लॉकडाऊन मधील घरगुती हिंसेवर डॉक्टर डॉन सांगतोय त्याचा फंडा !!

 

कोरोना आणि हे सुरु असलेले लॉक डाऊन आता लोकांना सवयीचे झाले आहे अर्थात लवकरच हे सर्व संपेल आणि एक नवीन आनंदी सुरुवात सर्वांनाच करायला मिळेल . अनेक नवीन चांगल्या गोष्टी सुरु होतीलच मात्र त्यासाठी आता या वेळेला सर्वांनीच एकमेकांशी चांगलं वागणं महत्वाचं आहे . लोकडाऊन आणि वर्क फ्रॉम होम मुळे कौटुंबिक हिंसाचार वाढल्याची धक्कादायक माहिती सध्या सर्वत्र पाहायला मिळत आहे .यासाठी आता झी युवा वाहिनीवरील डॉक्टर डॉन या मालिकेतील देवा म्हणजेच देवदत्त नागे एक विशेष कविता घेऊन आला आहे.

घरगुती हिंसाचार ह्याविषयी कोणीही काहीच बोलत नसले तरीही हा विषय खरंच गंभीर आहे. आणि अनेक घरात हा सुरु आहे .सर्वच जाती, धर्म आणि वर्गातील बायकांवर हिंसाचार होताना दिसतो. घरातील हिंसाचारामुळे बायकांना शारीरिक आणि मानसिक ञास आणि वेदना गप्प बसून सहन कराव्या लागतात. बायकांनी या गप्प बसा संस्कृतीचा आपल्या आयुष्याचा एक भाग मानला आहे. याला छेद देऊन आज पुढे येण्याची गरज आहे . मारहाण हे स्ञियांवरील हिंसेचं उघड रूप आहे, पण फक्त मारहाण म्हणजे हिंसा नाही. मानसिक जाच, शिवीगाळ, अपमानकारक, हीन वागणूक, लैंगिक छळ, जबरदस्तीने शारीरिक संबंध, छेडछाड ही देखील हिंसाच आहे. त्यामुळे देवा ने अगदीच हलक्या फुलक्या अंदाजात या लॉक डाऊन मध्ये घरात अडकलेल्या जोडप्यावर कविता केली आहे. तर तुम्हाला ही कविता कशी वाटते ते देवाला त्याच्या सोशल मीडिया अकाउंट द्वारे कळवा.

WhatsApp Image 2020-05-12 at 10.39.12

हि श्टोरी हाये घरात अडकलेल्या एका जोडीची खरंतर काही घरातल्या डोमेस्टिक वोईलन्स ची

सर्वाना माहीतेय की जगात सर्वत्र पसरला आहे कोरोना
पण आपल्या या काही जोडीचं मात्र रोजच चालू आहे रोना नि धोना..

पण इलाज काय? ह्यांचं मॅटर म्हणजे तुझं माझं जमेना आणि तुझ्या वाचून करमेना…

पण डॉक्टर डॉन म्हणतो हा लय महत्वाचा हाये टाईम…
जर समजून नाय घेतलं एकमेकांना, तर व्हावं लागेल दूर एकमेकांपासून टोटल काॅरंटाईन .

आता लग्न केलंत तर प्रेम पण करायचं लय , काळजी घ्यायची भारी…
कोरोनाशी लढायची करायची एकत्र तयारी..
अहो घ्या सबुरीने सध्या, सरकार करतेय त्यांचं काम ते आपलं काम थोडं हाये..
मग देवा भाई तुमाला पण बोलेल , श्रीखंड लय गोड हाये…

देवा भाई बोलतो घरात नाय नडायचं , मॅटर करा सर्व क्लोज..
ही वेळ आहे एकमेकांना सांभाळायची , भांडण काय हे संपल्यावर करू शकता दररोज !

घरात रहा सेफ , कारण बाहेर पडला तो खपला..
प्रेम करा , टेक केअर करा आणि बघा झी युवा आपला !

