‘शुभ लग्न सावधान’चा ट्रेलर लाँच

लग्न म्हंटले की लगीनघाई ही आलीच ! अगदी एका उत्सवाप्रमाणे साजरा होत असलेल्या या लग्नसोहळ्यावर आधारित ‘शुभ लग्न सावधान’ हा सिनेमा १२  ऑक्टोबरला येत आहे. या सिनेमाचा नुकताच मंगलमय वातावरणात ट्रेलर लाँच करण्यात आला.

सुबोध भावे आणि श्रुती मराठे यांची मध्यवर्ती भूमिका असलेल्या या सिनेमाचा ट्रेलर ‘लग्न’ या विषयावर फिरतो. लग्नाबद्दलचे विविध लोकांचे मतमतांतरे यात आपल्याला पाहायला मिळतात. शिवाय, ट्रेलरच्या सुरुवातीलाच एक ख्रिश्चनधर्मीय लग्नदेखील यात आपणास दिसून येत आहे. तसेच, लग्नापासून दूर पळत असलेल्या नायकाची प्रेमाबद्दलची परिभाषादेखील यात पाहायला मिळते. एकंदरीतच, हा ट्रेलर पाहताना, ‘शुभ लग्न सावधान’ हा सिनेमा संपूर्णतः कौटुंबिक मनोरंजक चित्रपट असल्याची जाणीव होते.

Shruti Marathe and Subodh Bhave

डॉ. गिरीश ओक, निर्मिती सावंत, विद्याधर जोशी, किशोरी आंबिये, किशोर प्रधान, प्रतीक देशमुख, रेवती लिमये, सतीश सलागरे, प्राची नील अशी कलाकारांची मोठी फळी या सिनेमात आपल्याला बघायला मिळणार आहे. विवाहोत्सुकांना आपलासा करणारा हा सिनेमा, कार्यकारी निर्माते अभय शेवडे यांच्या संकल्पनेतून आकारास आला आहे.

Trailer Link:

https://www.youtube.com/watch?v=_nuOU1Zs718

‘शुभ लग्न सावधान’ मधील ‘नवरोजी’चे झाले थाटात आगमन 

लग्न म्हटले की, वधू-वर पक्षाचा आनंद आणि उत्साह ओसंडून वाहत असतो. एखाद्या उत्सवाप्रमाणे साजरा होत असलेला हा लग्नसोहळा पाहण्यासारखाच असतो. खास करून, नवरीकडील नातेवाईकांकडून वरपक्षाचे केले जाणारे स्वागत, वऱ्हाडी लोकांमध्ये चर्चेचा विषय असतो. त्यामुळे, प्रत्येक लग्नात महत्वपूर्ण असलेल्या या नवरोजींच्या दिमितीस हजर असलेले, एक भन्नाट गाणे सोशल नेट्वर्किंग साईटवर नुकतेच लाँच करण्यात आले आहे. समीर रमेश सुर्वे दिग्दर्शित ‘शुभ लग्न सावधान’ या आगामी सिनेमातील हे गाणे, लग्नसराईत गाजणारे आहे. मंगेश कांगणेने शब्दबद्ध केलेल्या गाण्याचे संगीतदिग्दर्शन चिनार महेश यांनी केले असून, सनई – चौघड्यांच्या नादावर, प्रेक्षकांना थिरकावणाऱ्या या गाण्याला जसराज जोशी आणि कीर्ती किल्लेदारचा आवाज लाभला आहे. 
SHUBH LAGN SAVDHAAN NAWROJI .jpgया सिनेमात सुबोध भावे आणि श्रुती मराठे यांची मध्यवर्ती भूमिका असून  डॉ. गिरीश ओक, निर्मिती सावंत ,विद्याधर जोशी ,किशोरी आंबिये, किशोर प्रधान,  प्रतीक देशमुख आणि रेवती लिमये यांचीदेखील भूमिका आहे. येत्या १२ ऑक्टोबरच्या मंगलमय प्रसंगी प्रदर्शित होत असलेल्या ‘शुभ लग्न सावधान’ला महाराष्ट्रातील तमाम प्रेक्षकांना आमंत्रित करण्यात आले आहे. 

