लॉकडाऊन मधील घरगुती हिंसेवर डॉक्टर डॉन सांगतोय त्याचा फंडा !!

 

कोरोना आणि हे सुरु असलेले लॉक डाऊन आता लोकांना सवयीचे झाले आहे अर्थात लवकरच हे सर्व संपेल आणि एक नवीन आनंदी सुरुवात सर्वांनाच करायला मिळेल . अनेक नवीन चांगल्या गोष्टी सुरु होतीलच मात्र त्यासाठी आता या वेळेला सर्वांनीच एकमेकांशी चांगलं वागणं महत्वाचं आहे . लोकडाऊन आणि वर्क फ्रॉम होम मुळे कौटुंबिक हिंसाचार वाढल्याची धक्कादायक माहिती सध्या सर्वत्र पाहायला मिळत आहे .यासाठी आता झी युवा वाहिनीवरील डॉक्टर डॉन या मालिकेतील देवा म्हणजेच देवदत्त नागे एक विशेष कविता घेऊन आला आहे.

घरगुती हिंसाचार ह्याविषयी कोणीही काहीच बोलत नसले तरीही हा विषय खरंच गंभीर आहे. आणि अनेक घरात हा सुरु आहे .सर्वच जाती, धर्म आणि वर्गातील बायकांवर हिंसाचार होताना दिसतो. घरातील हिंसाचारामुळे बायकांना शारीरिक आणि मानसिक ञास आणि वेदना गप्प बसून सहन कराव्या लागतात. बायकांनी या गप्प बसा संस्कृतीचा आपल्या आयुष्याचा एक भाग मानला आहे. याला छेद देऊन आज पुढे येण्याची गरज आहे . मारहाण हे स्ञियांवरील हिंसेचं उघड रूप आहे, पण फक्त मारहाण म्हणजे हिंसा नाही. मानसिक जाच, शिवीगाळ, अपमानकारक, हीन वागणूक, लैंगिक छळ, जबरदस्तीने शारीरिक संबंध, छेडछाड ही देखील हिंसाच आहे. त्यामुळे देवा ने अगदीच हलक्या फुलक्या अंदाजात या लॉक डाऊन मध्ये घरात अडकलेल्या जोडप्यावर कविता केली आहे. तर तुम्हाला ही कविता कशी वाटते ते देवाला त्याच्या सोशल मीडिया अकाउंट द्वारे कळवा.

WhatsApp Image 2020-05-12 at 10.39.12

हि श्टोरी हाये घरात अडकलेल्या एका जोडीची खरंतर काही घरातल्या डोमेस्टिक वोईलन्स ची

सर्वाना माहीतेय की जगात सर्वत्र पसरला आहे कोरोना
पण आपल्या या काही जोडीचं मात्र रोजच चालू आहे रोना नि धोना..

पण इलाज काय? ह्यांचं मॅटर म्हणजे तुझं माझं जमेना आणि तुझ्या वाचून करमेना…

पण डॉक्टर डॉन म्हणतो हा लय महत्वाचा हाये टाईम…
जर समजून नाय घेतलं एकमेकांना, तर व्हावं लागेल दूर एकमेकांपासून टोटल काॅरंटाईन .

आता लग्न केलंत तर प्रेम पण करायचं लय , काळजी घ्यायची भारी…
कोरोनाशी लढायची करायची एकत्र तयारी..
अहो घ्या सबुरीने सध्या, सरकार करतेय त्यांचं काम ते आपलं काम थोडं हाये..
मग देवा भाई तुमाला पण बोलेल , श्रीखंड लय गोड हाये…

देवा भाई बोलतो घरात नाय नडायचं , मॅटर करा सर्व क्लोज..
ही वेळ आहे एकमेकांना सांभाळायची , भांडण काय हे संपल्यावर करू शकता दररोज !

घरात रहा सेफ , कारण बाहेर पडला तो खपला..
प्रेम करा , टेक केअर करा आणि बघा झी युवा आपला !

Create a website or blog at WordPress.com

Up ↑