एक हात मदतीचा… अभिनेता आशुतोष गोखले जपतोय सामाजिक बांधिलकी

कोरोना नामक संकट जगावर आलं आणि घड्याळाच्या काट्यावर धावणाऱ्या आपल्या प्रत्येकाच्या आयुष्याला कुठेतरी ब्रेक लागला. या आजाराची भीती प्रत्येकाच्याच मनात आहे. आजूबाजूचं वातावरण जरी नकारात्मक असलं तरी माणुसकीचं दर्शन घडवणाऱ्या घटना आयुष्याला नवी उभारी देतात. अभिनेता आशुतोष गोखले सध्याच्या कठीण काळात सामाजिक बांधिलकी जपण्याचा मनापासून प्रयत्न करतो आहे.

AASHUTOSH 2

स्टार प्रवाहवरील रंग माझा वेगळा या मालिकेतून कार्तिकच्या रुपात तो प्रेक्षकांच्या भेटीला आला. कोरोनाच्या संकटामुळे शूटिंग थांबलं असलं तरी आशुतोषने हाती घेतलंल काम अविरत सुरु आहे. खान चाहिए डॉट कॉम या संस्थेसोबत तो जोडला गेलाय. ही संस्था मुंबईतील बेघर आणि या कठीण काळात उपासमार होत असलेल्या गरजूंना जेवण पोहोचवण्याचं काम करते. गेल्या काही दिवसांपासून आशुतोष या संस्थेसाठी स्वयंसेवक म्हणून काम करतोय. ही संस्था दररोज ७५ हजारांहून अधिक फूड पॅकेट्सचं वाटप करते. आशुषोत दररोज वांद्रे ते दहिसर लिंक रोड, ओशिवरा, जुहू, गोरेगाव अश्या भागातील गरजूंना अन्न पोहोचवतो. अर्थात सरकारने सांगितलेल्या सर्व नियमांचं पालन करत आणि आवश्यक ती काळजी घेत आशुतोष हे काम नित्यनेमाने करतो.

AASHUTOSH 1

या उपक्रमाविषयी सांगताना आशुतोष म्हणालाआपण ज्या समाजात रहातो त्या समाजाचं देणं लागतो. याच जाणीवेतून हा उपक्रम हाती घेतला. समाजभान जपण्याची ही एक चांगली संधी आहे. माझ्या कुटुंबियांचा देखिल मला पाठिंबा आहे. कोरोनाचा संकट लवकरच सरेल आणि पुन्हा शूटिंगला सुरुवात होईलच. पण सध्या वेळ सत्कार्णी लागत असल्याचा आनंद आहे.

 

अरुंधतीत स्वत:ला शोधण्याचा प्रयत्न -मधुराणी गोखले प्रभुलकर

आई कुठे काय करते या मालिकेविषयी काय सांगाल?

आई आपल्या आयुष्याचा एक अविभाज्य भाग. आई या शब्दाभोवतीच इतक्या भावभावना जोडलेल्या असतात. अगदी कवितेच्या माध्यमातून सांगायचं झालं तर मी म्हणेन, ‘तुझ्या पोटावरच्या माझ्या जन्मखुणा तू दाखवल्या नाहीस कधी मातृत्वाचे उपकार म्हणून, ठेवला नाहीस जमाखर्च पदारआडून दिलेल्या दानाचा आणि पदर मोडून दिलेल्या धनाचा, तुझ्या हातावर नाही आहेत आता खुणा मला न्हाऊ माखु घातल्याच्या, तुझ्या डोळ्यात नाही आहेत सुगावे माझ्या दुखण्या खुपण्यात रात्री जागल्याचे…इतकी कशी बेहिशेबी गं तू? मी मात्र तुला आणलेल्या औषधांचा हिशोब ठेवलाय काल डायरीत… सांग ना आई कसा उतराई होऊ सांगना आई तुझी आई कसा होऊ…’या ओळीच खरतर खूप काही सांगून जातात. आपल्यासाठी आयुष्यभर झटणाऱ्या आणि तरीही कायम दुर्लिक्षित राहणाऱ्या आईची गोष्ट म्हणजे ‘आई कुठे काय करते’ ही मालिका. या मालिकेचं वेगळेपण जसं नावात आहे तसंच सादरीकरणामध्येही आहे. प्रोमोपासून ते जपण्याचा आम्ही प्रयत्न केलाय. मालिका पहाताना हा वेगळेपणा तुम्हाला नक्कीच जाणवेल. अर्थातच याचं श्रेय जातं स्टार प्रवाह वाहिनी, निर्माते राजन शाही, दिग्दर्शक रवी करमरकर, आमची लेखिका रोहिणी निनावे आणि मालिकेच्या संपूर्ण टीमला.

