शर्मिष्ठा झाली भावुक

आज बिग बॉस सगळ्यांना आगळावेगळा टास्क देणार आहेत. बिग बॉस यांच्या असे निदर्शनास येणार आहे गेल्या अकरा आठवड्यात केलेल्या अथक परिश्रमांमुळे आता सदस्यांना थकवा आला आहे. म्हणूनच सदस्यांना झोपेची नितांत आवश्यकता भासत आहे. यासाठी बिग बॉस मराठीच्या घरातील एक महत्वाचा नियम आज बिग बॉस शिथिल करणार आहेत. बिग बॉसच्या पुढील आदेशापर्यंत घरातील सदस्यांना कुठेही आणि कधीही झोपण्यास परवानगी आहे. पण यामध्ये बिग बॉस एक अट घरातील सदस्यांना देणार आहेत. सर्व सदस्यांचा मिळून झोपेचा एकूण अवधी आठ तास असेल.

आता बिग बॉस मराठीच्या घरातील सदस्य हा टास्क कसा पूर्ण करतील कोणती आव्हानं त्यांच्यासमोर येतील हे बघणे रंजक असणार आहे

बिग बॉसच्या घरातून आऊ घराबाहेर

बिग बॉस मराठीचा हा आठवडा पुष्करमेघासईशर्मिष्ठा आणि आऊ यांच्या ग्रुपसाठी थोडा तणावाचा आणि वाद विवादांचा ठरला. ज्यामध्ये सई आणि पुष्कर मेघा वर बरेच नाराज दिसले. सई आणि पुष्कर यांनी मेघाला बरेच बोलून दाखवले. परंतु आता सईने मेघाला आपण सगळे विसरून जाउया असे सांगितले असून मेघाने सईला असे सांगितले आहे पुष्कर जे काही माझायाबद्दल बोलला ते मी नाही विसरू शकत. त्यामुळे येत्या आठवड्यामध्ये पुष्करमेघासईशर्मिष्ठा यांच्यातील वाद मिटतील का हे बघणे रंजक असणार आहे. आता येणारे सगळेच आठवडे महत्वपूर्ण असून बिग बॉस मराठीच्या घरातील प्रत्येक सदस्याला स्वत:साठी खेळण्याची वेळ आली आहे.

 

उषा नाडकर्णी या आठवड्यामध्ये बिग बॉस मराठीच्या घरामधून बाहेर पडल्या. तेंव्हा महेश मांजरेकर यांनी बोलताना सांगितले कि, बिग बॉस मराठीच्या घरामध्ये आऊ यांची खूप आठवण येईल. Usha Nadkarni

सई मेघा, आऊ आणि शर्मिष्ठा मध्ये भांडण

 बिग बॉस मराठीच्या घरामध्ये  कालसुध्दा “होउ दे चर्चा” हे साप्ताहिक कार्य रंगले. ज्यानुसार पुष्कर, आस्ताद, मेघा आणि सई यांनी बऱ्याच ब्रेकिंग न्यूज दिल्या. काल “होउ दे चर्चा” या टास्कमध्ये आऊनी अनिल थत्ते आणि त्यांच्याबद्दल एक ब्रेकिंग न्यूज दिली. तसेच पुष्करने त्याच्या चाहत्यांसाठी एक मनोरंजनाची खास मेजवानी दिली ते म्हणजे एक छान नृत्य. टास्कदरम्यान आस्तादची मेघा आणि सई बरोबर शाब्दिक चकमक झाली. त्या दोघींनी घेतलेला निर्णय आस्तादला पटला नाही आणि त्या विचारसरणीला विरोध दर्शवून त्याने निषेध केला. नंतर मेघा आणि सईने त्यांचा निर्णय बदलून शर्मिष्ठाचे नावं ब्रेकिंग न्यूज मधून काढून आऊ आणि पुष्करचे नावं अंतिम केले. आज पुष्कर आणि आस्ताद मध्ये कॅप्टनसीचे कार्य रंगणार आहे.

