संजय – राजेश पंचविशीत

मराठी रंगभूमीवर वेगवेगळे नाट्यप्रयोग सातत्याने होत असतात. आपल्याकडे जे चांगलं आहे, त्यापेक्षा दुसऱ्यांकडे काय आहे ते जाणून घेण्यासाठी व जे नाही ते मिळवण्यासाठी माणूस नेहमीच धावत असतो.’ याच मनोवृत्तीवर अत्यंत मार्मिक भाष्य करणारे होते कुरूप वेडे हे धमाल विनोदी नाटक लेखक दिग्दर्शक राजेश देशपांडे लवकरच रंगभूमीवर घेऊन येत आहेत.

‘वरवरच्या सौंदर्यापेक्षा मनाचं सौंदर्य महत्त्वाचं ते जपा’ असा संदेश देणारं हे नाटक आहे. या नाटकात प्रमुख भूमिकेत आहेत प्रसिद्ध अभिनेते संजय नार्वेकर.  विशेष म्हणजे या नाटकाद्वारे संजय नार्वेकर ‘पंचविशीत’ पदार्पण करतायेत. अंहं…दचकू नका !! ‘पंचविशीत’ म्हणजे होते कुरूप वेडे हे त्यांचं रंगभूमीवरचं पंचविसावं नाटक आहे. या सोबत आणखी एक सुरेख योगायोग म्हणजे या नाटकाचे लेखक दिग्दर्शक राजेश देशपांडे यांचेही हे पंचविसावं नाटक आहे.

संजय आणि मी अनेक वर्ष एकत्र काम करत असून होते कुरूप वेडे च्या निमित्ताने आम्ही पुन्हा एकदा एकत्र काम करतोय. इतक्या वर्षांचा दोघांचा हा अनुभव या नाटकाला नक्कीच वेगळ्या उंचीवर घेऊन जाईल’ असा विश्वास राजेश देशपांडे यांनी व्यक्त केला. तर ‘राजेश सारख्या दिग्दर्शकासोबत काम करणे म्हणजे नवीन गोष्टी शिकण्याची एक चिरंतन प्रक्रिया असते, या नाटकाच्या निमित्ताने पुन्हा एकदा राजेश सोबत काम करायला मिळाले ही माझ्यासाठी आनंदाची गोष्ट आहे’. अशा भावना अभिनेता संजय नार्वेकर यांनी व्यक्त केल्या. संजय नार्वेकरांसोबतच नयन जाधव,भारत सावलेशलाका पवारनितीन जाधवमिनाक्षी जोशीकल्पेश बाविस्कर हे कलाकार नाटकात भूमिका साकारणार आहेत.  लवकरच हे नाटक रंगभूमीवर येत आहे.both copy

सुशांत-आस्ताद ची जोडी पुन्हा एकत्र

2अभिनेता सुशांत शेलार आणि आस्ताद काळे यांची घनिष्ठ मैत्री ‘बिग बॉस’ कार्यक्रमात सगळ्यांनीच बघितली. आपल्या बेधडक व स्पष्ट वक्तेपणामुळे ‘बिग बॉस’ कार्यक्रम गाजवल्यानंतर हे दोघेजण पुन्हा एकत्र येत आपला नवा अंदाज प्रेक्षकांना दाखवायला सज्ज झाले आहेत. रंगनील निर्मित ‘MR & MRS लांडगे’ या आगामी नव्या नाटकातून ही जोडी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. शनिवारी १३ ऑक्टोबरला दुपारी ४.३० वा. या नाटकाचा शुभारंभ वाशीच्या विष्णुदास भावे सभागृहात होणार आहे.

आपल्या या नव्या नाट्यकृतीबद्दल बोलताना हे दोघं सांगतात की, ‘MR & MRS लांडगे’ या नाटकाच्या निमित्ताने आम्हाला पुन्हा एकत्र येण्याची संधी मिळाली. वयाचं भान विसरायला लावणारी ही बेभान कॉमेडी निखळ आनंदासोबतच आमच्या भन्नाटट्यूनिंगची ट्रीट ही प्रेक्षकांना देईल असा विश्वास हे दोघेजण व्यक्त करतात.

सुशांत आणि आस्ताद यांसोबत या नाटकात राजेश भोसले, परी तेलंग, मधुरा देशपांडे, रमा रानडे, अमर कुलकर्णी, अलका परब यांच्या भूमिका आहेत. कल्पना विलास कोठारी या नाटकाच्या निर्मात्या आहेत. लेखन सुरेश जयराम तर दिग्दर्शन विजय केंकरे यांचे आहे. 

१३ ऑक्टोबरला हे नाटक रंगमंचावर येतेय.

Create a website or blog at WordPress.com

Up ↑