चित्रपट परिक्षण – ‘नशीबवान’-  कालाय तस्मै नमः 

दीनानाथ घारपुरे –

      ‘नशीब…’  नशिबाने माणसाचे जीवन बदलून जाते. चांगले वागले कि त्याचे फळ चांगले मिळते. त्याचप्रमाणे अति लोभाचे सुद्धा फळ हे मिळतेच. हा मानवी स्वभाव आहे. अशाच मध्यवर्ती कल्पनेवर आधारित नशीबवान चित्रपट आहे. नशीबवान ची कथा उदय प्रकाश यांच्या ‘दिल्ली कि दिवार’ या कथेवर आधारित आहे.

p ss 3

      सफाई कामगार बबन ह्याच्या कुटुंबाची कथा नशीबवान मध्ये मांडली आहे. एका महानगर पालिकेमध्ये नोकरी करीत असलेल्या बबनच्या आयुष्यात सफाई करताना एक विलक्षण घटना घडते आणि त्याचे नशीब बदलून जाते. आपली आर्थिक परिस्थिती बेताची असतानाच अशी घटना घडल्याने त्याचे जीवन हळू-हळू बदलायला लागते. लहान खोली मधून मोठया जागेत त्याचे स्थलांतर होते. सर्व सुख सोई तो उपभोगू लागतो आणि तो सर्वांच्या मनात घर करून रहातो. नशिबाने लॉटरी सारखा मिळालेला पैसा आणि कष्ट करून मिळवलेला पैसा ह्या मध्ये फरक आहे. माझा बॉस मला पैसे देतो असे तो सांगत असतानाच बबनला व्यसने लागतात. त्याची विचारसरणी बदलते आणि शेवटी त्याला त्याचे परिणाम भोगावे लागतात. हे नेमके काय आहे ? ते सिनेमात पहायला मिळेल.

nw_poster 01_artwork only

      भाऊ कदमने बबन ची भूमिका मनापासून वेगवेगळे कंगोरे दाखवत केली आहे. त्याला साथ मिताली जगताप-वराडकर, नेहा जोशी यांनी छान दिलेली आहे. दिग्दर्शक अमोल वसंत गोळे यांनी चित्रपटाची कथा गतिमान ठेवली आहे. पैसा मिळायला लागला कि माणसाच्या स्वभावामध्ये परिस्थिती प्रमाणे बदल होतो, व्यक्तीने कष्टाने मिळवलेला पैसा आणि नशिबाने अचानक मिळालेला पैसा ह्या वर सिनेमा विचार मांडतो. एकंदरीत चित्रपट ठीक आहे.

राकेश बापट अध्यात्माच्या दिशेने

हिंदीसोबतच मराठीतही आपल्या अभिनयाची चुणूक दाखवणारा मराठमोळा अभिनेता राकेश बापटची पावलं अध्यात्माच्या दिशेने वळली आहेत. राकेशच्या जीवनात असं काय घडलं की त्याला अध्यात्माची ओढ लागली असावीअसा प्रश्न पडणं साहजिक आहेपण यातही ट्विस्ट आहे. मराठी चित्रपटात ‘चॅाकलेट हिरो’ म्हणून नावारूपाला आलेला राकेश खऱ्या जीवनात नव्हेतर चंदेरी दुनियेत अध्यात्माकडे वळला आहे. सविता दामोदर परांजपे या आगामी चित्रपटासाठी राकेश अध्यात्मिक बनला आहे. 

नेहमीच आव्हानात्मक भूमिकांच्या शोधत असणाऱ्या राकेशला सविता दामोदर परांजपे चित्रपटाच्या निमित्ताने पुन्हा एकदा एक वेगळी भूमिका साकारण्याची संधी मिळाली. या सिनेमात राकेशने साकारलेला अशोक हस्तमुद्रीकांत पारंगत आहे. टीआयएफआरचा स्कॅालर असूनही तो अध्यात्माकडे का वळतो याचं उत्तर सविता दामोदर परांजपे हा सिनेमा पाहिल्यावर मिळेल.

या सिनेमातील अशोकच्या भूमिकेबद्दल बोलताना राकेश सांगतो की, ‘आजवर मी नेहमीच वैविध्यपूर्ण भूमिका साकारण्याला प्राधान्य दिलं आहे. सविता दामोदर परांजपे मधील व्यक्तिरेखाही त्याच वाटेवरील पुढचं पाऊल आहे. या सिनेमात मुख्य भूमिकेत असलेल्या शरद आणि कुसूम यांच्या जीवनाला कलाटणी देणारी माझी व्यक्तिरेखा प्रेक्षकांनाही नक्कीच आवडेल असा विश्वासही राकेशने व्यक्त केला आहे.

जॅान अब्राहमची पहिली मराठी निर्मिती असलेल्या या चित्रपटात राकेश सोबत सुबोध भावेतृप्ती तोरडमलअंगद म्हसकरपल्लवी पाटीलसविता प्रभुणे आदि कलाकारांच्या भूमिका आहेत. योगेंद्र मोगरेतृप्ती मधुकर तोरडमल सहनिर्माते आहेत. मंदार चोळकर व वैभव जोशी यांनी लिहिलेल्या गीतांना निलेश मोहरीर आणि अमित राज या मराठीतील दोन आघाडीच्या संगीतकारांनी स्वरसाज चढवला आहे. 2.JPG हा चित्रपट ३१ ऑगस्टला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

गिरीश जोशी चित्रपट दिग्दर्शकाच्या ‘भूमिकेत

Girish Joshi
– राज चिंचणकर
       रंगभूमीवर आपला दमदार ठसा उमटविलेले लेखक-दिग्दर्शक गिरीश जोशी आता एका वेगळ्या ‘भूमिकेत’ दिसणार आहेत. ३१ ऑगस्ट रोजी रुपेरी पदड्यावर येऊ घातलेल्या ‘टेक केअर गुड नाईट’ या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची सूत्रे त्यांनी स्वीकारली आहेत. रंगभूमी ते चित्रपट हे त्यांचे स्थित्यंतर कशा पद्धतीचे आहे, हे समजण्यासाठी ३१ ऑगस्टची वाट पाहावी लागणार आहे.
       गिरीश जोशी यांनी काही चित्रपट लिहिले आहेत; परंतु चित्रपटाचे दिग्दर्शन मात्र ते प्रथमच करत आहेत. चित्रपटाचे लेखनही त्यांचेच आहे. ते म्हणतात, पाल्य आणि पालकत्व या विषयाशी संबंधित हा चित्रपट असून सायबर क्राईम पद्धतीची हाताळणी आम्ही या चित्रपटात केली आहे. काही खऱ्या घटनांवर आधारित असलेल्या या चित्रटपटातून सावधगिरीचा इशाराही प्रेक्षकांना मिळेल.
       या चित्रपटात सचिन खेडेकर, महेश मांजरेकर, इरावती हर्षे, आदिनाथ कोठारे, पर्ण पेठे, जयवंत वाडकर आदी कलाकारांच्या भूमिका आहेत. विशेष म्हणजे, आदिनाथ कोठारे यात खलनायकी भूमिका साकारत आहे.

Create a website or blog at WordPress.com

Up ↑