कलाकारांच्या गणेशोत्सवाच्या आठवणी आणि शुभेच्छा

सर्वांच्या लाडक्या गणपतीचे आगमन धुमधाम होतेय, यात तुमचे आवडते कलाकारही आज खुश आहेत, बाप्पाचा आशीर्वाद आणि त्यांच्या बाप्पासोबतच्या आठवणी सांगतायत….CHOTI MALKIN JODI

 1. अक्षर कोठारी – (छोटी मालकीण मालिकेमधील श्रीधर)

– माझं बालपण सोलापूरातल्या माणिक चौकात गेलं. तिथे आजोबा गणपतीचं मंदीर सुप्रसिद्ध आहे. या गणपतीला सुमारे १३२ वर्षांची परंपरा आहे.  नावाप्रमाणेच गणपतीची मूर्ती आपल्याला आजोबांसारखी भासते. गणेशोत्सवाच्या काळात इथे एक वेगळंच चैतन्य असतं. डोळे दिपवणारी रोषणाई, भक्तांच्या रांगा आणि बाप्पाचं डोळ्यात साठवून ठेवावं असं रुप. आम्हा मित्राचं लहानपणी एक लेझिम पथक होतं. मीही त्यात सहभागी होत असे. गणेशोत्सवाच्या काळात आम्ही बाप्पासमोर लेझिम खेळायचो. ते दिवस मी कधीच विसरु शकत नाही. गेल्या १० वर्षात कामाच्या गडबडीमुळे मी जाऊ शकलो नाही. पण यंदा मात्र मी आवर्जून सोलापुरातल्या माझ्या आजोबा गणपतीचं दर्शन घेणार आहे.

 1. नम्रता प्रधान – (छत्रीवाली मालिकेतील मधुरा)NAMRTA PRADHAN
 • गणपती बाप्पा हे माझं सर्वात आवडतं दैवत. बाप्पाच्या सजावटीपासून ते अगदी नैवेद्यापर्यंत सगळ्यात माझा सहभाग असतो. गेल्यावर्षी मी बाप्पाच्या आवडीच्या जास्वंदीच्या फुलाची सजावट केली होती. यंदा शूटिंगमुळे मला सजावटीमध्ये सहभाग घेता आला नाही, मात्र सजावटीत छत्रीचा वापर जरुर करा असं मी माझ्या फॅमिलीला आवर्जून सांगितलंय. स्टार प्रवाहच्या छत्रीवाली या मालिकेमुळे मला छत्रीवाली ही नवी ओळख मिळालीय. बाप्पाच्या आशिर्वादामुळेच ही सुवर्णसंधी मला मिळालीय. त्यामुळे यंदा बाप्पाची आरास छत्रीशिवाय पूर्ण होऊच शकत नाही.

 1.   संकेत पाठक – (छत्रीवाली मालिकेतील विक्रम)   CHATRIWALI JODIमी मुळचा नाशिकचा. माझ्या घरी गौरी-गणपती असतात. इकोफ्रेण्डली गणेशोत्सव साजरा करण्याचा माझा आणि माझ्या कुटुंबाचा प्रयत्न असतो. माझी आई दरवर्षी घरीच कागदापासून गणपतीची मूर्ती तयार करते. मीही तिला मदत करतो. निसर्ग जपा तरच तो तुमचं रक्षण करेल हा संदेश मला माझ्या कुटुंबाकडून लहानपणापासून मिळत आलाय आणि तोच मी माझ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवू इच्छितो.