MADHURINI PIC 2

या मालिकेच्या निमित्ताने तुमचं मालिका विश्वात कमबॅक होत आहे त्याविषयी…

खरंय जवळपास १० वर्षांनंतर मी मालिका करते आहे. अर्थातच १० वर्षांचा हा गॅप आईपणासाठीच घेतला होता. मला सहा वर्षांची मुलगी आहे. तिच्या जन्मानंतर तिला वेळ द्यायचं हे मी ठरवलं होतं आणि तिच्या संगोपनासाठी पूर्णपणे स्वत:ला झोकून दिलं. आई कुठे काय करते मालिकेचा विषय आणि त्याची मांडणी मला खूप आवडली आणि मालिका करण्याचा मी निर्णय घेतला.

मालिकेत तुम्ही साकारत असलेल्या भूमिकेविषयी काय सांगाल?

या मालिकेत मी अरुंधतीची भूमिका साकारते आहे. अरुंधती प्रचंड हळवी आहे. सर्वांवर भरभरुन प्रेम करणारी. माझा जन्म सर्वांना प्रेम देण्यासाठी झालाय, त्यामुळे मी चिडणार नाही कुणाच्याही बोलण्याचा त्रास करुन घेणार नाही असं तिने मनाशी पक्क ठरवलं आहे. तिचं समर्पण तिचा सोशिकपणा ही तिची शक्तीस्थानं आहेत. मनाने अतिशय निर्मळ आणि भाबडी असणाऱ्या या अरुंधतीत प्रत्येकजण आपली आई नक्कीच शोधेल. खास बात सांगायची म्हणजे मला आणि अरुंधतीला जोडणारा समान धागा म्हणजे गाण्याची आवड. मला गाण्याची आवड आहेच अरुंधतीलाही गाण्याची आवड आहे. त्यामुळे भूमिका साकारताना मी अरुंधतीत स्वत:ला शोधण्याचा प्रयत्न करते.

तुमच्या आईविषयी…

माझी आई हा माझ्या आयुष्याचा महत्त्वपूर्ण भाग आहे. माझी आई शास्त्रीय संगीत गायिका आहे. पण आपल्या कलेला नेहमीच दुय्यम स्थान देऊन तिने आपलं मातृत्व आणि सर्व जबाबदाऱ्या मनापासून पार पाडल्या. घरसंसार सांभाळताना तिची आवड मागे पडली याची मला खंत आहे. आईचं समर्पण शब्दात व्यक्त करणं केवळ अशक्य आहे. त्यामुळे घरासाठी, मुलांसाठी आयुष्यभर राबणाऱ्या या माऊलीचं महत्त्व पटवून देणारी ‘आई कुठे काय करते’ ही मालिका म्हणूनच माझ्यासाठी खुप खास आहे.

जेव्हा पत्रकारांच्या मातोश्रींचा सन्मान होतो…! 

