व्हॉट्सॲप’ बंधनात अडकणार राकेश व अनुजा…! 

– राज चिंचणकर 

       अभिनेता राकेश बापट आणि अभिनेत्री अनुजा साठे हे दोघे आता ‘व्हॉट्सॲप’च्या बंधनात अडकणार आहेत. पण याचा अर्थ नक्की काय, या प्रश्नाचे उत्तर नजीकच्या काळात मिळणार आहे. या दोन्ही कलाकारांनी अनेक चित्रपटांमध्ये स्वतंत्रपणे प्रमुख भूमिका साकारल्या असल्या, तरी या दोघांना एकत्र पडद्यावर पाहण्याची संधी रसिकांना आता मिळणार आहे. ५ एप्रिल रोजी प्रदर्शित होणाऱ्या ‘व्हॉट्सॲप लव’ या मराठी चित्रपटात राकेश व अनुजा प्रथमच एकत्र झळकणार आहेत. 

Wh

 

     हेमंतकुमार महाले यांची कथा, दिग्दर्शन आणि निर्मिती असलेल्या ‘व्हॉट्सॲप लव’ या चित्रपटाच्या पोस्टरवर एकमेकांकडे पाठ करून बसलेले राकेश व अनुजा सध्या पाहायला मिळत आहेत. मात्र हातात मोबाईल घेऊन बसलेले हे दोघे आणि त्यातही अनुजाचे राकेशच्या मोबाईलमध्ये टक लावून पाहणे, हे या चित्रपटाच्या कथानकाची उत्सुकता वाढवणारे आहे. आता या चित्रपटात नक्की काय दडले आहे, याचे कोडे उलगडण्यासाठी एप्रिल महिन्याची वाट पाहावी लागणार आहे. 

राकेश बापट अध्यात्माच्या दिशेने

हिंदीसोबतच मराठीतही आपल्या अभिनयाची चुणूक दाखवणारा मराठमोळा अभिनेता राकेश बापटची पावलं अध्यात्माच्या दिशेने वळली आहेत. राकेशच्या जीवनात असं काय घडलं की त्याला अध्यात्माची ओढ लागली असावीअसा प्रश्न पडणं साहजिक आहेपण यातही ट्विस्ट आहे. मराठी चित्रपटात ‘चॅाकलेट हिरो’ म्हणून नावारूपाला आलेला राकेश खऱ्या जीवनात नव्हेतर चंदेरी दुनियेत अध्यात्माकडे वळला आहे. सविता दामोदर परांजपे या आगामी चित्रपटासाठी राकेश अध्यात्मिक बनला आहे. 

नेहमीच आव्हानात्मक भूमिकांच्या शोधत असणाऱ्या राकेशला सविता दामोदर परांजपे चित्रपटाच्या निमित्ताने पुन्हा एकदा एक वेगळी भूमिका साकारण्याची संधी मिळाली. या सिनेमात राकेशने साकारलेला अशोक हस्तमुद्रीकांत पारंगत आहे. टीआयएफआरचा स्कॅालर असूनही तो अध्यात्माकडे का वळतो याचं उत्तर सविता दामोदर परांजपे हा सिनेमा पाहिल्यावर मिळेल.

या सिनेमातील अशोकच्या भूमिकेबद्दल बोलताना राकेश सांगतो की, ‘आजवर मी नेहमीच वैविध्यपूर्ण भूमिका साकारण्याला प्राधान्य दिलं आहे. सविता दामोदर परांजपे मधील व्यक्तिरेखाही त्याच वाटेवरील पुढचं पाऊल आहे. या सिनेमात मुख्य भूमिकेत असलेल्या शरद आणि कुसूम यांच्या जीवनाला कलाटणी देणारी माझी व्यक्तिरेखा प्रेक्षकांनाही नक्कीच आवडेल असा विश्वासही राकेशने व्यक्त केला आहे.

जॅान अब्राहमची पहिली मराठी निर्मिती असलेल्या या चित्रपटात राकेश सोबत सुबोध भावेतृप्ती तोरडमलअंगद म्हसकरपल्लवी पाटीलसविता प्रभुणे आदि कलाकारांच्या भूमिका आहेत. योगेंद्र मोगरेतृप्ती मधुकर तोरडमल सहनिर्माते आहेत. मंदार चोळकर व वैभव जोशी यांनी लिहिलेल्या गीतांना निलेश मोहरीर आणि अमित राज या मराठीतील दोन आघाडीच्या संगीतकारांनी स्वरसाज चढवला आहे. 2.JPG हा चित्रपट ३१ ऑगस्टला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Create a website or blog at WordPress.com

Up ↑