कवी ढंगाचा महानेता रामदास आठवले आणि महाराष्ट्राचा लाडका गायक आनंद शिंदे एकाच मंचावर

vlcsnap-error229 

सगळ्यानाच माहिती आहे रामदास आठवले यांना उत्सुफुर्त कविता सुचतात आणि तो त्यांचा हातखंडच आहे… कार्यक्रमामध्ये रामदास आठवले यांनी सांगितले,त्यांना सभेमध्येपार्लमेंट मध्ये बसून कविता लिहण्याची सवय आहे… तसेच आनंद शिंदे यांना त्यांच्या गाण्यांचा नेमका अर्थ मकरंद यांनी विचारला… तर रामदास आठवले यांना विचारले शोले सिनेमामध्ये कोणती भूमिका साकारायला आवडली असती त्यावर रामदासजी म्हणाले अमिताभ बच्चन यांची तर धर्मेंद्रची उद्धव ठाकरे आणि गब्बरचीशरद पवार यांनी साकारली असती… आनंद शिंदे यांनी त्यांच्या लहानपणाची आठवण सांगताना म्हणाले “माझ्या बारश्याला माझ्या वडीलांनी मला १०,००० रुपयांवर झोपवले होते… मला लहान असताना कधीच वाटले नाहीगायक होईन मला वाटलं होतं किम्युन्सिपालटी मध्ये काम करेन… पण माझ्यात प्रल्हाद शिंदे यांचे रक्त….त्यामुळेच आज मी गायक आहे…

चक्रव्ह्यू राउंडमध्ये आनंद यांना आदर्श शिंदेची एक आवडती आणि एक खटकणारी गोष्ट विचारली असता ते म्हणाले “आदर्शने मला जिंवत ठेवले आहे” आता असे ते का म्हणाले हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला कार्यक्रम बघायला लागेल… तसेच खटकणारी गोष्ट सांगताना ते म्हणाले “तो खूप भित्रा आहे” … इथेच  हा प्रश्न उत्तरांचा खेळ संपला नाही तर मकरंद यांनी आनंद शिंदे आणि रामदास आठवले यांना काही प्रश्न विचारले … आनंद शिंदे यांना विचारलेत्यांच्या आवडीचा गायक कोण – मिलिंद शिंदे कि आदर्श शिंदे ?  आवडता नेता कोण – प्रकाश आंबेडकर कि रामदास आठवले तसेच आवडता संगीतकार कोण – अवधूत गुप्ते कि अजय अतुल ?रामदास आठवले यांना विचारले आवडता नेता कोण – राजा ढाले कि नामदेव ढसाळ उत्कृष्ट मुख्यमंत्री कोण – शरद पवार कि देवेंद्र फडणवीस तसेच कोणता पक्ष पुरोगामी बीजेपी कि कॉंग्रेस ? तसेच सभा जिंकून घेणारे कोण – नरेंद्र मोदी कि बाळासाहेब ठाकरे ?  याची उत्तर तुम्हाला लवकरच मिळणार आहेत…

हि धमाकेदार जोडी येतेय अस्सल पाहुणे इरसाल नमुने मध्ये येत्या गुरु – शुक्र रात्री ९.३० वाजता तुमच्या भेटीला

गुन्हेगारी विश्वाचा खात्मा करण्यासाठी येत आहेत ‘स्पेशल ५’

आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या असंख्य गुन्ह्यांच्या घटना आपण दररोज ऐकत असतो, पहात असतो. या घटना नकळतपणे आपल्याही मनात भीतीचं वातावरण निर्माण करतात. इतरांच्या बाबतीत घडणारे हे गुन्हे आपल्याही बाबतीत घडले तर? या विचाराने आपलं मन अस्थिर व्हायला लागतं. पण यापुढे असं होणार नाही. कोणतीही गुन्हेगारी प्रवृत्ती तुम्हाला त्रास देऊ शकणार नाही. कारण या गुन्हेगारी प्रवृत्तीचा खात्मा करण्यासाठी येतेय ‘स्पेशल ५’ ची टीम. आपल्या आजूबाजूला भीतीदायक वातावरण असताना ‘स्पेशल ५’ची ही टीम तुमच्यासाठी आशेचा किरण  ठरेल.