 1. संग्राम समेळ – (ललित २०५ मालिकेतील नील राजाध्यक्ष)
 • SANGRAM SAMELलहानपणी गणपतीची सुट्टी पडली की मी माझ्या आजोळी जात असे. तिकडे सोसायटीच्या गणपतीला वेगवेगळे कार्यक्रम आणि स्पर्धा असायच्या. मी फॅन्सी ड्रेस आणि चित्रकला स्पर्धेत आवर्जून भाग घ्यायचो. तुमच्यातले कलात्मक गुण अश्याच स्पर्धांमधून ठळक होत असतात असं मला वाटतं. माझ्या घरीही दरवर्षी बाप्पाचं अगदी थाटामाटात आगमन होतं. यंदा समेळांच्या बाप्पाचं ७५वं वर्ष आहे. त्यामुळे डबल सेलिब्रेशन असणार आहे. बाप्पा तुझा आशिर्वाद असाच आम्हा सर्वांच्या पाठीशी राहो हीच इच्छा मी व्यक्त करेन.
 1. हरीश दुधाडे – (नकळत सारे घडले मालिकेतील प्रतापराव रांगडे पाटील)HARISH DUDHADE 1
 • गणपती म्हणजे ६४ कलांचा अधिपती, बुद्धीची देवता आणि विघ्नहर्ता. आज मी जो काही आहे ते बाप्पाच्या कृपेमुळेच. गणेशोत्सवाच्या काळात होणाऱ्या एकपात्री आणि एकांकिका स्पर्धांमध्ये मी सहभागी होत लहानाचा मोठा झालो. अभिनयक्षेत्रात मी येईन की नाही हे त्यावेळी मला ठाऊक नव्हतं पण बाप्पाला माहित होतं हे नक्की. दरवर्षी गणेशोत्सव जवळ आला की माझी आई माझ्याकडून एकपात्री नाटक बसवून घ्यायची. आणि मग वेगवेगळ्या मंडळांमधून मी ते सादर करायचो. खास बात म्हणजे सगळ्याच मंडळांमधून मला हमखास बक्षिसही मिळायचं. तेव्हापासूनच अभिनयाची गोडी मला लागली. अहमदनगर ते मुंबई हा पल्ला याच आत्मविश्वासामुळे मी गाठू शकलो. मला आठवतंय एमबीए करत असताना मी गणपतीला रोज एक फूल वाहायचो. परीक्षेत पास होण्यासाठी नाही तर मी एका मालिकेसाठी ऑडिशन दिलं होतं त्यासाठी निवड व्हावी यासाठी. विशेष गोष्ट अशी की मी त्यावर्षी पासही झालो आणि माझ्या आयुष्यातल्या पहिल्या मालिकेसाठी माझी निवडही झाली. बाप्पाकडे लावलेली ही गोड सेटिंग मला कायम आठवते. यावर्षी शूटिंगच्या व्यस्त वेळापत्रकातून वेळ काढून मी घरच्या गणपतीच्या दर्शनसाठी जाणार आहे. आणि जास्तीत जास्त वेळ बाप्पासोबत व्यतीत करणार आहे.

 1. नुपूर परुळेकर – (नकळत सारे घडले मालिकेतील नेहा)NUPUR PARULEKAR
 • गणपती बाप्पा सगळ्यांचाच लाडका देव आहे तसंच माझाही आहे. काहीही झालं तरी बाप्पा आपलं रक्षण करतो ही गोष्ट माझ्या मनावर लहानपणापासूनच कोरली गेलीय. मला आठवतंय लहानपणी मला अंधाराची खूप भीती वाटायची. खेळून झाल्यावर घरी परत येताना किंवा घरात एकटं असताना मला सतत माझ्यासोबत कुणीतरी असल्याचा भास व्हायचा. मनातली ही भीती मी जेव्हा माझ्या आईला सांगितली तेव्हा तिने मला अजिबात न घाबरण्याचा सल्ला दिला. तुझ्यासोबत असणारी ती व्यक्ती म्हणजे गणूबाप्पाच असल्याचं सांगत तिने माझ्या मनातली भीती घालवली. आज ही गोष्ट आठवली तरी हसू येतं. पण अडचणीच असताना आईचे हे शब्द आठवतात आणि बाप्पा सतत सोबत असल्याची जाणीव होत राहते. मला सख्खा भाऊ नाही. माझ्या आयुष्यातली ही उणीव गणपती बाप्पानेच भरुन काढलीय. गणेशोत्सवात ऋषीपंचमीच्या दिवशी केली जाणारी ऋषीची भाजी मला प्रचंड आवडते. बाप्पासोबत यावर्षीही या भाजीचा आस्वाद मी घेणार आहे.