– राज चिंचणकर

       मनोरंजन क्षेत्रात कार्यरत असलेल्या पत्रकारांच्या मातोश्रींच्या सन्मानाचा दुर्मिळ योग ‘आई कुठे काय करते?’ या मालिकेच्या निमित्ताने जुळून आला आणि ‘आई’ नावाचा संवेदनशील कोपरा अधिकच हळवा झाला. आईपणाच्या भावविश्वाचा मागोवा घेणारी ‘आई कुठे काय करते?’ ही मालिका ‘स्टार प्रवाह’ या वाहिनीवर सुरु झाली आहे आणि या मालिकेच्या टीमने असा आगळावेगळा सन्मान करत अनोखा पायंडा पाडला.

Raj1

‘आई कुठे काय करते?’ या मालिकेत आईची, अर्थात अरुंधतीची भूमिका अभिनेत्री मधुराणी गोखले-प्रभुलकर साकारत आहे. मिलिंद गवळी, अर्चना पाटेकर, दीपाली पानसरे, किशोर महाबोले आदी कलाकारही या मालिकेत भूमिका रंगवत आहेत. या मालिकेच्या शुभारंभाच्या निमित्ताने, या टीमने थेट पत्रकारांच्या मातोश्रींनाच साद घालण्याची संकल्पना मांडली आणि ती प्रत्यक्षातही आणली.

त्याप्रमाणे, पत्रकारांच्या मातोश्रींचा सन्मान खुद्द त्या-त्या पत्रकारांच्या हस्ते करण्यात आला आणि या सोहळ्यात आईपणाचा वेगळा पैलू उलगडला गेला. रोजच्या कामाच्या धावपळीत दुर्लक्ष होत असलेल्या आणि ‘आई कुठे काय करते?’ या संभ्रमात अडकलेल्यांच्या दृष्टीसमोरचा पडदा यावेळी आईच्या ममत्वात पार चिंब होऊन गेला. मालिकेतल्या मधुराणी गोखले-प्रभुलकर, मिलिंद गवळी, दीपाली पानसरे या कलाकारांसह, ‘स्टार प्रवाह’ वाहिनीचे प्रोग्रामिंग हेड सतीश राजवाडे हे सुद्धा यावेळी उपस्थित होते. या मंडळींनी सांगितलेल्या त्यांच्या ‘आई’बद्दलच्या आठवणींनी, या चमकत्या ताऱ्यांच्या आयुष्यातल्या सर्वसामान्यपणाचे प्रतिबिंबही या सोहळ्यात मुक्तपणे सांडत गेले.

स्वराज्य बांधणीची यशोगाथा सांगण्यासाठी येतेय ‘स्वराज्यजननी जिजामाता’

सरदारांची वर्दळ, युध्दाचे डावपेच, सल्लामसलत, न्यायनिवाड्यात जाणारा दिवस तर युध्दकलांचं प्रशिक्षण अशा वातावरणात पार पडलेलं जिजाचं बालपण. पारतंत्र्यात असलेल्या रयतेची वेदना बालपणीच असह्य झालेल्या जिजांनी  मनोमनी या एकंदर परिस्थितीशी दोन हात करण्याचा निर्णय घेतला होता. थोड्या फार फरकाने एका विचाराच्या असणाऱ्या जिजा आणि शहाजींचं लग्न झालं आणि जिजांच्या आयुष्यात  स्वातंत्र्याची पहाट होऊ लागली. त्यांचं  कर्तब थोर होतंच त्यात आपलं स्वराज्याचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्या  कटिबध्द  ही होत्या .  त्यांच्या  पोटी जन्माला आलेल्या शिवबाला युध्दकलेत पारंगत करणं असेल किंवा स्त्रियांचा सन्मान, इतकंच नव्हे तर जाती धर्मांमध्ये फरक न करता सगळ्यांना समान वागणूक देण्याचे संस्कार ही शिवबांवर जिजाऊने केले.  शहाजी राजांच्या गैरहजेरीत मातृत्त्वाची जबाबदारी पार  पाडतानाच  जनतेचे प्रश्न सोडवण्याचं काम ही त्यांनी  चोखपणे  पार  पाडलं. शिवबानं बरोबरच अवघ्या मराठी  मुलखाचे भविष्य घडवणाऱ्या  अशा थोर माऊलीची गाथा सध्या सोनी मराठीच्या स्वराज्यजननी जिजामाता या मालिकेतून प्रेक्षकांसमोर येत आहे.