SPL 5 JPG 01.00003033

सदरक्षणाय खलनिग्रहणाय असं म्हणत देशाची सेवा करण्याचा यांनी वसा घेतलाय. म्हणूनच तर पाच रांगड्या व्यक्तिमत्त्वांची ही टीम खऱ्या अर्थाने स्पेशल आहे. ‘स्पेशल ५’ या मालिकेत अजय पुरकर इन्सपेक्टर यशवंत इनामदार ही व्यक्तिरेखा साकारणार आहेत तर गौरी महाजन दिसेल सब इन्सपेक्टर विद्या शिंदेच्या भूमिकेत आणि सब इन्सपेक्टर अर्जुन भोसलेच्या भूमिकेत दिसेल अभिनेता समीर विजयन. या तीनही कलाकारांच्या प्रोमोजनी सध्या सर्वांचच लक्ष वेधून घेतलंय त्यामुळे या टीममधले उर्वरित दोघं कोण असतील याची उत्सुकता आहे.‘

१० डिसेंबरपासून ‘स्पेशल ५’ टीम प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे.

नील-भैरवीच्या नात्यात नवा ट्विस्ट

‘स्टार प्रवाह’वरील ‘ललित २०५’ या मालिकेत नाट्यमय वळण येऊ घातलंय. नील आणि भैरवीमधलं नातं खुलत असतानाच आता मालिकेत ऋषभ या नव्या पात्राची एण्ट्री होणार आहे. या नव्या पात्राचा नेमका उद्देश काय आहे हे लवकरच उलगडेल पण ऋषभच्या येण्याने नील आणि भैरवीच्या नात्यात नवं वादळ येणार हे मात्र नक्की. नील-भैरवीचं तीन महिन्यांचं लग्नाचं कॉण्ट्रॅक्टही आता संपत आलंय. पण मनाने मात्र हे दोघंही जवळ येत आहेत. नीलच्या कठीण काळात भैरवी त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिली ही गोष्ट नीलच्या मनात खोलवर रुजलीय. याचमुळे भैरवीबद्दल त्याच्या मनात प्रचंड आपुलकी आणि प्रेम निर्माण होत आहे. हे प्रेम व्यक्त करण्याचा नील प्रयत्न करत असतानाच आता ऋषभच्या येण्याने सर्व गोष्टी बदलणार आहेत.

IMG_9284

दिवंगत अभिनेते विजय चव्हाण यांचा मुलगा वरद चव्हाण ऋषभची भूमिका साकारणार आहे. याआधी स्टार प्रवाहच्या ‘रुंजी’ आणि ‘लेक माझी लाडकी’ या मालिकेत तो दिसला होता.

ऋषभच्या व्यक्तिरेखेविषयी सांगताना वरद म्हणाला, ‘ऋषभ हा मानसोपचार तज्ञ आहे. या भूमिकेला वेगवेगळ्या छटा आहेत. त्यामुळे काम करताना खूप मजा येतेय. शिवाय ‘ललित २०५’ची टीम प्रचंड उत्साही आहे. सुहास जोशींसोबत काम करण्याचं माझं स्वप्न होतं जे या मालिकेच्या निमित्ताने पूर्ण होतंय. स्टार प्रवाहच्या मालिकांमध्ये काम करताना नेहमी आपलेपणा वाटतो, म्हणूनच ऋषभचं पात्र रंगवताना मला प्रचंड आनंद होतोय.’

ऋषभच्या येण्याने आता ‘ललित २०५’ च्या कुटुंबात नेमकी काय उलथापालथ होणार? हे पाहणं उत्सुकतेचं असेल. तेव्हा पाहायला विसरु नका ‘ललित २०५’