 1. एतशा संझगिरी – (छोटी मालकीण मालिकेतली रेवती)
 • AETASHA SANSGIRIमी मुळची परेलची. गिरणगावातच लहानाची मोठी झाल्यामुळे गणेशोत्सवाचा वेगळा उत्साह असतो. माझ्या सोसायटीच्या गणपतीला आम्ही सगळेजण खूप धमाल करतो. आमच्याकडे दरवर्षी मोदक खाण्याची स्पर्धा असते. मला मोदक प्रचंड आवडतात. मी या स्पर्धेत दरवर्षी भाग घेते. बाप्पाने आजवर मला न मागता खूप गोष्टी दिल्या आहेत. त्याचा वरदहस्त माझ्या पाठीशी राहो हेच मागणं मागेन.

 1. अजिंक्य राऊत – (विठुमाऊली –  विठ्ठल)
 • Vitthal Image (3)आमच्या गणपती बाप्पाची आरास खुपच खास असते. बाप्पाच्या सजावटीसाठी आम्ही लाडूंचा वापर करतो. त्यामुळे दरवर्षी मला खूप सारे लाडू खायला मिळतात. यंदा बऱ्याच गणेश मंडळांनी आणि घरगुती गणपतीही विठुमाऊलीच्या रुपात साकारलेला पाहायला मिळत आहेत. त्यामुळे शक्य तितक्या गणपतींचं दर्शन घेण्याची उत्सुकता आहे.

बाप्पा मोरया……

मी वयाने कितीही मोठा झालो तरी मी , बाप्पाच म्हणतो. हसतील बरेच जण , पण मी लहनांसारखा बाप्पाच म्हणेन. कारण मला मी अजून मोठा झालोय असं वाटतच नाही, ह्या गणपतीच्या सणाला. एक गुपित सांगतो आज,माझं पाळण्यातले नाव मोरेश्वर आहे .
 माझ्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात, गणेशोत्सवापासूनच झाली. आमच्या सोसायटी मध्ये पाच दिवसांचा गणपती असतो, स्टेज बांधलं जातं, त्या स्टेज वर मी आवर्जून भाग घ्यायचो लहानपणी, अनेक स्वगतं तिथे सादर केली, काही गंभीर आणि जास्त विनोदी. तिथेच मला खरा प्रेक्षक वर्ग मिळाला, आत्मविश्वास वाढला आणि ह्या क्षेत्रात येण्याचे निश्चित केले. नाटकाच्या निमित्ताने गणपती दिवसातले अनेक दौरे , अनेक ठिकाणी केले , जास्त करून गोवा.  गणपतीचा दौरा असला म्हणजे खूप छान वाटायचं. अनेक ठिकाणाच्या बाप्पाचं दर्शन व्हायचं. प्रसाद खायला मिळायचा. विघ्नहर्ता असल्यामुळे मी  त्याच्याकडे सगळ्यांची दुःख दूर होवोत अशी प्रार्थना नेहमी करतो. माझ्या फडके घराण्याचा गणपती पूर्वी पेण ला असायचा . सगळी भावंडं जमायची आणि धमाल करायची. एकत्र गप्पा, गाणी,  आणि होम मेड आईस्क्रीम  ,वा वा. पण ते दिन गेले लवकर. सगळ्यात वाईट गोष्ट ही की , घराण्याचा बाप्पा ( घरातल्या मोठ्या आणि समंजस मोठ्या माणसांमुळे) विभागला जाणं,त्यासाठी मी बाप्पावर अजून रुसलो आहे.
आता मी काकांकडे ( कल्याणच्या ) बाप्पा च्या दर्शनाला जातो.
इतरांना त्रास होईल असं बाप्पाचा सण साजरा करू नये, एवढंच सांगेन..
गजानना श्री गणराया आधी वंदू तुझं मोरया…
IMG-20180113-WA0005
शेखर विजय फडके .