कॅप्टनमध्ये किती सहनशीलता आहे यावर अनेक गोष्टी अवलंबून असतात हे महत्व अधोरेखित करण्यासाठीच आज बिग बॉस “एक डाव नावाचा” हे कॅप्टनसीचे कार्य सोपवणार आहेत. कॅप्टन या शब्दाचे महत्व अधोरेखित करणे हे या कार्याचे उद्देश आहे. कोण बनणार बिग बॉस मराठीच्या घराचा नवा कॅप्टन मेघा आणि सईचे भांडण कोणत्या टोकाला जाणार ?big boss

आस्ताद करणार निषेध

बिग बॉस मराठीच्या घरामध्ये  काल “होउ दे चर्चा” हे साप्ताहिक कार्य रंगले. काल सई आणि शर्मिष्ठाचे फोटो लपविण्यावरून झालेले भांडण चांगलेच रंगले. तसेच आस्तादने देखील नळाच्या टास्कदरम्यान भूषण कडूला टेंगुळ आले होते ही गोष्ट एक वेगळ्या प्रकारे ब्रेकिंग न्यूज म्हणून प्रेक्षकांसमोर सादर केली. तसेच सईने काल डोळ्यावर पट्टी बांधून ऑमलेट बनवले. अशा वेगवेगळ्या प्रकारच्या ब्रेकिंग न्यूज बिग बॉस मराठीतील सदस्य बिग बॉस न्यूज मध्ये सादर करत आहेत. आजदेखील रंगणार काल “होउ दे चर्चा” हे साप्ताहिक कार्य. सदस्य हा सगळा खटाटोप करत आहेत कॅप्टनसीची उमेदवारी मिळविण्यासाठी. “होउ दे चर्चा” या साप्ताहिक कार्यामध्ये आजसुध्दा बऱ्याच ब्रेकिंग न्यूज बघायला मिळणार आहेत. तसेच आस्तादने कुठल्या गोष्टीचा आणि का निषेध केला ?

आज “होउ दे चर्चा” या टास्कमध्ये आऊ अनिल थत्ते आणि त्यांच्याबद्दल एक ब्रेकिंग न्यूज देणार आहेत. तसेच पुष्कर त्याच्या चाहत्यांसाठी एक मनोरंजनाची खास मेजवानी देणार आहे ते म्हणजे एक छान नृत्य सादर करून. टास्कदरम्यान आस्तादची मेघा आणि सई बरोबर शाब्दिक चकमक होणार आहे. त्या दोघींनी घेतलेला निर्णय आस्तादला पटला नसावा हे त्यामागचे कारण असू शकते. कारण आस्तादचे म्हणणे असणार आहे, “सकारात्मक गोष्ट सोडून जर मनातील भडास निघण्यासारखी एक गोष्ट अधोरेखित करून दाखवायची असेल तर या विचारसरणीला माझा विरोध आहे … म्हणून मी निषेध करतो”. नक्की काय घडले हा गुंता मेघा आणि सई कसा सोडवणार हे बघणे रंजक असणार आहे.

 

वटपौर्णिमा महिलांच्या आयुष्यातील एक महत्वाचे मानले जाणारे व्रत. यानिमित्ताने घरातील सदस्यांना रुचकर पदार्थ बनविण्याची संधी बिग बॉस देणार आहेत. बिग बॉसतर्फे चविष्ठ पदार्थांचा आनंद लुटण्यासाठी जेमेनी रिफ़ाईंड कुकिंग ऑईल प्रस्तुत “आरोग्यमय आहार” हे कार्य देण्यात येणार आहे. ज्यामध्ये आऊ आणि शर्मिष्ठा मिळून पुऱ्या आणि बटाट्याची भाजी बनवणार आहेत तसेच बाकीचे सदस्य अजून कोणते पदार्थ बनवतील हे बघायला विसरू नका आजच्या भागामध्ये.

