलपासून रात्री १० वाजता स्टार प्रवाहवर भेटीला येणार आहे ‘हॉस्टेजेस’ ही वेब सीरिज. जगभरात नावाजलेल्या या वेबसीरिजचीं ‘हॉस्टेजेस’ ही भारतीय आवृत्ती आहे. हॉटस्टार स्पेशल्सने या वेबसीरिजची निर्मिती केली आहे. खास बात म्हणजे मराठी प्रेक्षकांना मराठीतून या वेबसीरिजचा आनंद घरबसल्या लुटता येणार आहे. सस्पेन्स थ्रीलर असणारी ही वेबसीरिज प्रेक्षकांची उत्कंठा वाढवेल यात शंका नाही.

HOSTAGES

हॉस्टेजेस ही संपूर्णपणे काल्पनिक गोष्ट आहे. ही गोष्ट आहे अश्या डॉक्टरची जिच्यावर मुख्यमंत्र्यांच्या शस्त्रक्रियेची जबाबदारी सोपवण्यात येते. मात्र शस्त्रक्रियेच्या आदल्या दिवशीच त्या डॉक्टरच्या संपूर्ण कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी देण्यात येते. कुटुंबाला वाचवायचं असेल तर मुख्यमंत्र्यांचा जीव वाचता कामा नये अशी अट त्या डॉक्टरसमोर ठेवण्यात येते. या द्विधा मनस्थितीत डॉक्टर आपल्या कर्तव्याला जागणार की कुटुंबाचा जीव वाचवणार याची उत्कंठावर्धक गोष्ट म्हणजे हॉस्टेजेस ही वेबसीरिज.

‘हॉस्टेजेस’ १३ एप्रिलपासून रात्री १० वाजता फक्त स्टार प्रवाहवर प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे़.

सुट्टीत शिवा-सिद्धी काय करतायत??

सध्या मालिकांचे शूटिंग बंद असल्याने कलाकारांना बर्‍याच दिवसांनी खूप मोठी सुट्टी मिळाली आहे… पण सगळीकडेच जरा काळजीचे वातावरण असल्याने घरी बसणे अत्यावश्यक झाले आहे. गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळायचे, जिम – मॉल बंद असल्याने आता करणार तरी काय हा प्रश्न आपल्या सगळ्यांनाच पडला आहे… पण या मध्येच आपले लाडके कलाकार त्यांचे काही छंद जोपासताना दिसत आहेत… त्यामधील एक आहेत आपल्या सगळ्यांचे लाडके कलर्स मराठीवरील जीव झाला येडापिसा मालिकेतील सिद्धी – शिवा म्हणजेच विदुला आणि अशोक…

IMG-20200318-WA0018

आता ते आपआपल्या घरी परत गेले असून सिद्धीला झाडांची विशेष आवड आहे आणि त्यामुळेच ती आता काही वेळ झाडांची काळजी घेण्यामध्ये देणार आहे. झाडे लावा… झाडे जगवा असा संदेश आपण नेहेमीच सर्वांना देत असतो, विदुला देखील तिच्या प्रेक्षकांना हाच संदेश देणार आहे…

IMG-20200318-WA0017

       तर अशोक सध्या अवांतर वाचन, तब्येतेची विशेष काळजी घेणार आहे… ऐरव्ही शूटिंगमध्ये असल्याने काही गोष्टी करायच्या राहून जातात… बर्‍याचश्या गोष्टींकडे दुर्लक्ष होतं आता यानिमित्ताने या बाबींकडे लक्ष देण्यासाठी वेळ मिळाला आहे तर त्याकडे दुर्लक्ष होणार नाही याची काळजी घेणार आहे असे अशोक म्हणाला.