माझ्यासाठी नवरात्र खास – हर्षदा खानविलकर

Ok2नवरा असावा तर असा कार्यक्रमामधील हर्षदा खानविलकर यांच्यासाठी लहानपणापासूनच नवरात्रोत्सव खूप खास आणि महत्वाचा आहे. कारण, अनेक वर्षांपासून घरात हा उत्सव साजरा केला जातो. घटस्थापनेपासून ते दसऱ्यापर्यंत एक सात्विक,आनंदमय वातावरण असत. तसेच आपण आईचा ‘अंबाबाईचा” उत्सव साजरा करतो. ज्या उत्सवाला आईचं स्वरूप आहे त्याच महत्व प्रत्येक माणसाच्या आयुष्यात वेगळं असत तसच माझ्यासाठी देखील आहे. नवरात्रीचा उद्देश खूप महत्वाचा ठरतो. “चांगल्याचा वाईटावर विजय” हे एक ध्येय आहे आणि खूप मोठी शिकवण आहे. मुळात आपण नवरात्री साजरी करत असताना मनावर हे बिंबवत असतो कि आपल्याला वाईटावर विजय मिळवायचा आहे. खूप स्फूर्ती आणि शक्ती देणारा हा उत्सव आहे अस मला वाटत.

नवरात्रीचे नऊ दिवस माझा उपवास असतो. मी मीठ देखील खात नाही… फक्त फळ खाते.. उपाशी राहून देवापर्यंत पोहचण्याचा प्रयत्न असतो अस काही नाही … मला अस वाटत नऊ दिवस एक छान वातावरण असत. आपण फलाहार आणि सात्विक खाल्ल्याने मन शांत आणि प्रसन्न राहत. सगळ्यात म्हत्वाच म्हणजे देवीचा उत्सव आहे त्यामुळे श्रुंगार आणि रंग याच खूप महत्व आहे. त्यामुळे नऊ दिवस नऊ रंग … म्हणजे ज्यादिवशी जो रंग आहे त्या रंगाचे कपडे घालते, साडी नेसते… नवरा असावा तर असा या कार्यक्रमामध्ये देखील आम्ही अश्या नऊ स्त्रियांना बोलावले आहे ज्यांनी त्यांच्या क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी केलेली आहे.Harshada Khanwilkar_Navara Asava Tar Asa

कलाकारांनी अनुभवला स्त्री शक्तीचा जागर

नवरात्री म्हणजे स्त्री शक्तीचा जागर. याच निमित्ताने स्टार प्रवाहच्या नायिकांनी शुभेच्छा देत स्त्री-स्वातंत्र्य आणि सबलीकरण याविषयीची रोखठोक मतं मांडली आहेत.

chatriwali-on-road

‘छत्रीवाली’ मालिकेतील मधुरा म्हणजेच नम्रता प्रधानने नवरात्रौत्सवाच्या शुभेच्छा देत, महिलांनी स्वावलंबी होणं गरजेचं आहे हा मुद्दा अधोरेखित केलाय. संसाराचा गाडा सांभाळताना मुलांचं संगोपन करणारी, नोकरी करुन घराला आधार देणारी ‘ती’ ही कर्ती स्त्रीच असते असं मधुराला वाटतं. या कर्त्या स्त्रीचा सन्मान हा व्हायलाच हवा असं मत नम्रताने व्यक्त केलंय.‘छत्रीवाली’ मालिकेमधून मधुराच्या रुपात हीच कर्ती स्त्री साकारण्याची संधी मिळाल्याचा आनंदही नम्रताने या निमित्ताने व्यक्त केलाय.

 

Aetasha new

‘छोटी मालकीण’ मालिकेतील रेवतीने संसारासोबतच शिक्षणाचा ध्यासही घेतलाय. लग्नानंतर संसारातच अडकून न राहता आपले छंद आपल्या आवडी-निवडी प्रत्येक स्त्रीने जपायला हव्यात असं तिला वाटतं. इच्छेपुढे आभाळही ठेंगणं असतं. स्त्री शिक्षित असेल तर संपूर्ण कुटुंबाला ती योग्य दिशा देऊ शकते. त्यामुळेच तर लग्नानंतरदेखिल रेवती म्हणजेच ‘छोटी मालकीण’ आपलं शिक्षिका होण्याचं स्वप्न पूर्ण करणार आहे.

