१७ मे रोजी रवी जाधवचा ‘रंपाट’ पडद्यावर…! 

 
– राज चिंचणकर
       मराठी चित्रपटसृष्टीत दर शुक्रवारी विविध मराठी चित्रपट प्रदर्शित होत असले, तरी हटके चित्रपट देण्याची परंपरा राखणाऱ्या रवी जाधव यांचा चित्रपट कधी येतोय याची उत्सुकता रसिकांना कायम असते. रसिकांची ही प्रतीक्षा आता संपुष्टात येणार असून, १७ मे रोजी रवी जाधव यांचा ‘रंपाट’ हा अनोखा चित्रपट पडद्यावर येण्यास सज्ज झाला आहे. अंबर हडप, गणेश पंडित, रवी जाधव यांची कथा, पटकथा आणि संवाद असलेल्या या ‘रंपाट’चे दिग्दर्शन अर्थातच रवी जाधव यांचे आहे.
Rampaat Music Launch 1
       शीर्षकापासूनच उत्कंठा वाढवणारा हा चित्रपट असल्याने यात नक्की काय आहे, हा प्रश्न पडणे साहजिकच आहे. थोडक्यात सांगायचे, तर हल्लीच्या तरुण पिढीला झपाटून टाकणाऱ्या ‘स्टारडम’वर यात फोकस टाकण्यात आला आहे. ‘स्टारडम’ मिळवण्यासाठी देशाच्या कानाकोपऱ्यातून युवावर्ग मुंबईच्या दिशेने धाव घेत असतो. ‘रंपाट’मधले मिथुन आणि मुन्नी हे सुद्धा याच वाटेवर चालणारे आहेत. त्यांचा हा प्रवास नक्की कसा आहे, याचा उलगडा १७ मे रोजी होणार आहे. मिथुन आणि मुन्नी यांच्या भूमिकेत अभिनेता अभिनय बेर्डे आणि कश्मिरा परदेशी ही जोडी चमकत आहे.
       ‘झी स्टुडिओज्’चे मंगेश कुलकर्णी व ‘अथांश कम्युनिकेशन’च्या मेघना जाधव यांनी या चित्रपटाची निर्मिती आणि प्रस्तुती केली आहे. अभिनय बेर्डे व कश्मिरा परदेशी यांच्यासह या चित्रपटात प्रिया बेर्डे, अभिजीत चव्हाण आणि कुशल बद्रिके यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. वैभव मांगले, आनंद इंगळे, चंद्रकांत कुलकर्णी, अंकुश चौधरी आणि अमृता खानविलकर यांनी पाहुणे कलाकार म्हणून यात काम केले आहे.
       ‘रंपाटचे  संकलन अभिजित देशपांडे यांनी केले असून, वेशभूषा मेघना जाधव यांची आहे. वासुदेव राणे यांचे छायाचित्रण व संतोष फुटाणे यांचे कला दिग्दर्शन या चित्रपटाला लाभले आहे; तर पार्श्वसंगीत सौरभ भालेराव यांचे आहे. या चित्रपटात चिनार-महेश यांनी संगीत दिलेली चार गाणी आहेत. ही गाणी गुरु ठाकूर, मंगेश कांगणे, ए- जीत, जे. सुबोध, जॅझी नानू, एक्सबॉय आणि रवी जाधव यांनी लिहिली आहेत. बेला शेंडे, रोहित राऊत, हर्षवर्धन वावरे, ए- जीत, जे सुबोध, जॅझी नानू, एक्सबॉय आणि किलर रॉक्स (बिटबॉक्सर) यांच्या सोबतीने सौरभ साळुंखे यांनी ही गाणी गायली आहेत.