 

गेल्या काही दिवसांत या मालिकेच्या माध्यमातून समोर आलेलं जिजाऊचं हे कणखर व्यक्तिमत्त्व आता त्याच्या पुढच्या टप्प्यात पाऊल ठेवणार आहे. जिजाऊच्या बालपणापासून ते आताच्या  कणखर धैर्यशाली जिजाऊ यांचा हा अनोखा प्रवास ” स्वराज्यरजननी  जिजामाता ” या मालिकेतून आपल्या समोर उलगडणार आहे . बालपणीच  जिजाऊ च्या   मनी रोवलं गेलेलं स्वराज्याचं बीज मूर्तरूपात पाहण्यासाठी तिची धडपड डॉ. अमोल कोल्हे आणि जगदंब क्रिएशन्स निर्मित “स्वराज्यजननी जिजामाता” मालिकेतून प्रेक्षकांना पाहता येणार आहे. जिजाशहाजीचं बालपण आता सरलं असून मोठ्या जिजाची भूमिका आता अमृता पवार या मालिकेत साकारत आहे. तर  शहाजींच्या भूमिकेत अभिनेता रोशन मनोहर विचारे दिसणार आहे.

‘बने’ कुटुंबात येणार खास पाहुणा

टेलिव्हिजन क्षेत्रात नेहमीचं काही न काही अनोखे विषय हे मालिकांच्या माध्यमातून मांडले जातात . आपल्या आजूबाजूला अश्या अनेक गोष्टी घडत असतात तर हे विषय थोडया कल्पक रीतीने लोकांसमोर घेऊन येण्यासाठी सोनी मराठी वरील ” ह.म.बने. तु.म.बने ” ही मालिका अग्रगण्य आहे . समाजात घडणारे अनेक विषय योग्य प्रकारे हाताळून लोकांना या मालिकेतून सामाजिक संदेश देण्यासाठी ही मालिका नेहमी काही न काही नव्या गोष्टी लोकांसमोर घेऊन येते . लवकरचं या मालिकेत एक खास आणि कमालीचा विषय मांडण्यात येणार असून या मालिकेच्या माध्यमातून खरा खुरा तृतीयपंथी आपल्या सगळ्यांच्या भेटीला येणार आहे . बने कुटुंबिय नेहमीच आपल्याला त्यांच्या कमालीच्या भूमिका मधून भेटीला येत असतात आता असा काहीसा अनोखा विषय या मालिकेत लवकरचं आपल्याला बघायला मिळणार आहे .

IMG-20191119-WA0001

आजवर आपण अनेक चित्रपटात आणि वेबसेरीज मध्ये तृतीयपंथीना बघत आलो आहोत तर आजवर कुठल्या ही मालिकेत किंवा चित्रपटात खऱ्या तृतीयपंथीय माणसाने काम केलं नसून लवकरचं आपल्याला एक खरा खुरा तृतीयपंथी या मालिकेत काम करताना दिसणार आहे . समाजातील एक अनोखा घटक म्हणून तृतीयपंथी लोकांकडे पाहिलं जातं . तर नेहमीच वेगळ्या विषयांना कल्पक रीतीने मांडून त्यांकडे वेगळ्या दृष्टिकोनातून भाष्य करणारी मालिका म्हणजे ” ह.म.बने. तु.म.बने ” .

