जुन्या आठवणींना उजाळा….

सध्याच्या लॉकडाऊनमुळे सारेच घरात राहिलेत आणि या वेळेचा खूप चांगल्या पद्धतीने वापर करत आहेत. काही कलाकार घर बसल्या योगा आणि त्याचे फायदे यांबद्दल आपल्याला सांगत आहे. तर काही कलाकार कुकिंगचे धडे गिरवत आहे.

 

bharat

 

 

 

आपल्या विनोदाने सर्वांचे मन जिंकणारा आपला लाडका भारत जाधव सध्या त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर जुन्या आठवणींना उजाळा देतोय. ८० -९० च्या दशकात अंकुश चौधरी, केदार शिंदे, मकरंद अनासपुरे, संजय नार्वेकर यांच्या सोबतचे काही फोटो त्याने शेअर केले आहेत.

 

 

 

 

 

‘हॉस्टेजेस’ वेब सीरिज १३ एप्रिलपासून प्रेक्षकांच्या भेटीला

लॉकडाऊनच्या काळात प्रेक्षकांसाठी मनोरंजनाचे नवनवे पर्याय घेऊन स्टार प्रवाह वाहिनी सज्ज आहे. १३ एप्रिलपासून रात्री १० वाजता स्टार प्रवाहवर भेटीला येणार आहे ‘हॉस्टेजेस’ ही वेब सीरिज. जगभरात नावाजलेल्या या वेबसीरिजचीं ‘हॉस्टेजेस’ ही भारतीय आवृत्ती आहे. हॉटस्टार स्पेशल्सने या वेबसीरिजची निर्मिती केली आहे. खास बात म्हणजे मराठी प्रेक्षकांना मराठीतून या वेबसीरिजचा आनंद घरबसल्या लुटता येणार आहे. सस्पेन्स थ्रीलर असणारी ही वेबसीरिज प्रेक्षकांची उत्कंठा वाढवेल यात शंका नाही.

HOSTAGES

हॉस्टेजेस ही संपूर्णपणे काल्पनिक गोष्ट आहे. ही गोष्ट आहे अश्या डॉक्टरची जिच्यावर मुख्यमंत्र्यांच्या शस्त्रक्रियेची जबाबदारी सोपवण्यात येते. मात्र शस्त्रक्रियेच्या आदल्या दिवशीच त्या डॉक्टरच्या संपूर्ण कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी देण्यात येते. कुटुंबाला वाचवायचं असेल तर मुख्यमंत्र्यांचा जीव वाचता कामा नये अशी अट त्या डॉक्टरसमोर ठेवण्यात येते. या द्विधा मनस्थितीत डॉक्टर आपल्या कर्तव्याला जागणार की कुटुंबाचा जीव वाचवणार याची उत्कंठावर्धक गोष्ट म्हणजे हॉस्टेजेस ही वेबसीरिज.

‘हॉस्टेजेस’ १३ एप्रिलपासून रात्री १० वाजता फक्त स्टार प्रवाहवर प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे़.

आपल्या घरातील वाढत्या वयाच्या प्रत्येक चिऊची गोष्ट – स्ट्रॉबेरी शेक

IMG-20190822-WA0042

‘ दुर्वा’ आणि  ‘फुलपाखरू’ या मालिकांमधून झळकलेली हृता आता शॉर्टफिल्म मध्ये दिसणार आहे.  हृता काम घेण्याबाबत खूपच चोखंदळ आहे . अशा प्रकारची लोकप्रिय अभिनेत्री जेव्हा ‘स्ट्रॉबेरी शेक’ सारखी एका नवीन उमद्या दिग्दर्शकाची शॉर्टफिल्म निवडते तेव्हा ही शॉर्टफिल्म किती विशेष असेल हे समजलंच असेल.