कलाकार सांगतायत त्यांच्या बाप्पाच्या आठवणी

गणपती बाप्पा येणार या कल्पनेनेच सगळ्यांच्या चेहऱ्यावर आनंद आणि उत्साह असतो. गणपती म्हणजेच संपूर्ण महाराष्ट्राचे आराध्य दैवत ज्याच्या येण्याने सगळ्यांची विघ्नदु:खसमस्या दूर होतात. या विघ्नहर्त्याच्या स्वागतासाठी सगळेच एक महिन्या आधीपासूनच तयारी सुरु करतात. यंदाच्या गणेश चतुर्थीसाठी कलर्स मराठीच्या संपूर्ण परिवाराने जय्यत तयारी केली आहे. वाहिनीवरील कलाकारांनी गणेश चतुर्थीच्या निमित्ताने त्यांच्या आठवणीअनुभव वाचकांसोबत शेअर केले असून धुमधडाक्यात गणरायाचे स्वागत केले तसेच पुढच्या वाटचालीसाठी आर्शिवाद देखील घेतले – घाडगे & सून मालिकेमधील अमृता (भाग्यश्री लिमये) राधा प्रेम रंगी रंगली मालिकेतील राधा आणि प्रेम (वीणा जगताप आणि सचित पाटील), ‘लक्ष्मी सदैव मंगलम्’ मालिकेतील लक्ष्मी (समृद्धी केळकर)मल्हार (ओमप्रकाश शिंदे) आणि आर्वी (सुरभी हांडे) तसेच नवरा असावा तर असाकार्यक्रमाच्या सूत्रसंचालक सगळ्यांच्या लाडक्या हर्षदा खानविलकर. 

 मराठी परिवारातीलघाडगे & सून मालिकेतील प्रेक्षकांची लाडकी अमृता म्हणजेच भाग्यश्री लिमये हिने गणपती बाप्पाच्या काही आठवणी तसेच अनुभव सांगितले: गणेशोत्सव म्हणजे माझ्यासाठी उत्साहाला उधाण आणणारा समाजभिमुख करणारा सण.

IMG_20180912_202915आमच्या कॉलनीत आम्ही गणपती बसवायचो. रात्री गणपतीच्या आरतीला झांजा वाजवायला मला खूप आवडायचं. रात्री आरती झाल्यावर सर्वांना प्रसाद वाटायचा आणि उरलेला प्रसाद सर्वांच्या घरी पोहचता करायचं काम आम्हा छोट्या मंडळीवर होतं. हे काम केल्याबद्दल आम्हाला दुप्पट प्रसाद मिळायचा जो खूप चविष्ट लागायचा.. इतका कि बस्स त्या प्रसादच खूप अप्रूप वाटायचं. आमच्या घरी पाच दिवस गणपती असतात … पणपाचव्या दिवशी गणपतीला पोहचवताना खूप उदास वाटतं.

 

नुकतीच सुरु झालेली ‘लक्ष्मी सदैव मंगलम्’मालिकेमधील मल्हार म्हणजेच ओमप्रकाश शिंदे याने देखील काही आठवणी आणि अनुभव सांगितले : मी लहान असताना आमच्या गावी सार्वजनिक मंडळाचा गणपती असायचा. तेंव्हा आरतीला दिला जाणारा प्रसाद रोज वेगवेगळ्या घरातून जायचा.

IMG_20180912_202842आमच्या घरातून जेंव्हा प्रसाद द्यायचा असायचा तेंव्हा मी बराच प्रसाद मंडळात पोहचवण्यापूर्वीच फस्त करायचो. अर्थात घरी कळू न देता. मला एक सांगावस वाटत गणेशोत्सवाचा मूळ हेतू विसरू नये. ध्वनीप्लास्टिक आणि इतर होणारे प्रदूषण टाळावे. मंडळामध्ये स्पर्धा असावी पण द्वेष नसावा.