 

NEHA 2

‘नकळत सारे घडले’मधील नेहा म्हणजेच नुपूर परुळेकरच्या मते परंपरेसोबतच आधुनिक विचारांची कास धरणंही महत्त्वाचं आहे. गगनभरारीचं स्वप्न पाहण्याचा आणि ते सत्यात उतरवण्याचा अधिकार प्रत्येक स्त्रीला आहे. मालिकेत नेहाच्या रुपात आदर्श आई, आदर्श सून, आदर्श पत्नी ते यशस्वी डॉक्टर या भूमिकेत वावरायला मिळत असल्याचा विशेष आनंद नेहाला वाटतो.

 

BHIRAVI 4

‘ललित २०५’ मधील भैरवी म्हणजेच अमृता पवारच्या मते स्त्री हे आदिशक्तीचे रुप आहे. तिच्यामध्ये अफाट शक्ती होती, आहे आणि राहणारच. त्यामुळेच तर कितीही दु:खाचे कसोटीचे प्रसंग आले तरी ती त्याचा सामना खंबीरपणे करु शकते. हाच खंबीरपणा भैरवीमध्ये आहे. आपल्यातल्या खऱ्या शक्तीचा शोध घेतला तर कोणतीच गोष्ट अवघड नाही असं अमृता पवारला वाटतं.

प्रेक्षकांशी संवाद साधण्याची उत्तम संधी – अजिंक्य देव

‘प्रेमा तुझा रंग कसा’च्या पहिल्या सीझनला मिळलेल्या उदंड प्रतिसादानंतर स्टार प्रवाह वाहिनी या कार्यक्रमाचा दुसरा सीझन घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. खास बात म्हणजे सुप्रसिद्ध अभिनेते अजिंक्य देव दुसऱ्या सीझनचं सूत्रसंचालन करत आहेत. अजिंक्य देव यांच्या खास शैलीनं या मालिकेतल्या कथांचं नाट्य अधिक खुलणार आहे. याचनिमित्ताने अजिंक्य देव यांच्याशी केलेली ही खास बातचित.

१.  ‘प्रेमा तुझा रंग कसा’च्या दुसऱ्या सीझनचं तुम्ही सूत्रसंचालन करत आहात त्याविषयी…

IMG_8879या कार्यक्रमाचा मुळ उद्देश समाजात जागृकता वाढवणं आहे असं मला वाटतं. समाजात घडणाऱ्या असंख्य गुन्ह्यांच्या गोष्टी आपण ऐकतो, वाचतो. पण त्या प्रभावीपणे प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचं आणि अश्या गोष्टींपासून सावध राहण्याचं आवाहन ‘प्रेमा तुझा रंग कसा’च्या माध्यमातून करण्यात येतंय. त्यामुळे हा कार्यक्रम माझ्यासाठी खास आहे.

  २.खूप वर्षांनंतर मराठी टेलिव्हिजनवर पदार्पण      केलंय त्याविषयी काय वाटतं?

     हो खरंय. हिंदी टेलिव्हिजनवर माझी नुकतीच एक सीरिज येऊन गेली. पण मराठी टेलिव्हिजनवर मी खूप दिवसांनंतर दिसणार आहे. मुळात एखादा शो मनापासून आवडला तरंच मी तो स्वीकारतो. ‘प्रेमा तुझा रंग कसा’चं वेगळेपण मला भावलं. याआधी ‘स्टार प्रवाह’च्याच स्वप्नांच्या पलिकडलेमध्ये मी पाहुण्या कलाकाराची भूमिका साकारली होती. स्टार प्रवाह वाहिनीसोबत असणारं नातं या कार्यक्रमाच्यानिमित्ताने आणखी घट्ट होतंय याचा विशेष आनंद आहे.

Screen Shot 2018-09-17 at 11.15.56 pm

३. ‘प्रेमा तुझा रंग कसा’चं वेगळेपण काय सांगाल?

सध्या मराठीमध्ये गुन्ह्यांवर आधारित एकही      कार्यक्रम नाहीय. शिवाय प्रत्येक दिवशी नवी गोष्ट प्रेक्षकांच्या भेटीला येईल. प्रत्येक एपिसोडला नवी गोष्ट आणि नवे कलाकार असल्यामुळेच प्रेक्षकांना सिनेमा पहात असल्याचा फील येईल. समाजात ज्या घटना घडतात त्याचंच प्रतिबिंब या कार्यक्रमामधून दाखवण्यात येतंय. माझ्यासाठी हा अनुभव समृद्ध करणारा आहे. मला महाराष्ट्रभरातून अभिनंदन करणारे बरेच फोन आले. ‘प्रेमा तुझा रंग कसा’चे एपिसोड्स मित्रमंडळी आणि प्रेक्षकांना आवडत असल्याच्या प्रतिक्रियाही मिळत आहेत.

