परीक्षण –   “भाई व्यक्ती कि वल्ली”[पूर्वार्ध ]  – प्रेमळ आठवणींची शिदोरी …

  दीनानाथ घारपुरे –

 

महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्व पु. ल. देशपांडे अर्थात भाई त्यांच्या व्यक्तिमत्वाचे अनेक पैलू रसिकांना माहित आहेत, विनोदी कथा लेखन, नाटक, सिनेमा, प्रवासवर्णन, एकपात्री प्रयोग, गीत, संगीत अभिनय ह्या सर्वच गुणांनी त्यांनी रसिकांना फक्त आनंद दिला. आजच्या घडीला सुद्धा ते आपल्या मनांत घर करून आहेत. सर्वच रसिकांच्या हृदयात त्यांनी मानाचे स्थान मिळवले आहे. आजसुद्धा पु. ल. देशपांडे यांच्या कथांचे, प्रवासवर्णन चे वाचन करून रसिक आनंदित होतो. पु. ल. देशपांडे ह्यांच्या व्यक्तिमत्वाचा आढावा, “ भाई, व्यक्ती कि वल्ली { पूर्वार्ध ], ह्या चित्रपटात सादर केला आहे. पण त्यांच्या व्यक्तिमत्वाचा मागोवा पूर्वार्ध आणि उत्तरार्ध अशा दोन भागात निर्मिती होणार आहे.

film bhai vyakti ki valli photo.1

  पु.ल. देशपांडे यांच्या आयुष्याचा आवाका इतका मोठा आहे कि पूर्वार्धात, सुरवातीला त्यांचे बालपण, पेटीवादन, वडिलांनी दिलेले प्रोत्साहन, शालेय जीवन, चाळीतल्या मुलांनी केलेले नाटुकले, पासून पुण्यातील वास्तव्य, फर्ग्युसन कॉलेज मधील त्यांचा काळ, त्यांचे सुंदर दिवाडकर बरोबर झालेले पहिले लग्न, आणि नंतर सुनिता ठाकूर यांच्या बरोबर झालेली ओळख,आणि नंतर लग्न, त्याच बरोबर पु. ल. देशपांडे यांना भेटलेल्या अनेक व्यक्ती. त्यामध्ये राम गबाले, ग. दि. माडगुळकर, भीमसेन जोशी, वसंतराव देशपांडे, नाथा कामत, डॉ. जब्बार पटेल, कुमार गंधर्व, रावसाहेब, अंतू बर्वे, अशा अनेक मित्रांच्या बरोबर केलेली कामे ह्याचा मागोवा छान घेतला आहे. पु. ल. देशपांडे यांना मित्रांच्या संगतीत रमायला आवडायचे. रंगभूमी आणि संगीतावरील त्यांचे प्रेम अशा अनेक पैंलूचे दर्शन आल्हादायक आहे. त्याचवेळी त्यांच्या घरातील कौटुंबिक सुख-दुःखाचे  संयमाने दाखवलेले प्रसंग मनाला चटका लावून जातात.

film bhai vyakti ki valli photo

      यामध्ये पु. ल. देशपांडे यांची व्यक्तिरेखा सागर देशमुख यांनी छान रंगवली असून त्यातील बारीक सारीक बारकावे, त्यांच्या लकबी उत्तमपणे साकारलेल्या आहेत. सुनीताबाई ची भूमिका इरावती हर्षे यांनी त्या व्यक्तिरेखेच्या विविध छटांसह सादर केली आहे. या शिवाय सचिन खेडेकर, सुनील बर्वे, विद्याधर जोशी, शुभांगी दामले, अजय पुरकर, स्वानंद किरकिरे, पद्मनाभ बिंड, सतीश आळेकर, इत्यादी सर्वच कलाकारांनी आपल्या भूमिकेला योग्य तो न्याय दिलेला आहे. दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी प्रत्येक व्यक्तिरेखेला उत्तमपणे सादर केल आहे. चित्रपटाच्या शेवटची बहारदार मैफल खास आठवणीतील साठवण आहे. एक सुंदर सिनेमा पाहिल्याचे समाधान नक्कीच मिळेल.