स्ट्रॉबेरी शेक ही एक २० मिनिटांची शॉर्ट फिल्म असून शोनील यल्लत्तीकर ह्याने ही लिहिली आणि दिग्दर्शित केली आहे . ‘स्ट्रॉबेरी शेक’ या शॉर्टफिल्मचा मुख्य गाभा हा , आजची तरुण पिढी त्यांचे आपल्या पालकांबरोबरचे नाते आणि आजच्या पालकांचे आपल्या पाल्याबरोबरचे नाते यावर महत्वपूर्ण भाष्य करते .या शॉर्टफिल्म मध्ये वाढत्या वयाच्या चिऊ या १९ वर्षाच्या व्यक्तिरेखेची भूमिका हृताने अतिशय ताकदीने वठवली आहे . आजच्या पिढीची खरी मानसिकता आणि त्यावर आजच्या पिढीच्या पालकांचे विचार अतिशय वेगळ्या पण खुमासदार पद्धतीने स्ट्रॉबेरी शेक मध्ये दाखवण्याचा एक स्तुत्य प्रयत्न दिग्दर्शकाने केला आहे. चिऊ हे पात्र आजच्या काळातील प्रत्येक घरातीतील त्या मुलीचे आहे जीला तिचे निर्णय स्वतः घेण्याची आणि तो निर्णय सांभाळण्याची ताकद आहे .

सध्या हृता ला शॉर्टफिल्म्स , नाटक , सिनेमा , वेबसिरीज आणि मालिका इथून ऑफर्स येत आहेत. चिऊची भूमिका स्वीकारण्याबद्दल तिने सांगितले की ” स्ट्रॉबेरी शेक ” मधलं चिऊ हे कॅरेक्टर करताना खूप मजा आली , शोनील बरोबर मी पहिल्यांदाच काम करतेय आणि तो खूप उत्तम दिग्दर्शक आहे . ही २० मिनिटांची शॉर्ट फिल्म मुलगी आणि तिचे बाबा या दोघांच्या नाते संबंधांवर आहे . माझ्या बाबांचा रोल ज्यांनी केलाय त्यांच्याबद्दल मला भरपूर बोलायचं आहे पण माझ्या प्रमाणे तुम्हीही त्यांच्या कामाच्या प्रेमात आहात तेव्हा ते कोण आहेत हे लवकरच तुम्हाला कळेल . एवढंच सांगीन ते माझे बाबा होते म्हणूनच मी सुद्धा चिऊ हे कॅरेक्टर करू शकले . चिऊ हे कॅरेक्टर आजच्या पिढीतील असंख्य मोकळ्या विचारसरणीच्या मुलींचं प्रतिनिधित्व करते. आताची पिढी त्यांचे निर्णय स्वतः घेतात पण त्याच बरोबर त्यांचे स्वतःच्या पालकांबरोबरचे नाते सुद्धा महत्वाचे आहे, हे कळते. आपल्या घरातील वाढत्या वयाच्या प्रत्येक चिऊची गोष्ट आणि अशावेळी बाबा आणि मुलगी हे नाते कसे असावे हे सांगण्याचा एक छोटासा प्रयत्न आम्ही या ” स्ट्रॉबेरी शेक ” द्वारे करण्याचा प्रयत्न करत आहोत.
या शॉर्टफिल्म चं ट्रेलर मी लवकरचं तुमच्या भेटीला आणणार असल्याचे तिने सांगितले.

डीजेवाला दादा गाजतोय !

सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल काही सांगता येत नाही. सध्याच्या घडीला मराठी चित्रपटसृष्टीसोबत म्युझिक अल्बमही वेगवेगळ्या धाटणीचे बनत चाललेत. अशातच अस्सल मराठमोळ्या ठसक्यात गायिका वैशाली माडेच्या सुमधूर आवाजात  एक म्युझिक अल्बम अलिकडेच रिलीज झाला आहे. ‘डीजे वाला दादा’ असे नव्या गाण्याचे बोल आहेत. सोशल मीडियावर त्याच्या या गाण्याला भरघोस प्रतिसाद मिळत आहे.
2
व्हिडीओ पॅलेस प्रस्तुत आणि राज एक्स्लेन्सी क्रिएशन असलेल्या या गाण्यात नवोदित अभिनेत्री  दिपाली सुखदेवे हिने भन्नाट डान्स केला आहे. प्रिती नाईक निर्मित आणि पराग भावसार यांनी हे गाणे दिग्दर्शित केले आहे. या गाण्याची सोशल मिडीयावर प्रचंड क्रेज पाहायला मिळत आहे.
सद्यस्थितीत डीजे ऑपरेटरवर आधारित अनेक हिंदी – मराठी गाणी आली असली तरी गीतकार कौतुक शिरोडकर  यांनी लिहीलेले गाणे थोडया वेगळ्या धाटणीचे आहे. सुप्रसिध्द  गायक आणि संगीतकार प्रवीण कुवर यांनी ‘डिजेवाला दादा’ हे गाणे संगीतबद्ध केले. या गाण्याचे नृत्यदिग्दर्शन संतोष पालवणकर यांनी केले आहे. .
link : R7BnWqMA4Ek?list=RDR7BnWqMA4Ek