नाटक परीक्षण – Don’tt worry हो जाएगा   “अंतर्मुख करणारी नाट्यकृती”

माणूस म्हटला की त्याला अनेक अडचणींना सामोरे जावे लागते, त्याच्या जीवनात नेहमी चांगले वाईट असे प्रसंग घडत असतात.  त्यामधून मार्ग काढून तो आपले आयुष्य जगत असतो. कोणत्या वेळी कोणता प्रसंग समोर येईल हे त्याचे त्याला माहीत नसते.  आपले मित्र मंडळी नातेवाईक शेजारचे लोक कधी मदतीला येतील किंवा एखादा अनोळखी माणूस सुद्धा आपल्याला आधार देऊन कोणता चांगला मार्ग आहे असू शकतो.  समाजात जवळचे दूरचे हे कसे वागतील हे आपल्या स्वभावावर अवलंबून असतं.  अडचणीच्या वेळी शांतपणे विचार केला सकारात्मक भावना मनात आणली तर आपले काम सहज चांगले होऊ शकते.

IMG-20200217-WA0194

आपल्याला वाटते की  सगळ्या समस्या आपल्याच वाट्याला आलेल्या आहेत. बाकीचे सारे आनंदात जीवन जगत आहेत पण तसे आयुष्यात नसतं.  काहीजण आपल्या समस्या उघड करतात तर काही जण त्या कोणासमोर व्यक्त करीत नाहीत.  शेवटी सकारात्मकता मनात ठेवली तर चांगले मार्ग दिसायला लागतात.   अशा संकल्पनेवर ‘Dontt worry हो जाएगा’ हे नाटक आहे.

नाटकाचे कथानक एका चाळींमधील खोलीत घडतं. भास्कर कमलाबाई वाकडकर हा गृहस्थ चाळी मधल्या एका लहानशा खोलीत राहत असतो. आपले काम बरे की आपण बरं असे त्याचे आयुष्य सुरू असतानाच एक घटना घडते. त्या घटनेच्या दिवशी नेमकी त्या शहरात दंगल उसळलेली असते आणि त्यामुळे परिसरामधील सारं वातावरण भयभीत आणि संपूर्णपणे तणावाखाली असते, त्या चाळीचे  सेक्रेटरी चिकटे  आपल्या चाळींमधील लोकांना भेटून   धीर देण्याचा प्रयत्न करीत असतात आणि त्याच वेळी भास्कर ला भेटायला एक अनोळखी मुलगी त्याच्या घरात प्रवेश करते.  त्या मुलीचं नाव वीणा.  ही मध्यमवर्गीय कुटुंबातील असून ती विमा पॉलिसी एजंट आहे. तिला  आपले विमा पॉलिसी चे टार्गेट पूर्ण करायचं असतं त्यानिमित्ताने ती भास्कर यांना भेटायला येते. त्यांनी पॉलिसी घ्यावी अशी विनंती करते पण भास्कर तिला सांगतो मला पॉलिसी नको आहे आणि बाहेर दंगलीचे तणावाचे वातावरण असताना तुम्ही घराबाहेर पडला कशाला ? असा प्रश्न विचारतो  पण तिला गरज असते आपले टार्गेट पूर्ण करायचे असते.  त्याच सुमारास ती  रवि नावाच्या माणसाला सतत फोन करत असते. ती आपल्या घरीसुद्धा फोन करते.  रिपोर्ट आले का ? वगैरे विचारते हे सारे भास्करच्या घरातून चाललेले असते .

IMG-20200217-WA0197

 

    भास्कर त्याकडे जास्त लक्ष देत नाही पण  एक क्षण असा येतो की भास्करला तिला काही प्रश्न विचारावेसे वाटतात,  त्यावेळी ती त्याला विश्वासाने सारं काय घडले ते सांगून टाकते आणि एक गंभीर समस्या भास्कर समोर उभी राहते.  भास्कर हा स्वतः काही समस्येमध्ये असतो पण तो तिला माणुसकी म्हणून मदत करण्याचे ठरवतो आणि शेवटी तिला तो कशाप्रकारे मदत करतो. तिला नेमकी समस्या काय असते ?  ही समस्या कोणामुळे निर्माण झालेली असते ? आई-वडिलांना ती नेमकं काय सांगते ? या सगळ्यातून तिची सुटका कशी होते ? भास्कर ची सुद्धा नेमकी काय समस्या असते ? अशा अनेक भावनिक प्रश्नांची उत्तरे या नाटकात मिळतील.