 

“होउ दे चर्चा” या साप्ताहिक कार्यामध्ये जो जास्तीत जास्तीत ब्रेकिंग न्यूज देणार आहे त्या सदस्यांना या आठवड्याच्या कॅप्टनसीसाठी उमेदवारी मिळणार आहे. vlcsnap-error171

बिग बॉसच्या घरात पुष्की करणार वॅक्सिंग

बिग बॉस मराठीच्या घरामध्ये काल रंगले दोन टास्क. सदस्यांना बिग बॉस मराठीच्या घरामध्ये येऊन आता ७० दिवस झाले. याच अंदाजाचा आणि कल्पकतेचा आधार घेऊन स्वत:ची क्रमवारी सदस्यांना ठरवायची होती. सदस्यांच्या चांगल्या कृत्याची बाहेरच्या जगात दखल घेतली गेली असेल किंवा एखाद्या कृत्याची सनसनाटी बातमी झाली असेलच. तर सदस्यांना त्यांच्यापैकी अश्या पाच सदस्यांची क्रमवारी ठरवायची होती. यानुसार रेशम पहिल्या क्रमांकावर, मेघा, पुष्कर, सई आणि अनुक्रमे दुसऱ्यातिसऱ्याचौथ्या आणि पाचव्या क्रमांकावर उभे राहिले. बिग बॉस यांनी घरातील सदस्यांना जरा हटके असे “होउ दे चर्चा” हे साप्ताहिक कार्य सोपवलेज्यामध्ये आस्ताद मंगळवार पोहचला तर पुष्करने बिकिनी घातली. आऊ आणि शर्मिष्ठाने मोठे भांडण झाल्याचे दाखवले. यानुसार मेघा आणि रेशमने पुष्कर आणि आस्तादला सगळ्यात जास्त सनसनाटी आणि ब्रेकिंग न्यूज दिले असल्याचे सांगितले. त्यांनतर पुष्कर रिपोर्टर आणि आस्ताद कॅमेरापर्सन बनला. आज कोण बाजी मारणार ?

तसेच आज असे “होउ दे चर्चा” या टास्कमध्ये सई आणि स्मितानंदकिशोर,पुष्कर आणि नंदकिशोर हे ब्रेकिंग न्यूज देण्याचा प्रयत्न करणार आहेत. सईचे फोटो कोणीतरी लपवले असल्याने ती आस्ताद, स्मिता यांना विचारणार आहे. ज्यावरून सई आणि स्मितावर खूप भांडण होणार आहे. तसेच सई नंदकिशोर यांच्या डोक्यावर पीठ टाकणार आहे तसेच मेघा नंदकिशोर यांच्या डोक्यावर अंड फोडणार आहे. सईचे असे म्हणणे असणार आहे कि, “जे काही तुम्ही घरात आल्यापासून वागलात आणि बोलात तसेच तुम्ही टास्क मध्ये माणुसकी सोडून वागलात ते मला आवडलेले नाही…  आणि तुम्ही ते मान्य देखील नाही त्यामुळे मी हे सगळे केले”. पुष्कर जोग या टास्क साठी waxing करणार आहे. त्याचे म्हणणे असे असणार आहे कि, “मला स्त्रियांबद्दल प्रचंड आदर आहे त्यांना ज्या वेदना होता किंबहुना सगळ्या वेदना त्यांच्याच नशिबी आल्या आहेत त्यामुळे त्यांना ज्या या वेदना होतात त्याला आज मी एकप्रकारेtribute देणार आहे माझ्या पायावरचे केस Wax करून”.