सुबोध-श्रुतीचे ‘शुभ लग्न सावधान’   

SLS Poster 5 mail लग्नसमरोहवर आधारित ‘शुभ लग्न सावधान’ सिनेेमा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. समीर रमेश सुर्वे दिग्दर्शित या सिनेमाचे सोशल नेट्वर्किंग साईटवर नुकतेच मुख्य पोस्टर लाँच करण्यात आले. या सिनेमाच्या पोस्टरवर सुबोध भावे आणि श्रुती मराठे या मराठीच्या प्रसिद्ध कलाकारांची केमिस्ट्री पाहायला मिळते. शिवाय दुबईतील विहंगम दृश्यदेखील या सिनेमाच्या पोस्टरवर आपल्याला पाहायला मिळते. पल्लवी विनय जोशी यांची निर्मिती असलेल्या या सिनेमात, डॉ. गिरीश ओक, निर्मिती सावंत ,विद्याधर जोशी ,किशोरी आंबिये यांचीदेखील महत्वपूर्ण भूमिका आहे. लगीनघाईवर आधारित असलेल्या या संपूर्ण सिनेमात मराठमोळ्या लग्नाचे सनईचौघडयांचा नाद रसिकांना अनुभवता येणार आहे.

सुबोध घाबरतो बायकोला ! 

SLS 05लग्न म्हणजे दोन जीवांचे मिलन असते. आयुष्यभर एकमेकांना एकत्र बांधून ठेवणारी ती अमुल्य गाठ असते. मात्र, काहीजणांना ही गाठ बंधनात अडकवल्यागत वाटत असते. त्यामुळेच तर कित्येकजण  मंगलाष्टकामधील ‘सावधान’ या शब्दाचा सूचित अर्थ लावत लग्नापासून दूर पळतात.
पल्लवी विनय जोशी निर्मित आणि समीर रमेश सुर्वे दिग्दर्शित ‘शुभ लग्न सावधान’ या सिनेमात अश्याच एका तरुणाची गोष्ट मांडण्यात आली असून, नुकताच या सिनेमाचा सोशल नेट्वर्किंग साईटवर मजेशीर टीझर लाँँच करण्यात आला. श्री राम आगाशे (कल्पनाकांत) यांच्या ‘मी बायकोला घाबरतो’ या धम्माल काव्यपंक्तीवर, प्रमुख भूमिकेत असलेल्या सुबोध भावेची उडालेली भंबेरी या टीझरमध्ये आपल्याला बघायला मिळते.
‘शुभ लग्न सावधान’ या सिनेमाच्या टीझरमध्ये श्रुती मराठे, डॉ. गिरीश ओक, निर्मिती सावंत ,विद्याधर जोशी ,किशोरी आंबियेदेखील आपल्याला पाहावयास मिळतात. एकंदरीत हा सिनेमा लग्नसंस्थेवर आधारित जरी असला, तरी विवाह करण्यास अनुत्सुक असलेल्या एका प्रियकराची झालेली मजेशीर अवस्था या टीझरमधून प्रेक्षकांना दिसून येते. या सिनेमाचे कार्यकारी निर्माते अभय शेवडे यांच्या संकल्पनेतून हा अस्सल कौटुंबिक चित्रपट आकारास आला असून, त्याचे चित्रीकरण दुबई आणि इगतपुरी येथील नयनरम्य ठिकाणी झाले आहे. येत्या १२ ऑक्टोबर या शुभ मुहूर्तावर प्रेक्षकांच्या भेटीस येणाऱ्या ‘शुभ लग्न सावधान’ या चित्रपटासाठी अरुंधती दाते, श्रीनिवास जांभेकर, विद्या संदीप तुंगारे व तुषार कर्णिक यांनी निर्मिती सहाय्य केले आहे. ज्येष्ठ अभिनेते किशोर प्रधान यांच्याबरोबरच प्रतीक देशमुख आणि रेवती लिमये या फ्रेश जोडीची अदाकारी असलेल्या, ‘शुभ लग्न सावधान’ सिनेमातल्या नायकाला लग्नाची इतकी का भीती वाटतेय?

 

Create a website or blog at WordPress.com

Up ↑