IMG-20191119-WA0000या मालिकेच्या निमित्ताने एका ” तृतीयपंथीय ” ला मालिकेतून प्रकाशझोतात आणण्याचं काम मालिका करणार आहे . तृतीयपंथी समाजासाठी ही नक्कीच अभिमास्पद अशी बाब ठरणार आहे . मालिकेत तुलिकाचा जुना तृतीयपंथी मित्र तिला अचानक भेटतो आणि या मित्राला तुलिकाच्या घरी जाण्याची उत्सुकता आहे पण तुलिकाच्या या अनोख्या मित्राला तिच्या घरचे कसे भेटणार आणि ते या मित्राचं स्वागत करणार का ? उद्याच्या भागात नक्की पाहता येईल

सतीश राजवाडेंचा ‘जिवलगा’ प्रवाह…! 

– राज चिंचणकर
       अनेक यशस्वी मालिका व चित्रपटांचे दिग्दर्शक; तसेच अभिनेते म्हणून ओळख असलेले सतीश राजवाडे यांनी ‘स्टार प्रवाह’चे कन्टेन्ट व प्रोग्रामिंग हेड म्हणून जबाबदारी स्वीकारली; तेव्हाच हा प्रवाह वेगळ्या दिशेने वाहायला लागणार याचा अंदाज आला होता. त्यांनी हा अंदाज अजिबात न चुकवता ‘जिवलगा’ या नव्या दैनंदिन मालिकेची घोषणा करत, या प्रवाहाला निश्चित दिशा दिली आहे. त्यांची ही मालिका ८ एप्रिलपासून छोट्या पडद्यावर रुजू होत आहे.
Satish R.
       या मालिकेची म्हटली तर बरीच वैशिष्ट्ये सांगता येतील. महत्त्वाचे म्हणजे, पराग कुलकर्णी यांनी लिहिलेली या मालिकेची कथा शेवटपर्यंत ‘तयार’ आहे. म्हणजेच, या कथेला निश्चित अशी कालमर्यादा असणार हे उघड आहे. विशेष म्हणजे स्वप्नील जोशी, अमृता खानविलकर, सिद्धार्थ चांदेकर व मधुरा देशपांडे; अशा सध्याच्या काळात ‘बिझी’ असलेल्या कलाकारांची या मालिकेत प्रमुख भूमिकांवर लागलेली वर्णी लक्षात घेता, या मालिकेचा ‘पसारा’ वाढणार नाही याची काळजी सतीश राजवाडे यांनी अर्थातच घेतली असणार. या मालिकेची मूळ संकल्पनाही त्यांचीच असली, तरी दिग्दर्शकाच्या खुर्चीत मात्र ते नाहीत. प्रेमकथेच्या वळणाने जाणाऱ्या या मालिकेच्या दिग्दर्शनाची जबाबदारी उमेश नामजोशी यांच्यावर सोपवण्यात आली आहे. विद्याधर पाठारे या मालिकेची निर्मिती करत आहेत.
       या मालिकेद्वारे स्वप्नील जोशी व सिद्धार्थ चांदेकर बऱ्याच वर्षांनी छोट्या पडद्यावर दिसणार आहेत. तर, अमृता खानविलकरची ही पहिलीच दैनंदिन मालिका आहे. सेलिब्रिटी स्टारकास्ट, आश्वासक निर्मिती, ‘स्टार प्रवाह’सारखे चॅनेल आणि या सर्वांच्या मागे घट्ट पाय रोवून उभे असलेले अनुभवी सतीश राजवाडे; ही सगळी भट्टी या मालिकेच्या निमित्ताने जुळून आली असल्याने या ‘जिवलगा’ची उत्सुकता अधिकच वाढली आहे.

निवेदिता सराफ साकारणार ‘रानीदेवी’

आपल्या कसदार अभिनयाने, सात्विक सौंदर्याने आणि मनमोहक हास्याने गेली काही दशकं प्रेक्षकांच्या मनात आपलं अढळ स्थान निर्माण करणारा एक मराठी चेहरा पुन्हा एकदा हिंदी मालिकेच्या पडद्यावर झळकणार आहे.