 

“होउ दे चर्चा” या साप्ताहिक कार्यामध्ये जो जास्तीत जास्तीत ब्रेकिंग न्यूज देणार आहे त्या सदस्यांना या आठवड्याच्या कॅप्टनसीसाठी उमेदवारी मिळणार आहे. त्यामुळे हे बघणे रंजक असणार आहे को

आऊ – शर्मिष्ठा मध्ये तू तू मी मी

बिग बॉस मराठीच्या घरामध्ये  काल रंगले नॉमिनेशन प्रक्रियेचे कार्य. बिग बॉस यांनी आठवड्यातील नॉमिनेशन प्रक्रियेसाठी एक वेगळा टास्क सदस्यांना दिला. या आठवड्यातील नॉमिनेशन कार्य जोड्यांमध्ये पार पडले. या कार्यानिमित्त घरामध्ये चार जोड्या बनवण्यात आल्या. प्रत्येक जोडीला एक container देण्यात आलेत्या container मध्ये वाळू भरलेली होती. नॉमिनेशन प्रक्रियेमधून सुरक्षित होण्यासाठी सर्व जोड्यांना ईतर जोड्यांच्या container मधील वाळू कमी करायची होती तसेच आपल्या container मधील वाळू कमी होणार नाही याची दक्षता घ्यायची होती. या कार्यामध्ये आणि या आठवड्याच्या नॉमिनेशन प्रक्रियेमधून रेशम घराची कॅप्टन असल्या कारणाने तसेच नंदकिशोर हा हुकुमशाहा टास्क उत्तमरीत्या केल्यामुळे सुरक्षित असणार आहेत. रेशम कालच्या टास्क मध्ये संचालकाच्या भूमिकेत होती. या टास्क मध्ये पुष्कर आणि मेघा सुरक्षित ठरले आणि बाकीचे सदस्य म्हणजेच आस्ताद, सईस्मिता, उषा नाडकर्णी आणि शर्मिष्ठा या आठवड्याच्या घरातून घराबाहेर जाण्याच्या प्रक्रियेसाठी नॉमिनेट झाले. आज बिग बॉस सदस्यांना दोन टास्क सोपवणार आहेत. 

आज बिग बॉस मराठीच्या घरामध्ये रंगणार दोन टास्क. सदस्यांना बिग बॉस मराठीच्या घरामध्ये येऊन आता ७० दिवस झाले. याच अंदाजाचा आणि कल्पकतेचा आधार घेऊन स्वत:ची क्रमवारी सदस्यांना ठरवायची आहे. सदस्यांच्या चांगल्या कृत्याची बाहेरच्या जगात दखल घेतली गेली असेल किंवा एखाद्या कृत्याची सनसनाटी बातमी झाली असेलच. तर सदस्यांना आज आपल्यापैकी अश्या पाच सदस्यांची क्रमवारी ठरवायची आहे. ज्यावरून मेघा आणि रेशम मध्ये पहिल्या क्रमांकावर तसेच दुसऱ्या क्रमांकावर कोण असेल यावरून बरेच वाद होणार आहेत. तसेच नंदकिशोर यांचे देखील असेच म्हणणे असणार आहे कि, मी देखील मागील दोन आठवड्यामध्ये चर्चा निर्माण केली असल्याने मला देखील या पहिल्या पाच क्रमांकामध्ये जागा मिळायला हवी. तेंव्हा सदस्य आता कोणत्या सदस्याला कोणत्या क्रमांकावर उभे करणार ? कोणामध्ये वाद होणार हे बघणे रंजक असणार आहे.vlcsnap-error371

आपल्या जगावेगळ्या कृत्याची बातमी झाली कि एका रात्रीत खऱ्या अर्थाने नशीब बदलत असं म्हंटल तरी चुकीचे ठरणार नाही. यात काहीजण खरचं काहीतरी जगावेगळ करतात तर काहीजण पब्लिसिटी स्टंट म्हणून असं काहीतरी अतरंगी करतात. जे जगासमोर येण्यापासून कोणीच थांबवू शकत नाही. याच सगळ्याची ब्रेकिंग न्यूज बनते आणि सदर व्यक्ती प्रसिद्धी मिळवते. अश्याचप्रकारची जगावेगळी कृत्य करून घरातील सदस्यांना बातम्यांमध्ये यायचे आहे. त्यामुळेच आज बिग बॉस घरातील सदस्यांना जरा हटके असे “होउ दे चर्चा” हे साप्ताहिक कार्य सोपवणार आहेत.