भाई व्यक्ती कि वल्ली [ पूर्वार्ध ], ची निर्मिती महेश मांजरेकर मुव्हीज ने केली असून प्रस्तुती वायकोम १८ मोशन पिक्चर्स ने केली आहे. दिग्दर्शन महेश मांजरेकर यांचे असून छायांकन करण बी रावत, संगीत अजित परब, यांचे आहे. पटकथा गणेश मतकरी संवाद रत्नाकर मतकरी यांनी लिहिले आहेत, यामध्ये सागर देशमुख, इरावती हर्षे, सुनील बर्वे, सचिन खेडेकर, ऋषिकेश जोशी, शुभांगी दामले, जयंत देशपांडे, सतीश आळतेकर, स्वानंद किरकिरे, अजय पुरकर, पद्मनाभ बिंड, प्रतिभा भगत, संदीप ठाकूर, असे एकूण सत्तर कलाकारांचा सहभाग आहे. रंगभूषाकार विक्रम गायकवाड यांची मोलाची कामगिरी कोणीच विसरू शकणार नाही.

 

चित्रपट परीक्षण – ‘मी शिवाजी पार्क’ – व्यवस्थेवर नजर टाकणारा सिनेमा

दीनानाथ घारपुरे1540035349648_2

 मुंबई शहर, एक मायानगरी, सतत काही ना काही घटना ह्या गतिमान शहरात घडत असतात, या शहरात प्रेक्षणीय स्थळे खूप आहेत त्यातील एक ‘शिवाजी पार्क’ हा शिवाजी पार्क मुंबईत घडणाऱ्या प्रत्येक घटनेचा साक्षीदार आहे. शिवाजी पार्क मध्ये ज्येष्ठ नागरिक जमण्याचा एक कट्टा आहे,. ह्या कट्ट्यावर जवळचे, दूरचे राहणारे ज्येष्ठ नागरिक एकत्र येतात आणि आपली सुखदु:खे एकमेकात वाटतात. अश्या ह्या संवादामधून ‘मी शिवाजी पार्क’  ची कथा सुरु होते.

     न्यायाधीश विक्रम राजाध्यक्ष, सतीश जोशी, इन्स्पेक्टर दिगंबर सावंत, प्रोफेसर दिलीप प्रधान, रुस्तम मेस्त्री, हे ज्येष्ठ नागरिक आपापल्या सेवेतून निवृत्त झालेले, प्रत्येकाचे कार्यक्षेत्र वेगवेगळे असले तरी पण मनाने मात्र एकत्र आलेली अशी त्यांची अतूट मैत्री, ह्या पांचही जणांना सकाळी शिवाजी पार्कवर गप्पा मारल्या शिवाय, तेथे व्यायाम केल्या शिवाय आणि चहा बरोबर पेपर वाचल्या शिवाय चैन पडत नसते. अश्याच एका सकाळी सतीश जोशी सोडून सारेजण एकत्र गप्पा मारत असतांना चहा घेत पेपर वाचताना त्यांना “ ऐश्वर्या नायर हिची निर्घुण हत्या – बलवा शेट चा हात असल्याचा प्राथमिक अंदाज “ अशी बातमी वाचायला मिळते. त्यावर विक्रम राजाध्यक्ष सांगतात कि, “ बलवा शेट ला शिक्षा होणार नाही तो सुटणार,” ह्यावर चर्चा रंगते, आणि मग ते सतीश जोशी यांच्या तब्बेतीची विचारपूस करायला ते त्यांच्या घरी जातात आणि तेथे त्यांना कळते कि ऐश्वर्या नायर हि सतीश जोशी यांची नात होती. सतीशला ते धीर देतात. शेवटी असे निदर्शनास येते कि ऐश्वर्या नायर हिचा खून झाला ? आणि हा खून कोणी केला ? बलवा शेट ह्यांच्यावर संशयाची सुई फिरते आणि ह्या प्रश्नाचे उत्तर शोधायला विक्रम राजाध्यक्ष, दिगंबर सावंत, सतीश जोशी आणि रुस्तम मेस्त्री हे निघतात. अन्याय होत असतांना नुसते बघत रहाणे हा सुद्धा गुन्हाच आहे असे म्हणून ते चौघे निघतात. पुढे नाट्यमय घटनांची मालिका सुरु होते.  बलवा शेट चा अकस्मात मृत्यू होतो, दिलीप प्रधान म्हणतात कि बलवा शेट च्या हत्ये मधील माणसे मला माहित आहेत आणि कथानकात उत्कंठा वाढत जाते. त्याचवेळी हर्षद वेदांत ची आणखी एक घटना सामोरी येते. कोण असतो हर्षद वेदांत ? ह्या सगळ्या घटनांचा शोध घेण्यासाठी एसीपी सुमित गवळी यांची नियुक्ती केली जाते. दहा दिवसात गुन्हेगाराला शोधून काढतो असे सांगून ते कामाला सुरवात करतात.