अनेक मराठी सिनेमे आणि नाटकांमधून स्वतःच्या अभिनयाचा अमीट ठसा उमटवल्यानंतर अभिनेत्री ‘निवेदिता सराफ’ कलर्स हिंदी वरील ‘केसरीनंदन’ या मालिकेत ‘रानीदेवी’ या मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. दोन वर्ष एका सुप्रसिद्ध मराठी मालिकेत काम केल्यानंतर पुन्हा एकदा हिंदी मालिकेच्या माध्यमातून ‘निवेदिता सराफ’ प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. स्त्रियांचं विश्व चूल आणि मूल इतकंच मर्यादित ठेवणाऱ्या समाजातली एका पेहलवानाची छोटी मुलगी एक भव्य स्वप्न पहाते आणि भविष्यात महिला कुस्तीगीर म्हणून प्रसिद्धी मिळवत, ते स्वप्न सत्यात उतरवते. त्या मुलीचा संघर्ष ‘केसरीनंदन’ या मालिकेतून पहायला मिळणार आहे.

IMG-20181217-WA0018

‘मालिकेची कथा राजस्थानच्या धरतीवर घडणार असल्यामुळे माझी वेशभूषा ही पारंपारिक राजस्थानी स्त्री प्रमाणेच असून आमच्या प्रॉडक्शन हाउस ने वेशभूषा आणि सेट यावर खूप मेहनत घेतली आहे. सेटवरचे सगळेच कलाकार मनमोकळे आहेत,एकत्र काम करताना आम्ही खूप धमाल करतो, त्यामुळे मालिकेच्या सेटवर अगदी घराप्रमाणे खेळीमेळीचं वातावरण असतं. या मालिकेत कुटुंबाच्या सुखासाठी,आनंदासाठी झटणाऱ्या स्त्रीची भूमिका मला साकारायची आहे. पण त्याचसोबत स्त्रियांकडे बघण्याच्या पारंपारिक दृष्टीकोनाला छेद देणाऱ्या अशा मालिकेचा एक भाग असणं ही माझ्यासाठी आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट आहे’, अशा भावना निवेदिता सराफ यांनी व्यक्त केल्या.

कलर्स हिंदी वरच्या ‘केसरीनंदन’ मालिकेत निवेदिता सराफ या मानव गोहिल आणि अंकित अरोरा या दोघांच्या आईची भूमिका साकारणार आहेत.

‘ललित २०५’ मधील भैरवीबद्दलच्या या गोष्टी तुम्हाला माहित आहेत का?

BHAIRAVI 3स्टार प्रवाहवरील ‘ललित २०५’ या मालिकेला प्रेक्षकांचं भरभरुन प्रेम मिळतंय. या मालिकेत भैरवीची भूमिका साकारणाऱ्या अमृता पवारबद्दलच्या काही खास गोष्टी जाणून घेऊयात.

 

  • अमृता खो-खो या खेळामध्ये पारंगत असली तरी अभिनय हाच तिचा श्वास आहे. अभिनयाच्या याच वेडापायी तिची खेळामधली आवड मागे पडली. कॉलेजमधून एकांकिका करत  असतानाच स्टार प्रवाहच्या ‘दुहेरी’ या मालिकेत काम करण्याची अमृताला संधी मिळाली आणि तिथूनच तिच्या अभिनय वाटचालीला सुरुवात झाली. ‘ललित २०५’ मधून भैरवीच्या रुपात ती पहिल्यांदाच मुख्य भूमिकेत झळकली. अमृताने नृत्याचंही प्रशिक्षण घेतलंय.
  • विखुरलेल्या राजाध्यक्ष कुटुंबाला एकत्र बांधून ठेवणारी भैरवी म्हणजे जुन्या आणि नव्या विचारांमधला दुवा. भैरवीप्रमाणेच अमृताही आपल्या कुटुंबाला पहिलं प्राधान्य देते. तिच्या मते नाती जपणं ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. भैरवी प्रमाणेच अमृताही खऱ्या आयुष्यात रोखठोक आहे. आपल्या मनातली गोष्ट स्पष्टपणे मांडायला हवी असं तिला वाटतं.IMG_1663
  • अमृता आपल्या फिटनेसच्या बाबतीत प्रचंड जागृक आहे. सकस आहार आणि नियमित व्यायाम हेच आपल्या फिटनेसचं रहस्य असल्याचं ती सांगते. पण फिटनेसच्या हट्टापायी मन मारुन जगणं तिला पटत नाही. एखादा पदार्थ खाण्याची इच्छा झाली तर मी आवर्जून खाते असं अमृताने सांगितलं.