 

“होउ दे चर्चा” या कार्यामध्ये रेशम कॅमेरा घेऊन तर मेघा हातामध्ये बूम घेऊन घरामध्ये फिरताना दिसणार आहे. तेंव्हा हे कार्य बघताना नक्कीच मज्जा येणार आहे हे नक्की…

बिग बॉस मध्ये रंगणार “कानगोष्टी” चा डाव !

 बिग बॉस मराठीमध्ये दर आठवड्याप्रमाणे आज देखील रंगणार WEEKEND चा डाव महेश मांजरेकर यांच्यासोबत. कालच्या भागामध्ये महेश मांजरेकरांनी सगळ्या सदस्यांना जाब विचारले. मग ते नंदकिशोर यांचे हुकुमशहा असतानाचे वागणे असो वा त्यांनी पुष्कर, मेघा आणि सईच्या वैयक्तिक गोष्टींवर केलेली चर्चा असो. आस्तादच्या चुकीच्या वागण्यावर तसेच त्याच्या ग्रुपलाच फक्त तो पाठीशी का घालतो त्यांच्या चुका त्याला दिसत नाही कामेघाने लपवलेले झेंडे दिसले रेशमने लपवलेले झेंडे नाही दिसले का असे प्रश्न विचारले, ज्यावर आस्तादचे म्हणणे होते हे त्याला माहितीच नव्हते. नंदकिशोर यांच्या बोलण्यावर आस्ताद आणि रेशमचे हसणे आणि त्यांच्या म्हणण्याला दुजोरा असल्याचेच जणू त्यातून व्यक्त होणे हे देखील महेश मांजरेकर यांना खटकले आणि त्यांनी रेशमला विचारले कि, का नाही नंदकिशोरला थांबवले ईतर वेळी मेघा, सई यांना टास्क मध्ये हे केलेले चुकीचे आहे हे करू नका, ते करू नकामेघाला बोलू नको असे सांगणारा आस्ताद या आठवड्यातील कॅप्टनसीच्या टास्क दरम्यान रेशमला सांगण्यास का मागे पडला कि, असे शूज मधून पाय काढण्याचा प्रयत्न करणे चुकीचे आहे महेश मांजरेकर यांनी सईला देखील सांगितले पुष्कर बाबत अथवा कोणाबाबतही बोलण्याचा हक्क आहे त्यामुळे मेघा, शर्मिष्ठाआऊ वर असे चिडणे, आपल्या मनासारखे न झाल्यास रुसणे हे बरोबर नाही. थोडक्यात काल सगळ्याच सदस्यांची महेश मांजरेकर यांनी शाळा घेतली. आज WEEKEND चा डाव मध्ये काय घडणार कोणत्या चाहत्याचा कोणासाठी फोन येणार तो काय प्रश्न विचारणार हे बघणे रंजक असणार आहे. 

आज WEEKEND चा डाव मध्ये महेश मांजरेकर सगळ्या सदस्यांसोबत “कानगोष्टी” नावाचा एक छोटासा गेम खेळणार आहेत. ज्यामध्ये प्रत्येक सदस्याने इतर सदस्यांबाबत त्याला काय वाटते हे मोठ्याने त्या कानामध्ये सांगायचे आहे. सईने आस्तादनंदकिशोर बद्दल नाराजी व्यक्त करणार आहे तर आऊला एक छान निरोप देणार आहे. ईतर सदस्य कोणाबद्दल काय बोलतील ?

 bb

रेशम बनली बिग बॉस मराठीच्या घराची नवी कॅप्टन ..

