चित्रपट परीक्षण – ‘मी शिवाजी पार्क’ – व्यवस्थेवर नजर टाकणारा सिनेमा

दीनानाथ घारपुरे1540035349648_2

 मुंबई शहर, एक मायानगरी, सतत काही ना काही घटना ह्या गतिमान शहरात घडत असतात, या शहरात प्रेक्षणीय स्थळे खूप आहेत त्यातील एक ‘शिवाजी पार्क’ हा शिवाजी पार्क मुंबईत घडणाऱ्या प्रत्येक घटनेचा साक्षीदार आहे. शिवाजी पार्क मध्ये ज्येष्ठ नागरिक जमण्याचा एक कट्टा आहे,. ह्या कट्ट्यावर जवळचे, दूरचे राहणारे ज्येष्ठ नागरिक एकत्र येतात आणि आपली सुखदु:खे एकमेकात वाटतात. अश्या ह्या संवादामधून ‘मी शिवाजी पार्क’  ची कथा सुरु होते.

     न्यायाधीश विक्रम राजाध्यक्ष, सतीश जोशी, इन्स्पेक्टर दिगंबर सावंत, प्रोफेसर दिलीप प्रधान, रुस्तम मेस्त्री, हे ज्येष्ठ नागरिक आपापल्या सेवेतून निवृत्त झालेले, प्रत्येकाचे कार्यक्षेत्र वेगवेगळे असले तरी पण मनाने मात्र एकत्र आलेली अशी त्यांची अतूट मैत्री, ह्या पांचही जणांना सकाळी शिवाजी पार्कवर गप्पा मारल्या शिवाय, तेथे व्यायाम केल्या शिवाय आणि चहा बरोबर पेपर वाचल्या शिवाय चैन पडत नसते. अश्याच एका सकाळी सतीश जोशी सोडून सारेजण एकत्र गप्पा मारत असतांना चहा घेत पेपर वाचताना त्यांना “ ऐश्वर्या नायर हिची निर्घुण हत्या – बलवा शेट चा हात असल्याचा प्राथमिक अंदाज “ अशी बातमी वाचायला मिळते. त्यावर विक्रम राजाध्यक्ष सांगतात कि, “ बलवा शेट ला शिक्षा होणार नाही तो सुटणार,” ह्यावर चर्चा रंगते, आणि मग ते सतीश जोशी यांच्या तब्बेतीची विचारपूस करायला ते त्यांच्या घरी जातात आणि तेथे त्यांना कळते कि ऐश्वर्या नायर हि सतीश जोशी यांची नात होती. सतीशला ते धीर देतात. शेवटी असे निदर्शनास येते कि ऐश्वर्या नायर हिचा खून झाला ? आणि हा खून कोणी केला ? बलवा शेट ह्यांच्यावर संशयाची सुई फिरते आणि ह्या प्रश्नाचे उत्तर शोधायला विक्रम राजाध्यक्ष, दिगंबर सावंत, सतीश जोशी आणि रुस्तम मेस्त्री हे निघतात. अन्याय होत असतांना नुसते बघत रहाणे हा सुद्धा गुन्हाच आहे असे म्हणून ते चौघे निघतात. पुढे नाट्यमय घटनांची मालिका सुरु होते.  बलवा शेट चा अकस्मात मृत्यू होतो, दिलीप प्रधान म्हणतात कि बलवा शेट च्या हत्ये मधील माणसे मला माहित आहेत आणि कथानकात उत्कंठा वाढत जाते. त्याचवेळी हर्षद वेदांत ची आणखी एक घटना सामोरी येते. कोण असतो हर्षद वेदांत ? ह्या सगळ्या घटनांचा शोध घेण्यासाठी एसीपी सुमित गवळी यांची नियुक्ती केली जाते. दहा दिवसात गुन्हेगाराला शोधून काढतो असे सांगून ते कामाला सुरवात करतात.