लक्ष्मी सदैव मंगलम् मालिकेमधील लक्ष्मी म्हणजेच समृद्धी केळकर हिने देखील काही गोष्टी सांगितल्या : मला आवडणाऱ्या उत्सवांपैकी एक म्हणजे गणेशोत्सव… या काळात सगळीकडे आनंदाचं आणि चैतन्यपूर्ण वातावरण असते. आमच्याकडे बाप्पा बसत नाही तरी सुद्धा मी माझ्या आत्याकडे आणि मावशीकडे जाऊन बाप्पाच्या आगमानाची जय्य्त तयारी करते. मी नेहेमी बाप्पा आला कित्याच्यासमोर आम्हाला कथ्थक मध्ये शिकवलेले कवीत्त सादर करते. एका अर्थाने हा नमस्कारच असतो. मी एक गोष्ट आवर्जून सांगेन आपण सगळ्यांनी छोटी शाडूची मूर्ती आणावी. तिचे जवळच्या एका विहिरीमध्ये किंवा कृत्रिम तलावामध्ये विसर्जन करावे. प्रदूषण मुक्त गणेशोत्सव साजरा करूया असे मी सर्वांना सांगेन. आर्वीची भूमिका साकारणारी सुरभी हांडे म्हणाली… श्रावण महिना सुरु झाला कि दिवाळी संपेपर्यंत एक प्रकारचा उत्सवच असतो आणि त्या उत्सवाचीसुखाची सुरुवात गणपती बाप्पा करतो.

बाप्पाच्या आठवणीबद्दल बोलताना राधा प्रेम रंगी रंगली मालिकेमधील प्रेम देशमुख म्हणजेच सचित पाटील म्हणाला … बाप्पाच्या असंख्य आठवणी आहेत. लहानपणापासूनच्या किती सांगू आणि किती नाही असं होतं. माझ्या आजीकडे गणपती बाप्पा येतो…

IMG_20180912_203019आम्ही सगळी भावंड मिळून बाप्पाच्या आगमनाची वाट अगदी आतुरतेने बघत असे… टाळ मृदुंगाच्या साथीने “गणपती बाप्पा मोरया’ असा जयघोष करत बाप्पाला घरी घेऊन यायचो. यानिमित्ताने सगळ कुटुंब एकत्र यायचं जसं अजुनही येतं. जसे लहान असताना आम्हाला उकडीचे मोदक आवडायचे अगदी तसेच आजही आम्हाला प्रचंड आवडतात. दादर मध्ये गणपतीच्या दिवसांमध्ये खूप चैतन्यमय वातावरण असते. त्यादिवसांचीच एक आठवण सांगायची म्हणजे दादर मध्ये जेवढे सार्वजनिक गणपती आहेत तिथे आमच्या लहानपणी सांस्कृतिक कार्यक्रम व्हायचे. आणि आमची आजी आम्हाला तिथे घेऊन जायची मला असं वाटत या क्षेत्रात येण्याची बीजं कुठेतरी तिकडे रोवली गेली. एक महत्वाची गोष्ट मला सांगायची आहे पर्यावरणाचा विचार आपण सगळ्यांनी करणे खूप महत्वाचे आहे. ECO Friendly अशी गणेशाची मूर्ती घरोघरी आणली जाते जी अत्यंत चांगली गोष्ट आहे. या सगळ्या आनंद सोहळ्यामध्ये आपण पर्यावरणाचा तोल जाऊ देता कामा नये. वीणा जगताप म्हणजेच सगळ्यांची लाडकी राधा : आमच्या घरी दरवर्षी बाप्पाचे आगमन होते ज्याची सुरुवात मीच केली.

“नवरा असावा तर असा” या कार्यक्रमकाच्या सूत्रसंचालनाची धुरा ज्यांनी सांभाळली आहे अश्या संपूर्ण महाराष्ट्राच्या लाडक्या हर्षदा खानविलकर यांनी देखील त्यांच्या आणि बाप्पामधल्या अनोख्या नात्याचे काही किस्से आणि आठवणी सांगितल्या.

