‘तू तिथे असावे’लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

आत्मविश्वासाच्या बळावरभावनांची निरगाठ सोडवत स्वप्नं कशी साकार करायची हे सांगू पहाणारा ‘तू तिथे असावे’ हा मराठी चित्रपट येत्या ७ डिसेंबरला प्रदर्शित होत आहे.

गाण्याची आवड असणाऱ्या एका छोट्या खेड्यातून आलेल्या मल्हार या युवकाचा प्रसिद्ध गायक होण्यापर्यंतचा प्रवास या संगीतमय चित्रपटातून उलगडणार आहे.भूषण प्रधान, पल्लवी पाटील या देखण्या जोडीसोबत मोहन जोशीअरुण नलावडे,विजय पाटकरजयवंत वाडकरसमीर धर्माधिकारीमास्टर तेजस पाटीलश्रीकांत वट्टमवारअभिलाषा पाटीलविशाखा घुबे हे कलाकार या चित्रपटात आहेत.Untitled Session0384

नात्यांची सुरेख सांगड घालत जगण्याचा अर्थ उलगडून दाखवणारा ‘तू तिथे असावे७ डिसेंबरला सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.

चित्रपट परिक्षण – ‘रे राया’ – एक खेळपट

 

आपण आपल्या जीवनात विविध गोष्टीना महत्व देतोशिक्षणाबरोबर खेळामध्ये सुद्धा प्राविण्य मिळवावे हि मनीषा अनेक मुलांची असते पण त्यांना तशी संधी मिळणे हे महत्वाचे असतेसंधी मिळाली तरी त्याला सराव करण्यासाठी योग्य ती पार्श्वभूमी मिळणे हे गरजेचे असतेतसेच प्रशिक्षक लाभणे हे सुद्धा गरजेचे असतेअसे अनेक प्रश्न आपल्या समोर उभे असतातखेळखेळाडूआणि प्रशिक्षक आणि त्याच बरोबर येणारी सिस्टीम या मध्यवर्ती कल्पनेवर ” रे राया ” ह्या सिनेमाची निर्मिती केली आहे. 

आदेश नावाचा मुलगा खेडयामध्ये राहणारा. शाळेत शिकत असताना त्याला खेळाची आवड निर्माण होते. गरीब असल्याने त्याला खेळाच्या साठी लागणाऱ्या वस्तू घेता येत नाहीत, तरी त्याची धावपटू होण्याची इच्छा असते. शाळेमधील खेळाचे शिक्षण देणाऱ्या शिक्षकांच्या लक्षांत ते येते आणि एक दिवस त्याला प्राथमिक स्पर्धेत उतरवले जातेपण खेळाडूंची निवड करणाऱ्या समितीवर शाळेतील काही वरिष्ठ लोकांच्या कडून दबाब टाकला जातोपण नंतर काही कारणामुळे त्याला स्पर्धेत घेतले जाते. तो मिळालेल्या संधीचे सोने करतो आणि स्पर्धा जिंकतोपुढे तो मोठा धावपटू बनतोअनेक बक्षिसे मिळतातपण खेळाडूंना मिळणारा मानाचा पुरस्कार त्याला मिळत नाहीआदेश शहर सोडून आपल्या गावी निघून जातो.

एक दिवस गावामधील मुलांच्यात त्याला एक धावपटूएक तिरंदाजएक उंच उडी मारू शकेल असे तीन मुले सापडतात.  त्यांच्यामधील उपजत असणारे हे गुण आदेश ओळखतो आणि त्यांना घेऊन तो शहरात येतो. तिथे त्याना उत्तम प्रशिक्षण देतोपुढे त्या मुलांचे भवितव्य कसे घडतेहे सारे रे राया मध्ये बघायला मिळेल.

आदेश भूषण प्रधान ], राहुल विवेक चाबुकस्वार ], वसू हंसराज जगताप ], आकाश सुदर्शन पाटील ], यांनी त्यांच्या भूमिका उत्तम साकारलेल्या आहेतया शिवाय उदय टिकेकरसंस्कृती बालगुडेअभिजित चव्हाण यांनी आपल्या भूमिकेला न्याय दिलेला आहे.चित्रपटाला मिलिंद शिंदे यांचे दिगदर्शन लाभले असून त्यांनी चित्रपट बंदिस्तपणे सादर केला आहेकथापटकथासंवाद किरण बेरड यांचे आहे छायाचित्रण प्रताप नायर यांनी केले असून संकलन अमित सोनावणे याचं आहे.  आणि मंगेश धाकडे यांचे संगीत ठीक आहे.

याची निर्मिती राधे मोशन फिल्म्स तर्फे करण्यात अली असून त्याचे निर्माते अजय सुखेजा हे आहेतदिगदर्शन मिलिंद शिंदे यांनी केलं असून ह्या मध्ये भूषण प्रधानसंस्कृती बालगुडेउदय टिकेकरअभिजित चव्हाणविवेक चाबुकस्वार, हंसराज जगताप, सुदर्शन पाटील, मल्हार धोत्रे, नयन जाधव असे कलाकार असून त्यांनी आपल्या भूमिका साकारलेल्या आहेत.

 

दीनानाथ घारपुरे 

Create a website or blog at WordPress.com

Up ↑