माझ्यासाठी नवरात्र खास – हर्षदा खानविलकर

Ok2नवरा असावा तर असा कार्यक्रमामधील हर्षदा खानविलकर यांच्यासाठी लहानपणापासूनच नवरात्रोत्सव खूप खास आणि महत्वाचा आहे. कारण, अनेक वर्षांपासून घरात हा उत्सव साजरा केला जातो. घटस्थापनेपासून ते दसऱ्यापर्यंत एक सात्विक,आनंदमय वातावरण असत. तसेच आपण आईचा ‘अंबाबाईचा” उत्सव साजरा करतो. ज्या उत्सवाला आईचं स्वरूप आहे त्याच महत्व प्रत्येक माणसाच्या आयुष्यात वेगळं असत तसच माझ्यासाठी देखील आहे. नवरात्रीचा उद्देश खूप महत्वाचा ठरतो. “चांगल्याचा वाईटावर विजय” हे एक ध्येय आहे आणि खूप मोठी शिकवण आहे. मुळात आपण नवरात्री साजरी करत असताना मनावर हे बिंबवत असतो कि आपल्याला वाईटावर विजय मिळवायचा आहे. खूप स्फूर्ती आणि शक्ती देणारा हा उत्सव आहे अस मला वाटत.

नवरात्रीचे नऊ दिवस माझा उपवास असतो. मी मीठ देखील खात नाही… फक्त फळ खाते.. उपाशी राहून देवापर्यंत पोहचण्याचा प्रयत्न असतो अस काही नाही … मला अस वाटत नऊ दिवस एक छान वातावरण असत. आपण फलाहार आणि सात्विक खाल्ल्याने मन शांत आणि प्रसन्न राहत. सगळ्यात म्हत्वाच म्हणजे देवीचा उत्सव आहे त्यामुळे श्रुंगार आणि रंग याच खूप महत्व आहे. त्यामुळे नऊ दिवस नऊ रंग … म्हणजे ज्यादिवशी जो रंग आहे त्या रंगाचे कपडे घालते, साडी नेसते… नवरा असावा तर असा या कार्यक्रमामध्ये देखील आम्ही अश्या नऊ स्त्रियांना बोलावले आहे ज्यांनी त्यांच्या क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी केलेली आहे.Harshada Khanwilkar_Navara Asava Tar Asa

दुष्काळाचे वास्तव दर्शन घडवणारा ‘एक होतं पाणी’ सिनेमा  

 सध्या मराठी सिनेमांमध्ये वेगवेगळ्या सामाजिक विषयांना हात घातला जातो आहे. अशाच एका सामाजिक विषयाला हात घालणारा ‘एक होतं पाणी’ हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. एका दुष्काळग्रस्त गावाची गोष्ट या सिनेमातून मांडण्यात आली आहे.प्रत्येकाने पाण्याचा प्रश्न गंभीर होईपर्यंत वाट न पाहता पाणी वाचवले पाहिजे असा संदेश या सिनेमातून देण्यात येणार आहे.
MusiC Director Vikas Joshi,Writer Ashish Ningurkar,Rohit Raut,Hrishikesh Ranade,Director Rohan Satghare,Dop Yohesh,Singer Anandi Joshi ‘न्यू टॅलेंट सर्च मुव्हीज’ या निर्मिती संस्थेअंतर्गत निर्मिती होणाऱ्या या सिनेमातील एका गाण्याचे रेकॉर्डिंग नुकतेच पार पडले. कैलास स्टुडिओ येथे पार पडलेल्या या रेकॉर्डिंगला सिनेमाचे दिग्दर्शक रोहन सातघरे, संगीतदिग्दर्शक विकास जोशी यांची उपस्थिती होती. रोहित राऊत, हृषीकेश रानडे तसेच आनंदी जोशी यांच्या आवाजातील गाण्याचे रेकॉर्डिंग करण्यात आले. विजय तिवारी व डॉ. प्रविण भुजबळ हे सिनेमाचे निर्माते आहेत. आशिष निनगुरकर लिखित या सिनेमाचे छायाचित्रण योगेश अंधारे यांनी केले आहेत. हंसराज जगताप, उपेंद्र दाते, अनंत जोग, जयराज नायर, गणेश मयेकर, रणजित जोग, श्रिया मस्तेकर, रणजित कांबळे, त्रिशा पाटील, शीतल कल्हापुरे, शीतल शिंगारे, आनंद वाघ, नाना शिंदे, अनुराधा भावसार, डॉ राजू पाटोदकर, राधाकृष्ण कराळे, दिपज्योती नाईक, बालकलाकार चैत्रा भुजबळ आदि कलाकारांच्या भूमिका या सिनेमात आहेत.

सुबोधचा संभाजी महाराज वेशभूषेतील लूक

सोशल मडियाबरोबरच चाहत्यांमध्ये चर्चा आहे ती सुबोधच्या ‘…आणि डॉ. काशिनाथ घाणेकर’ या आगामी सिनेमाची. या सिनेमाच्या ट्रेलरला प्रेक्षकांचा चांगलाच प्रतिसाद मिळाला आहे. याच सिनेमाच्या निमित्ताने सुबोधने सिनेमात साकारलेल्या छत्रपती संभाजी महाराजांच्या वेशभूषेतील एक फोटो इन्स्टाग्रामवर ट्विट केला आहे.IMG_20181015_200951

(सौजन्य – इन्स्टाग्रामवर)

हा फोटोखाली त्याने म्हटले आहे

“डॉ. काशिनाथ घाणेकरांनी साकारलेली ‘रायगडाला जेव्हा जाग येते’ या नाटकातील ‘छत्रपती संभाजी महाराजांची’ भूमिका ही त्यांची अजरामर भूमिका. तो प्रसंग चित्रपटात साकारण्याआधी स्वतःच्या मनाची तयारी. छत्रपती संभाजी महाराजांच्या आशिर्वादानेच हे आव्हान पेलणं शक्य झालं.”