बिग बॉस मराठीच्या घरामध्ये  बिग बॉस यांनी सोपवलेले “द ग्रेट डिक्टेटर हे कार्य सुरु होते. ज्यामध्ये नंदकिशोर हुकुमशाह आणि घरातील इतर सदस्य प्रजा होती. “द ग्रेट डिक्टेटर या कार्यामध्ये प्रजा विजयी ठरली. सदस्यांच्या एकमताने नंदकिशोर, रेशम आणि सई हे तिघे या आठवड्याच्या कॅप्टनसीच्या उमेदवारीसाठी उभे राहिले. काल बिग बॉस मराठीच्या घरामध्ये रंगले “चाल – वाटचाल” हे कॅप्टनसीचे कार्य. 

 big boss 2.png

सदस्यांना ध्येयाच्या आणखीन जवळ नेण्यासाठी बिग बॉस यांनी कॅप्टनसीच्या उमेदवारांना “चाल – वाटचाल” हे कॅप्टनसीचे कार्य सोपावले. ज्यामध्ये रेशम, सई आणि नंदकिशोर हे उमेदवार होते. या टास्कमध्ये मेघा – सईचे रेशमसोबत वाद विवाद झाले. नंदकिशोर यांनी टास्कमधून काही शारीरिक कारणास्तव माघार घेतली आणि सई आणि रेशम मध्ये पुढे हा टास्क रंगत गेला. टास्कच्या दरम्यान सईच्या नकळत रेशम सईचे अर्धे पाउल शूज मधून काढण्यात यशस्वी ठरली पण तिला अडवत असताना सईच्या पाठीला हिचका बसला. तसेच तिच्या पायाला देखील इजा झालेली होती आणि पाठदुखीमुळे तिने सुध्दा बऱ्याच वेळानंतर या टास्कमधून माघार घेतली आणि रेशम या टास्कमध्ये विजयी ठरत बिग बॉस मराठीच्या घराची नवी कॅप्टन बनली. मेघापुष्करसई आणि शर्मिष्ठा मध्ये काल झालेल्या टास्क वरून थोडी नाराजी बघायला मिळणार आहे. नक्की काय आहे नाराजीचे कारण ते आजच्या भागामध्ये प्रेक्षकांना कळेलच.

मेघा- सईचे रेशम बरोबर होणार भांडण …

बिग बॉस मराठीच्या घरामध्ये  बिग बॉस यांनी सोपवलेले “द ग्रेट डिक्टेटर हे कार्य सुरु होते. ज्यामध्ये नंदकिशोर हुकुमशाह आणि घरातील इतर सदस्य प्रजा आहेत. परंतु मेघाला बिग बॉस कडून मिळालेल्या आदेशानुसार प्रजेने काल हुकुमशहा विरोधात बंड पुकारला. प्रजा हुकुमशहाच्या किमान पाच पोस्टरवर काळा रंग फासणे, हुकुमशहा यांचा पुतळा नष्ट करणे, हुकुमशहा यांच्या डोक्यावर पाणी ओतणे, हुकुमशहा यांच्यां विशेष रूममध्ये जाऊन स्मोक बॉम्ब फोडणे या बिग बॉस यांनी हुकुमशाही संपुष्टात आणण्यासाठी दिलेल्या कार्यामध्ये यशस्वी ठरली. आणि त्यामुळेच “द ग्रेट डिक्टेटर या कार्यामध्ये प्रजा विजयी ठरली. आता बिग बॉस मराठीच्या घराचा नवा कॅप्टन कोण होणार हे बघणे रंजक असणार आहे. 

बिग बॉस मराठीच्या घरामध्ये सगळे सदस्य जिंकण्यासाठी आले आहेत. आता थोडे दिवस राहिल्यामुळे घरातील प्रवास आणखीन अवघड होत जाणार आहे. त्यासाठीच ध्येयाच्या आणखीन जवळ नेण्यासाठी बिग बॉस कॅप्टनसीच्या उमेदवारांना “चाल – वाटचाल” हे कॅप्टनसीचे कार्य आज सोपवणार आहेत. ज्यामध्ये रेशमसई आणि नंदकिशोर हे उमेदवार असणार आहेत. या टास्कमध्ये मेघा आणि रेशम मध्ये वाद होणार आहेत. तसेच सई आणि रेशम मध्ये देखील बरीच बाचाबाची बघायला मिळणार आहे.big boss

Create a website or blog at WordPress.com

Up ↑