पुंडलिकाची वारी पूर्ण होणार का?

नजरेत दया हृदयात माया
कटेवरी हात विठ्ठलाचे
चिपळीचा नाद मृदुंगाचा ताल
वारकरी नाचती पंढरीचे’

 

सातशे वर्षांहून अधिक काळ अखंड निघणारी पंढरीची वारी हा महाराष्ट्राच्या सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातला एक चमत्कारच म्हणावा लागेल. दरवर्षी संतांची मांदियाळी वैष्णवांसह पंढरपुरी जायला निघते. विठूनामाचा गजर करत तल्लीन होऊन वैष्णव पायी पंढरपूरला जातात. वारीच्या या संपूर्ण प्रथेमागे खूप मोठा इतिहास आहे. पुंडलिक हा विठुरायाचा लाडका भक्त. वारीची ही प्रथा पुंडलिकानेच सुरु केली. पण त्याचा हा प्रवास खूपच खडतर होता. पुंडलिकाचा हा ११ दिवसांचा वारीचा प्रवास पूर्ण होऊ नये म्हणून कलीने त्याच्या मार्गात बरेच अडथळे आणले. या अडथळ्यांवर पुंडलिकाने कशी मात केली? त्याची वारी पूर्ण झाली का? पुंडलिकाच्या या खडतर प्रवासात विठ्ठलाने त्याला सहाय्य केलं का?  हे पहा विठू माऊली च्या भागात.IMG_5928.jpg

कलाकारांच्या गणेशोत्सवाच्या आठवणी आणि शुभेच्छा

सर्वांच्या लाडक्या गणपतीचे आगमन धुमधाम होतेय, यात तुमचे आवडते कलाकारही आज खुश आहेत, बाप्पाचा आशीर्वाद आणि त्यांच्या बाप्पासोबतच्या आठवणी सांगतायत….CHOTI MALKIN JODI

 1. अक्षर कोठारी – (छोटी मालकीण मालिकेमधील श्रीधर)

– माझं बालपण सोलापूरातल्या माणिक चौकात गेलं. तिथे आजोबा गणपतीचं मंदीर सुप्रसिद्ध आहे. या गणपतीला सुमारे १३२ वर्षांची परंपरा आहे.  नावाप्रमाणेच गणपतीची मूर्ती आपल्याला आजोबांसारखी भासते. गणेशोत्सवाच्या काळात इथे एक वेगळंच चैतन्य असतं. डोळे दिपवणारी रोषणाई, भक्तांच्या रांगा आणि बाप्पाचं डोळ्यात साठवून ठेवावं असं रुप. आम्हा मित्राचं लहानपणी एक लेझिम पथक होतं. मीही त्यात सहभागी होत असे. गणेशोत्सवाच्या काळात आम्ही बाप्पासमोर लेझिम खेळायचो. ते दिवस मी कधीच विसरु शकत नाही. गेल्या १० वर्षात कामाच्या गडबडीमुळे मी जाऊ शकलो नाही. पण यंदा मात्र मी आवर्जून सोलापुरातल्या माझ्या आजोबा गणपतीचं दर्शन घेणार आहे.

 1. नम्रता प्रधान – (छत्रीवाली मालिकेतील मधुरा)NAMRTA PRADHAN
 • गणपती बाप्पा हे माझं सर्वात आवडतं दैवत. बाप्पाच्या सजावटीपासून ते अगदी नैवेद्यापर्यंत सगळ्यात माझा सहभाग असतो. गेल्यावर्षी मी बाप्पाच्या आवडीच्या जास्वंदीच्या फुलाची सजावट केली होती. यंदा शूटिंगमुळे मला सजावटीमध्ये सहभाग घेता आला नाही, मात्र सजावटीत छत्रीचा वापर जरुर करा असं मी माझ्या फॅमिलीला आवर्जून सांगितलंय. स्टार प्रवाहच्या छत्रीवाली या मालिकेमुळे मला छत्रीवाली ही नवी ओळख मिळालीय. बाप्पाच्या आशिर्वादामुळेच ही सुवर्णसंधी मला मिळालीय. त्यामुळे यंदा बाप्पाची आरास छत्रीशिवाय पूर्ण होऊच शकत नाही.