अमृताचा ‘ख्रिसमस’ झाला खास

अभिनेत्री अमृता खानविलकर केवळ चाहत्यांमध्ये नव्हे तर लहान मुलांमध्येदेखील प्रसिद्ध आहे. अमृतादेखील वेळात वेळ काढत लहान मुलांमध्ये वावरताना अनेकवेळा दिसून आली आहे.
IMG-0956
‘सुपर डान्सर महाराष्ट्राचा’ या रिएलिटी शॉच्या मुलांची तर ती लाडकी ‘अम्मू दीदी’ झाली आहे. अश्या ह्या सर्व बच्चेकंपनीच्या लाडक्या अम्मू दीदीने यंदाचा ख्रिसमस विशेष मुलांसोबत साजरा केला, ठाणे येथील जागृती पालक संस्थेच्या मतिमंद मुलांसोबत तिने काही क्षण निवांत घालवला, नाताळ सणाच्या निमित्ताने अमृताने त्यांच्यासाठी खास भेटवस्तूदेखील आणल्या होत्या. मुलांच्या चेहऱ्यावर हसू फुटण्यासाठी तिने त्यांच्यासोबत मज्जा मस्ती करत, काही खेळदेखील खेळले.
IMG-0965
संस्थेच्या मुलांनी देखील तिला चांगला प्रतिसाद देत, तिच्या ख्रिसमस पार्टीचा मनमुराद आनंद लुटला. तसेच, अमृताच्या स्वागतासाठी जागृती पालक संस्थेतील या विशेष मुलांचा खास नाचगाण्याचा कार्यक्रमदेखील तिथे आयोजित करण्यात आला होता. दरम्यान, सामान्य मुलांप्रमाणे या मुलांकडून ही मिळालेल्या अमाप प्रेमामुळे तिला भरूनदेखील आले.
IMG-0949
‘मी दरवर्षी वेगवेगळ्या एनजीओमधील लहान मुलांना जाऊन भेटले आहे. त्यांचा सहवास मला आवडतो.  मात्र, इथे येऊन मी खरंच भरून पावले आहे. ही मुलं सामान्य मुलांसारखी नसली तरी खूप खास आहे, ही मुलं देखील निरागस आणि भोळीभाबडी आहेत, त्यामुळे यांना इतरांहून वेगळे असे म्हणताच येणार नाही. या मुलांकडून मला जे काही प्रेम मिळालं आहे, ते न विसरण्याजोगं आहे.’ असे भावोद्गार तिने काढले.

अमेय झळकणार हिंदी वेबसिरीजमध्ये

युवा स्टार अभिनेता अमेय वाघ आपल्या चाहत्यांना एका मागून एक आश्चर्याचे धक्के देत आहे. काही दिवसांपूर्वी अमेयने सोशल नेटवर्किंग साईटद्वारे, लवकरच निगेटिव्ह भूमिकेतून झळकणार असल्याची माहिती दिली होती. या बातमीची चर्चा होत असतानाच, त्याने आणखीन एका नव्या प्रोजेक्टबद्दल सांगत त्याच्या चाहत्यांना खुश करून टाकलं आहे. ती बातमी म्हणजे, अमेय लवकरच एका सुप्रसिद्ध हिंदी वेबसिरीजमधून प्रेक्षकांसमोर येत आहे. डिंग इंटरटेंटमेंट निर्मित आणि अनिरुद्ध सेन दिग्दर्शित ‘असुरा’ असे त्याचे नाव असून, वूट ऍपवर प्रदर्शित होणारी हि एक थ्रिलर गोष्ट आहे. विशेष म्हणजे, अमेयची यात महत्वपूर्ण भूमिका असून, तो पहिल्यांदाच अश्या थ्रिलर वेबसिरीजमध्ये काम करताना दिसून येणार आहे.
Arshad Amey
हिंदीच्या नावाजलेल्या कलाकारांचा समावेश असलेल्या या वेबसिरीजमध्ये बॉलिवूड अभिनेता अर्शद वारसीची प्रमुख भूमिका आहे. ‘असुरा’ या वेबसिरीजच्या निमित्ताने अर्शदसोबत काम करण्याची संधी अमेयला मिळणार असल्याकारणामुळे, तो देखील खूप उत्सुक आहे.