शेवटी काय होते ? ह्या सगळ्यात सर्वसामान्य माणसाचे काय होते ? असे का घडते ? बलवा शेट आणि हर्षद वेदांत यांचा खून कोणी केला ? त्यांना शिक्षा होते का ? अश्या अनेक प्रश्नांची उत्तरे सिनेमात मिळतील. सिनेमाची कथा – पटकथा – दिग्दर्शन महेश मांजरेकर यांनी उत्तमपणे साकारले आहे. चित्रपटात उत्कंठा – गती कशी ठेवता येईल याकडे बारकाईने लक्ष दिले आहे. संकलन सर्वेश परब यांचे आहे.

विक्रम गोखले यांचा न्यायाधीश विक्रम राजाध्यक्ष, सतीश आळेकर यांचा सतीश जोशी, अशोक सराफ यांचा इन्स्पेक्टर दिगंबर सावंत, दिलीप प्रभावळकर यांचा प्रोफेसर दिलीप प्रधान, शिवाजी साटम यांचा रुस्तम मेस्त्री, या सर्वांच्या अभिनयाची जुगलबंदी लक्षांत राहते. सोबत सुहास जोशी, शरद पोंक्षे, दीप्ती लेले, सविता मालपेकर, अभिजित साटम, मधुरा वेलणकर, संतोष जुवेकर, अश्या अनेक कलावंताची साथ लाभली आहे.

वास्तवावर भाष्य करणारा प्रामाणिक चित्रपट आहे. अनुभव घेऊन आहे

पार्काच्या कट्ट्यावर बुजुर्गांची पंचरंगी जुगलबंदी…! 

3– राज चिंचणकर
       शिवाजी पार्क म्हणजे मुंबईतले मध्यवर्ती ठिकाण!  या पार्काचा कट्टा सदैव गजबजलेला असतो, तो विविध वयोगटातले लोक येथे पायधूळ झाडतात म्हणून! राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक आदी क्षेत्रांचे साक्षीदार असलेले शिवाजी पार्क, चित्रपटसृष्टीच्या नजरेतून सुटले असते तर ते नवल ठरले असते. अगदी त्याला अनुसरून, ‘मी शिवाजी पार्क’ हा चित्रपट दसऱ्याच्या मुहूर्तावर प्रदर्शित होत आहे. महत्त्वाचे म्हणजे, पाच बुजुर्ग कलावंतांची पंचरंगी जुगलबंदी या निमित्ताने पार्काच्या कट्टयावर रंगली आहे.
       विक्रम गोखले, दिलीप प्रभावळकर, अशोक सराफ, शिवाजी साटम, सतीश आळेकर ही नावे उच्चारली तरी भारदस्तपणाची जाणीव होते. हेच पाच दिग्गज कलावंत या चित्रपटात एकत्र आले आहेत. परिणामी, या चित्रपटाची उत्सुकता प्रचंड वाढली आहे. चित्रपटसृष्टीतले बुजुर्ग व्यक्तिमत्त्व असलेले महेश मांजरेकर यांचा हा चित्रपट आहे म्हटल्यावर तर ही उत्सुकता शिगेला जाऊन पोहोचते. कथा, पटकथा व दिग्दर्शन अशी जबाबदारी त्यांनी यासाठी सांभाळली आहे.
       ‘न्यायदेवता आंधळी असते, आम्ही डोळस होतो’ अशी या चित्रपटाची टॅगलाईन पाहून तर या कुतूहलात अधिकच भर पडते.  बरं, एवढे सगळे करूनच ही टीम थांबलेली नाही. चित्रपटातल्या या पाच कलावंतांसह उदय टिकेकरशरद पोंक्षेसुहास जोशीभारती आचरेकरसविता मालपेकर, संतोष जुवेकरसुशांत शेलारदिप्ती लेलेमंजिरी फडणीसदिप्ती धोत्रे आदी कलाकारही पार्काच्या या कट्ट्यावर सामील झाले आहेत. मल्टिस्टारर म्हणावा असा हा चित्रपट नक्की आहे तरी काय, यासाठी दसऱ्याची सकाळ उजाडावी लागणार आहे.