भास्कर ची भूमिका संजय खापरे यांनी छान रंगवली आहे. या भूमिकेने मधील गंभीर आणि विनोदाचे बारकावे त्यांनी सादर केले आहेत .. वीणा ची भूमिका पूर्वा फडके हिने सादर केली आहे. तिची समस्या गंभीर आहे. भूमिकेमधील  बारीक-सारीक बारकावे यामधून ती छान व्यक्त झाली आहे.  या दोन्ही भूमिका मध्यमवर्गीय माणसाचे प्रतिनिधीत्व करतात.  चाळींमधील मधील सेक्रेटरी चिकटे ही भूमिका राहुल मोहिते आणि सौ चिकटेची भूमिका आसावरी ऐवळे   हिने सादर केली असून त्यांनी आपल्या भूमिकेला न्याय दिलेला आहे. गंभीरतेमध्ये  विनोद पेरण्याचे  काम दोघांनी सुरेख केलेआहे.

मध्यमवर्गीय माणसाच्या समस्येवर नाटक बांधले असून सकारात्मक विचार करून,  शांतपणे आलेल्या समस्येकडे बघितले तर आपल्याला यातून मार्ग मिळू शकतो,,  असा संदेश देऊन नाटक प्रेक्षकांना अंतर्मुख करायला लावते.  सकारात्मक विचार हा  मनाला नेहमी उभारी देतो.संजय खापरे यांनी हे नाटक बंदिस्त पणे सादर केल आहे,,  काही ठिकाणी नाटकाची गती संथ  होते. असे जरी असले तरी नाटक शेवटी परिणाम साधून जाते. त्याचप्रमाणे नेपथ्य,  प्रकाश योजना,  संगीत,  हे नाटकाला पूरक असे आहे.

नाटकाचे निर्माते प्रिया पाटील, श्लोक पाटील , उदय साटम हे आहेत. नाटकाची मूळ संकल्पना राहुल पिंगळे यांची असून नाटकाचे लेखन रोहित मोहिते ,, रोहित कोतेकर या दोघांनी मिळून केल  आहे.  नाटकाचे दिग्दर्शन संजय खापरे यांनी केले असून, नेपथ्य महेश धालवलकर ,  प्रकाश योजना अमोघ फडके,  संगीत मितेश चिंदरकर,  नृत्यदिग्दर्शन सिद्धेश दळवी यांनी केले आहे. या नाटकात संजय खापरे, पूर्वा फडके, रोहित मोहिते,  आसावरी  ऐवळे,  या कलाकारांनी भूमिका साकारल्या आहेत.
दीनानाथ घारपुरे

सागर म्हणतोय, ‘इशारों इशारों में’… 

 
– राज चिंचणकर
       नाटक, चित्रपट, मालिका अशा विविध प्रातांत मुशाफिरी करणारा अभिनेता सागर कारंडे आता ‘इशारों इशारों में’ हे नवीन नाटक घेऊन रंगभूमीवर अवतरला आहे. सागर कारंडे म्हटले की रसिकांच्या डोळ्यांसमोर त्याच्या ज्या भूमिका येतात, त्यापेक्षा वेगळी भूमिका त्याने या नाटकात रंगवली आहे. या नाटकाच्या निमित्ताने अभिनेत्री संजना हिंदूपूर हिच्यासोबत सागरची जोडी जमली आहे. उमेश जगताप यांचीही या नाटकात महत्त्वाची भूमिका आहे.
Isharo3
या नाटकाचे मराठी रूपांतर स्वप्नील जाधव यांनी केले आहे. जय कपाडिया यांचे दिग्दर्शन या नाटकाला लाभले असून, अजय कासुर्डे यांनी या नाटकाची निर्मिती केली आहे. ‘सरगम क्रिएशन’ या संस्थेतर्फे हे नाटक रंगभूमीवर आले आहे. नेहमीच्या परिचयाच्या विषयांपेक्षा वेगळा विषय या नाटकाद्वारे या टीमने हाताळला आहे.

Create a website or blog at WordPress.com

Up ↑