कवी ढंगाचा महानेता रामदास आठवले आणि महाराष्ट्राचा लाडका गायक आनंद शिंदे एकाच मंचावर

vlcsnap-error229 

सगळ्यानाच माहिती आहे रामदास आठवले यांना उत्सुफुर्त कविता सुचतात आणि तो त्यांचा हातखंडच आहे… कार्यक्रमामध्ये रामदास आठवले यांनी सांगितले,त्यांना सभेमध्येपार्लमेंट मध्ये बसून कविता लिहण्याची सवय आहे… तसेच आनंद शिंदे यांना त्यांच्या गाण्यांचा नेमका अर्थ मकरंद यांनी विचारला… तर रामदास आठवले यांना विचारले शोले सिनेमामध्ये कोणती भूमिका साकारायला आवडली असती त्यावर रामदासजी म्हणाले अमिताभ बच्चन यांची तर धर्मेंद्रची उद्धव ठाकरे आणि गब्बरचीशरद पवार यांनी साकारली असती… आनंद शिंदे यांनी त्यांच्या लहानपणाची आठवण सांगताना म्हणाले “माझ्या बारश्याला माझ्या वडीलांनी मला १०,००० रुपयांवर झोपवले होते… मला लहान असताना कधीच वाटले नाहीगायक होईन मला वाटलं होतं किम्युन्सिपालटी मध्ये काम करेन… पण माझ्यात प्रल्हाद शिंदे यांचे रक्त….त्यामुळेच आज मी गायक आहे…

चक्रव्ह्यू राउंडमध्ये आनंद यांना आदर्श शिंदेची एक आवडती आणि एक खटकणारी गोष्ट विचारली असता ते म्हणाले “आदर्शने मला जिंवत ठेवले आहे” आता असे ते का म्हणाले हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला कार्यक्रम बघायला लागेल… तसेच खटकणारी गोष्ट सांगताना ते म्हणाले “तो खूप भित्रा आहे” … इथेच  हा प्रश्न उत्तरांचा खेळ संपला नाही तर मकरंद यांनी आनंद शिंदे आणि रामदास आठवले यांना काही प्रश्न विचारले … आनंद शिंदे यांना विचारलेत्यांच्या आवडीचा गायक कोण – मिलिंद शिंदे कि आदर्श शिंदे ?  आवडता नेता कोण – प्रकाश आंबेडकर कि रामदास आठवले तसेच आवडता संगीतकार कोण – अवधूत गुप्ते कि अजय अतुल ?रामदास आठवले यांना विचारले आवडता नेता कोण – राजा ढाले कि नामदेव ढसाळ उत्कृष्ट मुख्यमंत्री कोण – शरद पवार कि देवेंद्र फडणवीस तसेच कोणता पक्ष पुरोगामी बीजेपी कि कॉंग्रेस ? तसेच सभा जिंकून घेणारे कोण – नरेंद्र मोदी कि बाळासाहेब ठाकरे ?  याची उत्तर तुम्हाला लवकरच मिळणार आहेत…

हि धमाकेदार जोडी येतेय अस्सल पाहुणे इरसाल नमुने मध्ये येत्या गुरु – शुक्र रात्री ९.३० वाजता तुमच्या भेटीला

Create a website or blog at WordPress.com

Up ↑