संदीपचा नवा अवतार ‘कृतांत’…

अभिनेता संदीप कुलकर्णी नेहमीच आपल्या भूमिकेविषयी मेहनत घेतो. संदीपने मराठीसह हिंदीतही त्याच्या वेगळ्या अभिनयाची छाप सोडलीयं. मात्र, संदीप त्याच्या आगामी मराठी चित्रपटात एका वेगळ्याच भूमिकेत दिसतोय. ‘कृतांत’ या चित्रपटातील हटके लूकसाठी संदीपने फार मेहनत घेतलीय. नुकतंच या चित्रपटाचा फर्स्ट लूक रिव्हिल करण्यात आला. यामध्ये संदीपचा अनोखा अंदाज पाहायला मिळतोय. ‘रेनरोज फिल्म्स’अंतर्गत मिहीर शाह यांची निर्मिती असलेल्या या चित्रपटांच दिग्दर्शन दत्ता भंडारे यांनी केलंय. तसंच दत्ता यांनीच या चित्रपटाची कथा, पटकथा आणि संवादलेखनही केलंय. ‘कृतांत’ची कथा सध्याच्या राहणीमानावर आधारित असेल. आजच्या धावपळीच्या व्यावहारिक जीवनातील तात्त्विकतेचा संबंध अधोरेखित करण्यात आलाय. krutant

Create a website or blog at WordPress.com

Up ↑