‘प्रवास’ चित्रपटाचा मुहूर्त

1प्रवास आपल्या प्रत्येकाच्याच जगण्याचा एक अविभाज्य भाग असतो. जन्मापासून सुरु झालेला हा प्रवास प्रत्येक वळणावर आपल्याला काही ना काही नवं शिकवतअसतो आणि सोबत अनुभवसंपन्न करत असतो. आयुष्याच्या प्रवासाचा एक आगळावेगळा दृष्टिकोन दाखविणाऱ्या प्रवास या आगामी मराठी चित्रपटाचा मुहूर्त नुकताच दिमाखात संपन्न झाला.

ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ आणि हिंदी-मराठी चित्रपटसृष्टी गाजविणाऱ्या अभिनेत्री पद्मिनी कोल्हापूरे अशी वेगळी जोडी ‘प्रवास’ चित्रपटाच्या माध्यमातून पहिल्यांदाच आपल्यासमोर येणार आहे. सोबत विक्रम गोखले, रजत कपूर, शशांक उदापूरकरआदि कलाकार यात असणार आहेत.

5

५० वर्षाच्या कारकिर्दीमध्ये एका वेगळ्या प्रकारची भूमिका करायला मिळत असल्याचा आनंद व्यक्त करतानाच  हा प्रवास प्रेक्षकांनाही एक वेगळी अनुभूती देईल, असा विश्वास अभिनेते अशोक सराफ यांनी व्यक्त केला. ‘प्रवास’ च्या निमित्ताने मोठ्या कालावधीनंतर मराठीत काम करायला मिळाल्याचा आनंद अभिनेत्री पद्मिनी कोल्हापूरे यांनी व्यक्त केला. ‘जे शेष आहे ते विशेष आहे’ असं सांगणारा हा प्रवासमाझ्यासाठी ही तितकाच महत्त्वपूर्ण असून माझ्या या दिग्दर्शकीय प्रवासात दिग्ग्जांची मला मिळालेली साथ मला बरंच काही शिकवून जाईल, असा विश्वास दिग्दर्शक शशांक उदापूरकर व्यक्त करतात.

‘मी शिवाजी पार्क’ १८ आँक्टोबरला प्रदर्शित

समाजातल्या अनेक गोष्टीचं प्रतिबिंब ज्याप्रमाणे चित्रपटात उमटते त्याचप्रमाणे चित्रपटातून समाजमनाला भेडसावणारे काही प्रश्नही दाखवण्यात येत असतात. आपल्या समाजात अनेक ज्वलंत मुद्दे आहेत. अनेक चुकीच्या घटना आपल्या अवतीभोवती घडत असतात. कायद्याच्या चौकटीत राहून त्यावर न्याय देण्याचा प्रयत्नही होत असला तरी न्यायाला होणाऱ्या विलंबाचे कटू सत्य आपण नाकारू शकत नाही. कायदेशीर लढाईच्या विलंबामुळे होणारी फरपट हा विषय मध्यवर्ती ठेवत दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी मी शिवाजी पार्क या चित्रपटाची कथा गुंफली आहे. हा चित्रपट येत्या १८ ऑक्टोबर ला प्रेक्षकांच्या भेटीला येतोय.4

न्यायदेवता आंधळी असते… आम्ही डोळस होतो’ ही टॅगलाईन असलेल्या मी शिवाजी पार्क या चित्रपटात व्यवस्थेने गांजल्यामुळे रिअॅक्ट झालेल्या पाच ज्येष्ठ नागरिकांची गोष्ट मांडली आहे. एका घडलेल्या घटनेबाबत न्याय  मिळवण्यासाठी वेगवेगळ्या पार्श्वभूमीचे पाच ज्येष्ठ नागरिक एकत्र येऊन आपापल्या पातळीवर कसा लढा लढतात याची कथा पहायला मिळणार आहे. ‘दिलीप प्रभावळकर हे निवृत्त प्राध्यापकाच्या भूमिकेत आहेत. विक्रम गोखले यांनी निवृत्त न्यायमूर्ती तसेच शिवाजी साटम यांनी पारसी व्यक्तीची भूमिका वठवली आहे. निवृत्त बँक अधिका-याची भूमिकेत सतीश आळेकर असून अशोक सराफ यांनी निवृत्त पोलीस इन्स्पेक्टर यात साकारला आहे.