 1.   संकेत पाठक – (छत्रीवाली मालिकेतील विक्रम)   CHATRIWALI JODIमी मुळचा नाशिकचा. माझ्या घरी गौरी-गणपती असतात. इकोफ्रेण्डली गणेशोत्सव साजरा करण्याचा माझा आणि माझ्या कुटुंबाचा प्रयत्न असतो. माझी आई दरवर्षी घरीच कागदापासून गणपतीची मूर्ती तयार करते. मीही तिला मदत करतो. निसर्ग जपा तरच तो तुमचं रक्षण करेल हा संदेश मला माझ्या कुटुंबाकडून लहानपणापासून मिळत आलाय आणि तोच मी माझ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवू इच्छितो.

 1. संग्राम समेळ – (ललित २०५ मालिकेतील नील राजाध्यक्ष)
 • SANGRAM SAMELलहानपणी गणपतीची सुट्टी पडली की मी माझ्या आजोळी जात असे. तिकडे सोसायटीच्या गणपतीला वेगवेगळे कार्यक्रम आणि स्पर्धा असायच्या. मी फॅन्सी ड्रेस आणि चित्रकला स्पर्धेत आवर्जून भाग घ्यायचो. तुमच्यातले कलात्मक गुण अश्याच स्पर्धांमधून ठळक होत असतात असं मला वाटतं. माझ्या घरीही दरवर्षी बाप्पाचं अगदी थाटामाटात आगमन होतं. यंदा समेळांच्या बाप्पाचं ७५वं वर्ष आहे. त्यामुळे डबल सेलिब्रेशन असणार आहे. बाप्पा तुझा आशिर्वाद असाच आम्हा सर्वांच्या पाठीशी राहो हीच इच्छा मी व्यक्त करेन.
 1. हरीश दुधाडे – (नकळत सारे घडले मालिकेतील प्रतापराव रांगडे पाटील)HARISH DUDHADE 1
 • गणपती म्हणजे ६४ कलांचा अधिपती, बुद्धीची देवता आणि विघ्नहर्ता. आज मी जो काही आहे ते बाप्पाच्या कृपेमुळेच. गणेशोत्सवाच्या काळात होणाऱ्या एकपात्री आणि एकांकिका स्पर्धांमध्ये मी सहभागी होत लहानाचा मोठा झालो. अभिनयक्षेत्रात मी येईन की नाही हे त्यावेळी मला ठाऊक नव्हतं पण बाप्पाला माहित होतं हे नक्की. दरवर्षी गणेशोत्सव जवळ आला की माझी आई माझ्याकडून एकपात्री नाटक बसवून घ्यायची. आणि मग वेगवेगळ्या मंडळांमधून मी ते सादर करायचो. खास बात म्हणजे सगळ्याच मंडळांमधून मला हमखास बक्षिसही मिळायचं. तेव्हापासूनच अभिनयाची गोडी मला लागली. अहमदनगर ते मुंबई हा पल्ला याच आत्मविश्वासामुळे मी गाठू शकलो. मला आठवतंय एमबीए करत असताना मी गणपतीला रोज एक फूल वाहायचो. परीक्षेत पास होण्यासाठी नाही तर मी एका मालिकेसाठी ऑडिशन दिलं होतं त्यासाठी निवड व्हावी यासाठी. विशेष गोष्ट अशी की मी त्यावर्षी पासही झालो आणि माझ्या आयुष्यातल्या पहिल्या मालिकेसाठी माझी निवडही झाली. बाप्पाकडे लावलेली ही गोड सेटिंग मला कायम आठवते. यावर्षी शूटिंगच्या व्यस्त वेळापत्रकातून वेळ काढून मी घरच्या गणपतीच्या दर्शनसाठी जाणार आहे. आणि जास्तीत जास्त वेळ बाप्पासोबत व्यतीत करणार आहे.