‘ठग्स ऑफ हिंदोस्तान’ या चित्रपटाचे  दुसरं पोस्टर प्रदर्शित

अमिताभ बच्चन, आमिर खान यांची अभिनय मेजवानी असलेल्या  ‘ठग्स ऑफ हिंदोस्तान’ या चित्रपटाचे  दुसरं पोस्टर प्रदर्शित झालं आहे.

IMG_20181014_151147(सौजन्य – इन्स्टॉग्रम)

अमिताभ बच्चन, आमिर खान, कॅटरिना कैफ आणि फातिमा सना शेख अशी तगडी स्टारकास्ट असलेल्या ‘ठग्स ऑफ हिंदोस्तान’ची दुसरी झलक आमिरने प्रेक्षकांच्या भेटीला आणली आहे.

..अन् स्वप्निल झाला भावुक

Photos of swapnil Joshi
नाटक, मालिका आणि चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या मनात हक्काची जागा निर्माण केलेला अभिनेता म्हणजे स्वप्नील जोशी. स्वप्नील जोशीचे कामाप्रती असलेला प्रामाणिकपणा, अप्रतिम अभिनय कौशल्य आणि प्रेक्षकांना सतत खूश ठेवण्याची धडपड यामुळे त्याच्या चाहत्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे; अर्थात स्वप्नीलवर जिवापाड प्रेम करणारे प्रेक्षक भरपूर आहेत जे प्रत्येकवेळी त्याच्या भेटीसाठी आणि नवीन प्रोजेक्टसाठी मनात इच्छा व्यक्त करत असतात, आपल्या प्रतिक्रिया सतत त्याच्यापर्यंत पोहचतील यासाठी प्रयत्न पण करत असतात.
Photos of Swapnil Shinde
त्यापैकी करुणा कदम आणि कुणाल शिंदे या चाहत्याने टॅटूच्या स्वरुपातून दाखवले आहे की ‘स्वप्नील जोशी हा त्याचा फेव्हरेट आहे’. शरीरावर कायम स्वरुपी टॅटू काढणे हे तितके सोपे नाही, एक खूण आपल्यासोबत आयुष्यभर राहणार असते आणि हे माहित असूनही या करुणा कदम आणि कुणाल शिंदे यांनी टॅटू काढले यावरुन हे नक्कीच सिध्द होतं की याचे स्वप्नीलवर आणि त्याच्या कामावर खूप प्रेम आणि विश्वास आहे की स्वप्नील दादू असंच प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन करत राहणार.
अर्थात हे टॅटू पाहिल्यावर, स्वप्नील जोशी देखील भावूक झाला आणि प्रेक्षकांचे आपल्यावर इतके प्रेम आहे याची पुन्हा एकदा जाणीव झाली. या जाणीवेमुळे आणि प्रेक्षकांच्या प्रेमामुळे कामाची जबाबदारी अजून वाढली असून ती मी योग्यरित्या पेलणार आणि प्रेक्षकांना कधीही निराश करणार नाही, असा निर्णय स्वप्नील जोशीने घेतला.Photos of Karuna Kadam

‘सहकारी मनोरंजन’ ची अभिनय आणि लेखन स्पर्धा

गेली ९५ वर्षे कामगार वर्गातील कलाकारांना हक्काचं व्यासपीठ मिळवून देण्यासाठी संस्थापिलेली संस्था म्हणजे ‘सहकारी मनोरंजन मंडळ.’

IMG-20181002-WA0006
येत्या ६ ऑक्टोबर ला ही संस्था ९६ वे वर्ष उत्साहात साजरे करणार आहे. यासाठी यांनी २ ऑक्टोबर रोजी लेखांकुर एकांकिका स्पर्धा आणि अभिरंग एकपात्री अभिनय स्पर्धा आयोजित केल्या आहेत. परळच्या दामोदर नाट्यगृहामागील पहिला मजला येथे या स्पर्धा घेण्यात येणार आहेत आणि ६ ऑक्टोबर रोजी विजेत्यांचा पारितोषिक वितरण समारंभ दामोदर नाट्यगृहात पार पडणार आहे.

आणि…. डॉ. काशीनाथ घाणेकर चा टीझर रिलीज

Kashinath creative 2मराठीतील सुपरस्टार आणि महान रंगकर्मी डॉ. काशिनाथ घाणेकर यांचा विलक्षण प्रवास रुपेरी पडद्यावर सादर करण्यासाठीआणि…डॉ.काशिनाथ घाणेकरया सिनेमाद्वारे. नुकताच या सिनेमाचा टीझर रिलीज झाला. 

http://bit.ly/ADKG-OfficialTeaser

ललितने शेअर केला आठवणीतला फोटो

ललितने सोशल मीडियावर त्याच्या आठवणीतील फोटो शेअर केला आहे.  त्याने ‘पती गेले गं काठेवाडी’ नाटकाच्या शुभारंभाची आठवण शेअर केली आहे.

 

(सौजन्य – इन्साटाग्राम)

IMG_20180923_205803

Create a website or blog at WordPress.com

Up ↑