1

विक्रम गोखले,  सतीश आळेकर,  अशोक सराफशिवाजी साटमदिलीप प्रभावळकर या दिग्गजांच्या जोडीला उदय टिकेकरशरद पोंक्षेसुहास जोशीभारतीआचरेकरसविता मालपेकर, संतोष जुवेकरसुशांत शेलारदिप्ती लेलेमंजिरी फडणीसदिप्ती धोत्रे आदि कलाकारही या चित्रपटात दिसणार आहेत.

अशोक सराफ म्हणतात,   कलाकाराचे ‘टायमिंग’ महत्त्वाचे…!  

Ashok Saraf

– राज चिंचणकर
       ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांच्या मते, कुठल्याही कलाकाराकडे ‘टायमिंग’ असल्याशिवाय त्याला विनोदीच काय; तर कोणत्याही प्रकारचा आर्टिस्ट बनता येत नाही.  कलाकाराचे ‘टायमिंग’ महत्त्वाचे असते. वास्तविक, हे ‘टायमिंग’ प्रत्येकाकडे असतेच. पण जो कोण ते ‘डेव्हलप’ करतो तोच पुढे जातो. अशोक सराफ यांच्या ‘हृदयात समथिंग समथिंग’ या चित्रपटाच्या प्रदर्शनाचे ‘टायमिंग’ साधत त्यांनी हे अनुभवाचे बोल ऐकवले आहेत.
       ‘टायमिंग’चा बादशहा म्हणून ख्याती असलेले अशोक सराफ बऱ्याच कालावधीनंतर पडद्यावर भूमिका साकारत आहेत. विशेष म्हणजे, त्यांनी या चित्रपटात एक गाणेही गायले आहे. या गाण्याविषयी बोलताना ते म्हणतात, गाणे हा काही माझा प्रांत नाही; परंतु या गाण्याच्या माध्यमातून मी सुरांच्या जवळ जाण्याचा प्रयत्न केला आहे.

कलाकारांची गायक म्हणून ‘एन्ट्री’…! 

HSS– राज चिंचणकर
 चित्रपटात कलाकार अभिनयाची जबाबदारी सांभाळतात आणि गायक मंडळी सुरांतून त्यांची छाप पाडतात. पण या भूमिका त्यांनी बदलल्या तर…?  असे काहीसे झाले आहे खरे. ‘हृदयात समथिंग समथिंग’ या मराठी चित्रपटाच्या बाबतीत ही घटना घडली आहे. या चित्रपटात ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांच्यासह अनिकेत विश्वासराव, स्नेहा चव्हाण, प्रियांका यादव, भूषण कडू, आनंदा कारेकर अशी कलाकारांची टीम आहे. या चित्रपटात असलेल्या ‘हळदी’च्या गाण्यात चक्क अशोक सराफ, अनिकेत विश्वासराव, स्नेहा चव्हाण, प्रियांका यादव या कलाकारांनी गायक म्हणून ‘एन्ट्री’ घेतली आहे. या मंडळींच्या आवाजातच हे गाणे चित्रपटात आहे. ज्येष्ठ कथा व पटकथालेखक अनिल कालेलकर यांच्या या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रवीण राजा कारळे यांनी केले आहे. ५ ऑक्टोबरला प्रदर्शित होत असलेल्या या चित्रपटाचे चार निर्माते विविध क्षेत्रातले असून, सचिन संत हे सह-निर्माते म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत.

Create a website or blog at WordPress.com

Up ↑