अशी हि आशिकी च्या लिडींग लेडी चे सिक्रेट उलगडले

पूर्वी प्रेम कनफेस करण्यासाठी फूल आणि सोबतीला प्रेमाचे दोन शब्द पुरेसे होते… पण आताची जनरेशन ही जरा एक स्टेप पुढे असल्यामुळे आता कनफेशनचं कनफ्युझन आणि इमोशनचं कमोशन झालंय. प्रेम जरी एवढं कॉम्पलिकेटेड बनलं असलं तरी प्रेक्षकांच्या भेटीला येणा-या एका नवीन जोडीची आशिकी ही जरा वेगळीच आहे. आशिकीची एक वेगळी कथा सचिन पिळगांवकर दिग्दर्शित ‘अशी ही आशिकी’ या आगामी मराठी चित्रपटात पाहायला मिळणार आहे.
abhinay berde hemal ingaleया टीझर लाँचिग सोहळ्याचे आणखी एक स्पेशल बात म्हणजे ‘या चित्रपटाची हिरोईन कोण?’ हा प्रश्न जो इतके दिवस गुलदस्त्यात होता त्याचे उत्तर आता मिळाले आहे. सचिनजी यांच्या ‘अशी ही आशिकी’ या चित्रपटात अभिनय लक्ष्मीकांत बेर्डे आणि हेमल इंगळे ही नवीन जोडी दिसणार आहे. या नवीन जोडीमध्ये फुलणारी आशिकी पाहणे, प्रेक्षकांसाठी न्यु इयरचं स्पेशल गिफ्ट असेल.
फ्रि-मांइडेड असलेले हे कपल आणि त्यांची लव्हस्टोरी ही किती इंटरेस्टिंग आणि सध्याच्या जनरेशनला रिलेट करणारी आहे याचा अंदाच टीझरमधून येतो. अभिनयने या चित्रपटात ‘स्वयम’ आणि हेमलने ‘अमरजा’ नावाचे पात्र साकारले आहे. नवीन जोडी, ऐकायला मिळणारी नवीन नावं आणि एकंदरीत संपूर्ण टीझर चित्रपटाविषयी उत्सुकता निर्माण करणारा ठरलाय.
चित्रपटाचे टायटल, हिरो-हिरोईनची जोडी, चित्रपटाची झलक, लोकेशन्स इत्यादी गोष्टींमुळे ही कलाकृती प्रेक्षकांच्या पसंतीस उतरेल. ‘अशी ही आशिकी’ची तितक्याच दर्जेची कथा-पटकथा आणि संवाद असणार कारण सचिनजी यांनी स्वत: ही जबाबदारी पार पाडली आहे. त्यामुळे कथा-संवाद यांचा दर्जा प्रत्येकाला पटेल,रुचेल असाच असणार.
Group photo 3
स्वयम आणि अमरजाची  ‘अशी ही आशिकी’च्या निमित्ताने नवीन वर्षाच्या फेब्रुवारी महिन्यात ‘व्हॅलेंनटाईन्स डे’ ऐवजी साजरा होणार ‘AHA DAY’ कारण ‘अशी ही आशिकी’ १४ फेब्रुवारीला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.

‘अशी हि आशिकी’ चा टीझर रिलीज

सचिन पिळगावकर लिखित-दिग्दर्शित ‘अशी हि आशिकी’ या चित्रपटाचा टीझर रिलीज झाला आहे . युथफुल सिनेमात अभिनय बेर्डे आणि अभिनेत्री हेमल इंगळे ही जोडी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. श्रीया पिळगावकर हिच्या हस्ते या सिनेमचा टीझर प्रदर्शित करण्यात आला.

टीझर लिंक – https://youtu.be/SsyLcnQMC_cIMG_20181224_204817

 

 

 

 

 

‘अशी ही आशिकी’ मधून दिसणार प्रेमाचा प्रवास

Poster

 

     अष्टपैलू व्यक्तिमत्व असलेले सचिन पिळगांवकर यांनी त्यांच्या ६०व्यावाढदिवसाला प्रेक्षकांसाठी एक खास भेट म्हणून त्यांच्या नवीन चित्रपटाचीघोषणा केली होती आणि खास सरप्राईज ठरलेला तो मराठी चित्रपटम्हणजेच ‘अशी ही आशिकी’. चित्रपटाचे नाव जाणून घेतल्यावर याचित्रपटातील कलाकार कोण हे जाणून घेण्याविषयी प्रेक्षकांची कुतूहलतावाढली. चित्रपटाचे नावंच इतके यंग आणि हटके आहे की या चित्रपटासाठीकलाकारांची निवड पण तितकीच हटके असणार. तर ‘अशी ही आशिकी’मध्ये अभिनय लक्ष्मीकांत बेर्डे युथफूल हिरोची भूमिका साकारणार आहे. आता अभिनयची हिरोईन कोण, हे देखील प्रेक्षकांसाठी सुंदर सरप्राईजअसेल. पण प्रेमाच्या महिन्यात अर्थात १४ फेब्रुवारीला प्रेमाचे नवे रंग, नवाअर्थ घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येतेय ‘अशी ही आशिकी’.

 अशी ही आशिकीच्या निमित्ताने तब्बल पाच वर्षांनी सचिन पिळगांवकर पुन्हा एकदा दिग्दर्शकाच्या भूमिकेतून प्रेक्षकांसमोर येत आहेत.दिग्दर्शनासह सचिनजी यांनी या चित्रपटाला संगीत दिले आहे, तसेच कथा-पटकथा-संवाद ही सचिनजी यांचेच आहेत. ‘अशी ही आशिकी’चा प्रेमाचा रोमँटिक प्रवास प्रेक्षकांसाठी नक्कीच नवीन अनुभव ठरेल.

      गुलशन कुमार आणि भूषण कुमार प्रस्तुत, ‘अशी ही आशिकी’चित्रपटाची निर्मिती ‘टी-सीरिज’ आणि ‘सिलेक्ट मिडिया’ यांनी केली असूनसहनिर्मिती सुश्रिया चित्र यांनी केली आहे. वजीर सिंह, जो राजन आणिसुप्रिया पिळगांवकर हे या चित्रपटाचे निर्माते आहेत.

Create a website or blog at WordPress.com

Up ↑