शेवटी काय होते ? ह्या सगळ्यात सर्वसामान्य माणसाचे काय होते ? असे का घडते ? बलवा शेट आणि हर्षद वेदांत यांचा खून कोणी केला ? त्यांना शिक्षा होते का ? अश्या अनेक प्रश्नांची उत्तरे सिनेमात मिळतील. सिनेमाची कथा – पटकथा – दिग्दर्शन महेश मांजरेकर यांनी उत्तमपणे साकारले आहे. चित्रपटात उत्कंठा – गती कशी ठेवता येईल याकडे बारकाईने लक्ष दिले आहे. संकलन सर्वेश परब यांचे आहे.

विक्रम गोखले यांचा न्यायाधीश विक्रम राजाध्यक्ष, सतीश आळेकर यांचा सतीश जोशी, अशोक सराफ यांचा इन्स्पेक्टर दिगंबर सावंत, दिलीप प्रभावळकर यांचा प्रोफेसर दिलीप प्रधान, शिवाजी साटम यांचा रुस्तम मेस्त्री, या सर्वांच्या अभिनयाची जुगलबंदी लक्षांत राहते. सोबत सुहास जोशी, शरद पोंक्षे, दीप्ती लेले, सविता मालपेकर, अभिजित साटम, मधुरा वेलणकर, संतोष जुवेकर, अश्या अनेक कलावंताची साथ लाभली आहे.

वास्तवावर भाष्य करणारा प्रामाणिक चित्रपट आहे. अनुभव घेऊन आहे

पार्काच्या कट्ट्यावर बुजुर्गांची पंचरंगी जुगलबंदी…! 

3– राज चिंचणकर
       शिवाजी पार्क म्हणजे मुंबईतले मध्यवर्ती ठिकाण!  या पार्काचा कट्टा सदैव गजबजलेला असतो, तो विविध वयोगटातले लोक येथे पायधूळ झाडतात म्हणून! राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक आदी क्षेत्रांचे साक्षीदार असलेले शिवाजी पार्क, चित्रपटसृष्टीच्या नजरेतून सुटले असते तर ते नवल ठरले असते. अगदी त्याला अनुसरून, ‘मी शिवाजी पार्क’ हा चित्रपट दसऱ्याच्या मुहूर्तावर प्रदर्शित होत आहे. महत्त्वाचे म्हणजे, पाच बुजुर्ग कलावंतांची पंचरंगी जुगलबंदी या निमित्ताने पार्काच्या कट्टयावर रंगली आहे.
       विक्रम गोखले, दिलीप प्रभावळकर, अशोक सराफ, शिवाजी साटम, सतीश आळेकर ही नावे उच्चारली तरी भारदस्तपणाची जाणीव होते. हेच पाच दिग्गज कलावंत या चित्रपटात एकत्र आले आहेत. परिणामी, या चित्रपटाची उत्सुकता प्रचंड वाढली आहे. चित्रपटसृष्टीतले बुजुर्ग व्यक्तिमत्त्व असलेले महेश मांजरेकर यांचा हा चित्रपट आहे म्हटल्यावर तर ही उत्सुकता शिगेला जाऊन पोहोचते. कथा, पटकथा व दिग्दर्शन अशी जबाबदारी त्यांनी यासाठी सांभाळली आहे.
       ‘न्यायदेवता आंधळी असते, आम्ही डोळस होतो’ अशी या चित्रपटाची टॅगलाईन पाहून तर या कुतूहलात अधिकच भर पडते.  बरं, एवढे सगळे करूनच ही टीम थांबलेली नाही. चित्रपटातल्या या पाच कलावंतांसह उदय टिकेकरशरद पोंक्षेसुहास जोशीभारती आचरेकरसविता मालपेकर, संतोष जुवेकरसुशांत शेलारदिप्ती लेलेमंजिरी फडणीसदिप्ती धोत्रे आदी कलाकारही पार्काच्या या कट्ट्यावर सामील झाले आहेत. मल्टिस्टारर म्हणावा असा हा चित्रपट नक्की आहे तरी काय, यासाठी दसऱ्याची सकाळ उजाडावी लागणार आहे.

महेश मांजरेकर

(अभिनेता, निर्माता)

यांना वाढदिवस अभिष्टचिंतन

 

IMG-20180816-WA0010.jpg

Create a website or blog at WordPress.com

Up ↑