गँटमँट चा ट्रेलर रिलीज

‘प्रेम म्हणजे, प्रेम म्हणजे प्रेम असतं… तुमचं आमचं सेम असतं…’ ही मंगेश पाडगावकरांची कविता प्रेमवीरांमध्ये प्रसिद्ध आहे. प्रेमात पाडणाऱ्या या कवितेने अनेकांचे ‘गॅटमॅट’ देखील जुळवून दिले आहे. गोड आणि गुलाबी असणारे हे प्रेम जुळण्यासाठी अनेक मशागती कराव्या लागतात. प्रेमाचे हे ‘गॅटमॅट’ जुळताना बऱ्याचदा धांदल उडवणारे किस्सेदेखील घडतात. अवधूत गुप्ते प्रस्तुत आणि यशराज इंडस्ट्रीज निर्मित ‘गॅटमॅट’ हा सिनेमा यासारख्याच मजेशीर किस्स्यांची भेट प्रेक्षकांसाठी घेऊन येत आहे. येत्या १६ नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होत असलेला हा सिनेमा प्रेमीयुगुलांसाठी पर्वणी ठरणार असून, नुकतेच या सिनेमाच्या ट्रेलरचे मोठ्या दिमाखात अनावरण करण्यात आले. मुंबईतील वरळी येथे पार पडलेल्या या कार्यक्रमात ‘गॅटमॅट’ सिनेमाच्या संपूर्ण टीमने हजेरी लावली होती. Gat Mat Poster 5

 

 

 

माझ्यासाठी नवरात्र खास – हर्षदा खानविलकर

Ok2नवरा असावा तर असा कार्यक्रमामधील हर्षदा खानविलकर यांच्यासाठी लहानपणापासूनच नवरात्रोत्सव खूप खास आणि महत्वाचा आहे. कारण, अनेक वर्षांपासून घरात हा उत्सव साजरा केला जातो. घटस्थापनेपासून ते दसऱ्यापर्यंत एक सात्विक,आनंदमय वातावरण असत. तसेच आपण आईचा ‘अंबाबाईचा” उत्सव साजरा करतो. ज्या उत्सवाला आईचं स्वरूप आहे त्याच महत्व प्रत्येक माणसाच्या आयुष्यात वेगळं असत तसच माझ्यासाठी देखील आहे. नवरात्रीचा उद्देश खूप महत्वाचा ठरतो. “चांगल्याचा वाईटावर विजय” हे एक ध्येय आहे आणि खूप मोठी शिकवण आहे. मुळात आपण नवरात्री साजरी करत असताना मनावर हे बिंबवत असतो कि आपल्याला वाईटावर विजय मिळवायचा आहे. खूप स्फूर्ती आणि शक्ती देणारा हा उत्सव आहे अस मला वाटत.

नवरात्रीचे नऊ दिवस माझा उपवास असतो. मी मीठ देखील खात नाही… फक्त फळ खाते.. उपाशी राहून देवापर्यंत पोहचण्याचा प्रयत्न असतो अस काही नाही … मला अस वाटत नऊ दिवस एक छान वातावरण असत. आपण फलाहार आणि सात्विक खाल्ल्याने मन शांत आणि प्रसन्न राहत. सगळ्यात म्हत्वाच म्हणजे देवीचा उत्सव आहे त्यामुळे श्रुंगार आणि रंग याच खूप महत्व आहे. त्यामुळे नऊ दिवस नऊ रंग … म्हणजे ज्यादिवशी जो रंग आहे त्या रंगाचे कपडे घालते, साडी नेसते… नवरा असावा तर असा या कार्यक्रमामध्ये देखील आम्ही अश्या नऊ स्त्रियांना बोलावले आहे ज्यांनी त्यांच्या क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी केलेली आहे.Harshada Khanwilkar_Navara Asava Tar Asa

Create a website or blog at WordPress.com

Up ↑