IMG_20180912_202958 माझं आणि बाप्पाचं खूप खास नात आहे असं मी समजते. मला असं वाटत कित्याचं देखील माझ्यावर प्रेम आहे. मला छोट्या छोट्या अश्या खूप प्रचीती येत असतात. मुळात माझ्या वडिलांची खूप श्रध्दा होती गणपतीवर. माझा स्वभाव खूप श्रध्दाळू आहे. माझ्या घरात बरेच छोटे मोठे गणपती आहेतजे मला भेट म्हणून मिळाले आहेत. दर मंगळवारी मला कोणी ना कोणीतरी भेट म्हणून गणपती देतं. हि माझी श्रध्दा आहे कि दर मंगळवारी मला बाप्पा भेट देतो. माझी आणि गणपतीची मैत्री आहेमी त्याला माझा खूप मोठा आधार मानते.

 

आभाळाला भिडणाऱ्या गोविंदांना सलाम करणारं दहीहंडीचं खास गाणं लाँच   

संदीप कुलकर्णी, ह्रषीकेश जोशी आणि अमोल पराशर यांच्या चेहऱ्यावरीलमिश्किल भावांनी गाण्याला आणली वेगळीच मजा…

Image

 श्रावण सुरू झाला की एका पाठोपाठ एक सणांची रांग लागते. प्रत्येक सणाचीआपली वेगळीच धमाल… वेगळीच मस्ती…. याच अनोख्या धमाल-मस्तीने नटलेलासण म्हणजे दहीहंडी.. थरांचा थरार सादर करताना आपल्या माणसाला जपण्याचीवृत्ती दरवर्षी या सणादरम्यान पाहायला मिळते. जल्लोषात साजरा होणाऱ्या यासणाचा जोश वाढवणारं संदीप कुलकर्णी यांच्या आगामी चित्रपटाचं धमाल गाणंनुकतंच लाँच करण्यात आलं आहे.

        बेभान गोविंदांच्या रंगील्या खेळीला सलाम करणारं हे दहीहंडीचं खास गाणं… ज्यात संदीप कुलकर्णी, ह्रषीकेश जोशी आणि अमोल पराशर यांच्या मिश्कीलहावभावांनी चार चांद लावले आहेत. संदीप कुलकर्णींचा हा अंदाज पहिल्यांदाच यागाण्यातून प्रेक्षकांसमोर आला आहे.

        करंबोला प्रोडक्शन्स प्रस्तुत मनाला भिडणारं हे गाणं शैलेंद्र बर्वे यांनी संगीतबध्दकेलं असून चंद्रशेखर सानेकर यांनी गोविंदांचा थरार आणि जिद्द शब्दबध्द केली आहे. तर हे शब्द थेट काळजाला भिडतात ते प्रवीण कुवर यांच्या आवाजात… संदीपकुलकर्णी आणि महेंद्र अटाळे निर्मित हे गाणं कोणत्या चित्रपटातलं आहे, हे अद्यापगुलदस्त्यात असलं तरी लवकरच यावरून पडदा उठणार

बॉलीवूड थीमपार्कमध्ये दहीहंडी आणि गणेशोत्सव साजरा

श्रावण महिन्याच्या पाठोपाठ येत असलेल्या सणासुदीचे वेध सर्वत्र लागू झाले आहेत. गोपाळकाला, गणपती अश्या एका मागून एक येत असलेल्या विविध सणवारांदरम्यानचा लोकांमधला उत्साह काही औरच असतो.
2B9A3903त्यामुळे, याच उत्सवांच्या निमित्ताने, सुप्रसिद्ध कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई यांच्या ‘बॉलीवूड थीमपार्क’ मध्ये नुकताच दहीहंडी आणि गणेशोत्सव साजरा करण्यात आला. कर्जत येथील नितीन चंद्रकांत देसाई यांच्या एन.डी.स्टुडीयोत साकारण्यात आलेल्या या बॉलीवूड मायानगरीत, उभारण्यात आलेल्या छोटेखानी हंडीचा स्थानिक गोविंदांनी मनसोक्त आनंद लुटला.
2B9A4317
इतकेच नव्हे तर, लवकरच येत असलेल्या गणेशोत्सवाच्या निमित्ताने, एन.डी.स्टुडियोच्या आवारातील गणेशमूर्तीची पारंपारिक पूजा आणि महा आरती करण्यात आली. बॉलीवूडच्या चंदेरी दुनियेत पार पडलेल्या विघ्नहर्त्याच्या या महाआरतीत एन.डी.स्टुडीयोतील सर्व कलाकारांनी उपस्थिती लावली होती. एरव्ही, बॉलीवूडच्या बहुरंगी जल्लोषाने नटलेले हे थीमपार्क अथर्वशिर्षने अध्यात्मिक रंगात न्हाऊन गेले होते.
2B9A4193