 1. नुपूर परुळेकर – (नकळत सारे घडले मालिकेतील नेहा)NUPUR PARULEKAR
 • गणपती बाप्पा सगळ्यांचाच लाडका देव आहे तसंच माझाही आहे. काहीही झालं तरी बाप्पा आपलं रक्षण करतो ही गोष्ट माझ्या मनावर लहानपणापासूनच कोरली गेलीय. मला आठवतंय लहानपणी मला अंधाराची खूप भीती वाटायची. खेळून झाल्यावर घरी परत येताना किंवा घरात एकटं असताना मला सतत माझ्यासोबत कुणीतरी असल्याचा भास व्हायचा. मनातली ही भीती मी जेव्हा माझ्या आईला सांगितली तेव्हा तिने मला अजिबात न घाबरण्याचा सल्ला दिला. तुझ्यासोबत असणारी ती व्यक्ती म्हणजे गणूबाप्पाच असल्याचं सांगत तिने माझ्या मनातली भीती घालवली. आज ही गोष्ट आठवली तरी हसू येतं. पण अडचणीच असताना आईचे हे शब्द आठवतात आणि बाप्पा सतत सोबत असल्याची जाणीव होत राहते. मला सख्खा भाऊ नाही. माझ्या आयुष्यातली ही उणीव गणपती बाप्पानेच भरुन काढलीय. गणेशोत्सवात ऋषीपंचमीच्या दिवशी केली जाणारी ऋषीची भाजी मला प्रचंड आवडते. बाप्पासोबत यावर्षीही या भाजीचा आस्वाद मी घेणार आहे.

 1. एतशा संझगिरी – (छोटी मालकीण मालिकेतली रेवती)
 • AETASHA SANSGIRIमी मुळची परेलची. गिरणगावातच लहानाची मोठी झाल्यामुळे गणेशोत्सवाचा वेगळा उत्साह असतो. माझ्या सोसायटीच्या गणपतीला आम्ही सगळेजण खूप धमाल करतो. आमच्याकडे दरवर्षी मोदक खाण्याची स्पर्धा असते. मला मोदक प्रचंड आवडतात. मी या स्पर्धेत दरवर्षी भाग घेते. बाप्पाने आजवर मला न मागता खूप गोष्टी दिल्या आहेत. त्याचा वरदहस्त माझ्या पाठीशी राहो हेच मागणं मागेन.

 1. अजिंक्य राऊत – (विठुमाऊली –  विठ्ठल)
 • Vitthal Image (3)आमच्या गणपती बाप्पाची आरास खुपच खास असते. बाप्पाच्या सजावटीसाठी आम्ही लाडूंचा वापर करतो. त्यामुळे दरवर्षी मला खूप सारे लाडू खायला मिळतात. यंदा बऱ्याच गणेश मंडळांनी आणि घरगुती गणपतीही विठुमाऊलीच्या रुपात साकारलेला पाहायला मिळत आहेत. त्यामुळे शक्य तितक्या गणपतींचं दर्शन घेण्याची उत्सुकता आहे.

मृणाल दुसानिसचे कमबॅक

अस्सं सासर सुरेख बाई या मालिकेतील जुई म्हणून मृणाल दुसानिसला प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिलं. मृणालचा गोड चेहराहास्य आणि अभिनय यामुळे तिने प्रेक्षकांची मने जिंकली. आता ती पुन्हा छोट्या पडद्यावर पुनरागमन करत आहे. कलर्स मराठीवरीलच “हे मन बावरे” या मालिकेतून ती पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. “हे मन बावरे” मालिका ९ ऑक्टोबरपासून कलर्स मराठीवर सुरु होत आहे. माHE_MANN_BAAVRE 3लिकेमध्ये बिग बॉस मराठीमधील शर्मिष्ठा राउत देखील असणार आहे. शशांक केतकर आणि मृणाल दुसानिस या मालिकेच्या निमित्ताने पहिल्यांदाच एकत्र काम करणार आहे. त्यामुळे प्रेक्षकांना एक फ्रेश जोडी बघायला मिळणार आहे.

Create a website or blog at WordPress.com

Up ↑