‘ललित २०५’ मधील भैरवीबद्दलच्या या गोष्टी तुम्हाला माहित आहेत का?

BHAIRAVI 3स्टार प्रवाहवरील ‘ललित २०५’ या मालिकेला प्रेक्षकांचं भरभरुन प्रेम मिळतंय. या मालिकेत भैरवीची भूमिका साकारणाऱ्या अमृता पवारबद्दलच्या काही खास गोष्टी जाणून घेऊयात.

 

  • अमृता खो-खो या खेळामध्ये पारंगत असली तरी अभिनय हाच तिचा श्वास आहे. अभिनयाच्या याच वेडापायी तिची खेळामधली आवड मागे पडली. कॉलेजमधून एकांकिका करत  असतानाच स्टार प्रवाहच्या ‘दुहेरी’ या मालिकेत काम करण्याची अमृताला संधी मिळाली आणि तिथूनच तिच्या अभिनय वाटचालीला सुरुवात झाली. ‘ललित २०५’ मधून भैरवीच्या रुपात ती पहिल्यांदाच मुख्य भूमिकेत झळकली. अमृताने नृत्याचंही प्रशिक्षण घेतलंय.
  • विखुरलेल्या राजाध्यक्ष कुटुंबाला एकत्र बांधून ठेवणारी भैरवी म्हणजे जुन्या आणि नव्या विचारांमधला दुवा. भैरवीप्रमाणेच अमृताही आपल्या कुटुंबाला पहिलं प्राधान्य देते. तिच्या मते नाती जपणं ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. भैरवी प्रमाणेच अमृताही खऱ्या आयुष्यात रोखठोक आहे. आपल्या मनातली गोष्ट स्पष्टपणे मांडायला हवी असं तिला वाटतं.IMG_1663
  • अमृता आपल्या फिटनेसच्या बाबतीत प्रचंड जागृक आहे. सकस आहार आणि नियमित व्यायाम हेच आपल्या फिटनेसचं रहस्य असल्याचं ती सांगते. पण फिटनेसच्या हट्टापायी मन मारुन जगणं तिला पटत नाही. एखादा पदार्थ खाण्याची इच्छा झाली तर मी आवर्जून खाते असं अमृताने सांगितलं.

नील-भैरवीच्या नात्यात नवा ट्विस्ट

‘स्टार प्रवाह’वरील ‘ललित २०५’ या मालिकेत नाट्यमय वळण येऊ घातलंय. नील आणि भैरवीमधलं नातं खुलत असतानाच आता मालिकेत ऋषभ या नव्या पात्राची एण्ट्री होणार आहे. या नव्या पात्राचा नेमका उद्देश काय आहे हे लवकरच उलगडेल पण ऋषभच्या येण्याने नील आणि भैरवीच्या नात्यात नवं वादळ येणार हे मात्र नक्की. नील-भैरवीचं तीन महिन्यांचं लग्नाचं कॉण्ट्रॅक्टही आता संपत आलंय. पण मनाने मात्र हे दोघंही जवळ येत आहेत. नीलच्या कठीण काळात भैरवी त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिली ही गोष्ट नीलच्या मनात खोलवर रुजलीय. याचमुळे भैरवीबद्दल त्याच्या मनात प्रचंड आपुलकी आणि प्रेम निर्माण होत आहे. हे प्रेम व्यक्त करण्याचा नील प्रयत्न करत असतानाच आता ऋषभच्या येण्याने सर्व गोष्टी बदलणार आहेत.

IMG_9284

दिवंगत अभिनेते विजय चव्हाण यांचा मुलगा वरद चव्हाण ऋषभची भूमिका साकारणार आहे. याआधी स्टार प्रवाहच्या ‘रुंजी’ आणि ‘लेक माझी लाडकी’ या मालिकेत तो दिसला होता.

ऋषभच्या व्यक्तिरेखेविषयी सांगताना वरद म्हणाला, ‘ऋषभ हा मानसोपचार तज्ञ आहे. या भूमिकेला वेगवेगळ्या छटा आहेत. त्यामुळे काम करताना खूप मजा येतेय. शिवाय ‘ललित २०५’ची टीम प्रचंड उत्साही आहे. सुहास जोशींसोबत काम करण्याचं माझं स्वप्न होतं जे या मालिकेच्या निमित्ताने पूर्ण होतंय. स्टार प्रवाहच्या मालिकांमध्ये काम करताना नेहमी आपलेपणा वाटतो, म्हणूनच ऋषभचं पात्र रंगवताना मला प्रचंड आनंद होतोय.’

ऋषभच्या येण्याने आता ‘ललित २०५’ च्या कुटुंबात नेमकी काय उलथापालथ होणार? हे पाहणं उत्सुकतेचं असेल. तेव्हा पाहायला विसरु नका ‘ललित २०५’

‘ललित २०५’मध्ये रंगणार मंगळागौरीचा खेळ

 ‘ललित २०५’ या मालिकेत मंगळागौरीचा सोहळा पाहायला मिळणार आहे. श्रावणातल्या मंगळवारी नवविवाहितेने मंगळागौरीचं व्रत करण्याची प्रथा आहे. भैरवीची पहिलीच मंगळागौर असल्यामुळे राजाध्यक्ष कुटुंबात उत्साहाचं वातावरण पाहायला मिळतंय. नऊवारी साडी, पारंपरिक दागिने घालून राजाध्यक्ष कुटुंबातील महिला मंडळ सज्ज आहे. साग्रसंगीत पूजेसोबतच मंगळागौरीचे खेळ खेळत भैरवीची पहिली मंगळागौर साजरी करण्यात आली.

लाडक्या नातसुनेचं कौतुक पाहून सुमित्रा आजी भारावून गेलीय मात्र नीलिमा आणि गार्गी काकू अद्यापही नाराज आहेत. कानामागून आली आणि तिखट झाली असा समज या दोघींनीही करुन घेतलाय. त्यामुळे मंगळागौरीच्या कार्यक्रमात त्या सहभागी तर झाल्या आहेत पण या दोघींच्याही मनात मात्र अद्याप कटुताच आहे.  तिकडे भैरवीच्या मनातही भीतीचीच भावना आहे. राजाध्यक्ष कुटुंबाची आपण फसवणूक करत आहोत या विचारातच ती हरवून गेलीय.

नील आणि भैरवीमधलं कॉण्ट्रॅक्ट मॅरेजचं सत्य उघड होणार का? भैरवीची पहिली मंगळागौर निर्विघ्न पार पडणार का?

Create a website or blog at WordPress.com

Up ↑