‘सविता दामोदर परांजपे’ च्या प्रिमियर चे काही क्षणचित्रे

1535712736095_IMG_9474जॉन अब्राहम यांच्या पहिल्या निर्मिती पदार्पणामुळे सविता दामोदर परांजपे हा मराठी सिनेमा चर्चेचा विषय झाला होता. नुकताच या चित्रपटाचा शानदार प्रीमियर अभिनेता जॉन अब्राहम व कलाकारांच्या उपस्थितीत संपन्न झाला.

IMG_6542

एका वेगळ्या विषयावर चित्रपट केल्याचं समाधान व्यक्त करतानाच उपस्थित सर्वांचे आभार निर्माते जॉन अब्राहम यांनी याप्रसंगी व्यक्त केले.IMG_6563IMG_9539IMG_6542

सर्व कलाकारांच्या सहकार्यामुळे चांगला चित्रपट करता आल्याची भावना व्यक्त करतानाच दिग्दर्शिका स्वप्ना वाघमारेजोशी यांनी कलाकारांच्या सहकार्याबद्दल त्यांचे आभार मानले. या प्रीमियरला मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकार उपस्थित होते. 

‘चुंबक’ चित्रपटाचा ट्रेलर रिलीज

बॉलीवूड अभिनेता अक्षय कुमार यांच्या प्रमुख उपस्थितीतचुंबक’ या आगामी मराठी चित्रपटाचा ट्रेलर पीव्हीआर सिनेमाजुहू येथे प्रदर्शित करण्यात आला. यावेळी प्रख्यात गीतकारगायक आणि अभिनेता स्वानंद किरकिरे, प्रमुख भूमिकेतील संग्राम देसाई आणि साहिल जाधवराष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक संदीप मोदीलेखक सौरभ भावे, चित्रपटाचे निर्माते कायरा कुमार क्रिएशन्सचे नरेन कुमार तसेच केप ऑफ गुड फिल्म्सचे सदस्यही जुहू येथील पीव्हीआर सिनेमा येथे झालेल्या या कार्यक्रमाला उपस्थित होते. चुंबक’ चित्रपटाची प्रस्तुती अक्षय कुमार करत असून निर्मिती अरुणा भाटीयानरेन कुमार आणि केप ऑफ गुड फिल्म्सनी केली आहे. चित्रपट २७ जुलै रोजी सर्वत्र प्रदर्शित होत आहे.

Chumbak Official Movie Trailer Link- http://bit.ly/ChumbakTrailer

सई ताम्हणकर सॅव्ही पुरस्काराने सन्मानित!

सॅव्ही वुमन एम्पॉवरमेंट पुरस्कार हा प्रतिष्ठित पुरस्कार समजला जातो. हा पुरस्कार मिळावा अशी अनेक सेलेब्सची इच्छा असते. असा हा पुरस्कार अभिनेत्री सई ताम्हणकरला मिळाला आहे. नेहमी पेज-थ्री आणि बॉलीवूड सेलेब्सना मिळणारा हा फॅशन जगतात मानाचा मानला जाणारा पुरस्कार सईला मिळणं हे नक्कीच कौतुकास्पद बाब आहे.sai savvy 2

 

sai savvy

सॅवी वुमन एम्पॉवरमेंट पुरस्कार सोहळ्यामध्ये सईला ‘आउटस्टेंडिंग कॉन्ट्रिब्युशन इन फिल्म्स’ या पुरस्काराने सम्मानित करण्यात आले. सॅव्ही पुरस्कार मिळणारी ती मराठीतली पहिली अभिनेत्री आहे.

Create a website or blog at WordPress.com

Up ↑