“आणि … डॉ. काशिनाथ घाणेकर” सिनेमाचा ट्रेलर रिलीज

मराठी रंगभूमीचा पहिला सुपरस्टार डॉ. काशिनाथ घाणेकर यांच्यावर  सिनेमा येत असल्याने या चित्रपटाच्या घोषणेपासूनच प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहचलेली आहे. चित्रपटाचा विषय, त्यामधील तगडे कलाकार यामुळे चित्रपट बराच चर्चेत राहिला असून हा चित्रपट प्रेक्षकांमध्ये आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरला आहे. सुबोध भावे या चित्रपटात मुख्य भूमिका साकारत असून चित्रपटाच्या दोन्ही टीझरला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळाला आहे. 

या चित्रपटाचा ट्रेलर सुबोध भावे,सोनाली कुलकर्णीसुमित राघवन यांच्या उपस्थित नुकताच प्रदर्शित झाला. दिवाळीच्या शुभमुहूर्तावर ८ नोव्हेंबर रोजी “आणि … डॉ. काशिनाथ घाणेकर” हा  सिनेमा रुपेरी पडद्यावर प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. 

ट्रेलर लिंक – http://bit.ly/ADKGTrailer (सौजन्य -युट्यूब)

 

DSC_5495

‘हैद्राबाद कस्टडी’ चा टीझर पोस्टर रिलीज

IMG-20180806-WA0011
सुपरहिट ‘बबन’ नंतर द फोक कोनफ्लूअन्स इंटरटेंटमेंट प्रस्तूत आणि चित्राक्ष फिल्म्स निर्मितीसंस्था एका नव्या कोऱ्या चित्रपटाच्या तयारीला लागली आहे. भाऊराव कऱ्हाडे यांचे दिग्दर्शन असलेल्या या चित्रपटाचे नाव ‘हैद्राबाद कस्टडी’ असे असून, सोशल नेट्वर्किंग साईटवर नुकत्याच प्रदर्शित झालेल्या टीझर पोस्टरद्वारे त्याची अधिकृत घोषणा करण्यात आली. या सिनेमाच्या नावावरून आणि टीझर पोस्टरवरून हा सिनेमा पोलीस कोठडी आणि कैद्यांवर आधारित असल्याचा अंदाज येतो. शिवाय, या सिनेमाच्या टीझर पोस्टरवर, थर्ड डिगरीसाठी वापरण्यात येणारा पट्टादेखील पाहणाऱ्याचे लक्ष वेधून घेत आहे. इतकेच नव्हे तर, हैद्राबाद कस्टडी असे या सिनेमाचे नाव असल्याकारणामुळे, हा चित्रपट नेमका कशावर आधारित आहे? असा प्रश्नदेखील प्रेक्षकांना पडत आहे.
ग्रामीण आणि वास्तविक समस्येवर सिनेमाच्या माध्यमातून भाष्य करणारा दिग्दर्शक म्हणून भाऊराव कऱ्हाडे यांना ओळखले जाते. ‘ख्वाडा’, आणि ‘बबन’ हे दोन्ही सिनेमे याच धाटणीचे असल्यामुळे त्यांचा आगामी ‘हैद्राबाद कस्टडी’ हा सिनेमा, सिनेरसिकांसाठी कुतूहलाचा विषय ठरत आहे.

Create a website or blog at WordPress.com

Up ↑