अशी हि आशिकी च्या लिडींग लेडी चे सिक्रेट उलगडले

पूर्वी प्रेम कनफेस करण्यासाठी फूल आणि सोबतीला प्रेमाचे दोन शब्द पुरेसे होते… पण आताची जनरेशन ही जरा एक स्टेप पुढे असल्यामुळे आता कनफेशनचं कनफ्युझन आणि इमोशनचं कमोशन झालंय. प्रेम जरी एवढं कॉम्पलिकेटेड बनलं असलं तरी प्रेक्षकांच्या भेटीला येणा-या एका नवीन जोडीची आशिकी ही जरा वेगळीच आहे. आशिकीची एक वेगळी कथा सचिन पिळगांवकर दिग्दर्शित ‘अशी ही आशिकी’ या आगामी मराठी चित्रपटात पाहायला मिळणार आहे.
abhinay berde hemal ingaleया टीझर लाँचिग सोहळ्याचे आणखी एक स्पेशल बात म्हणजे ‘या चित्रपटाची हिरोईन कोण?’ हा प्रश्न जो इतके दिवस गुलदस्त्यात होता त्याचे उत्तर आता मिळाले आहे. सचिनजी यांच्या ‘अशी ही आशिकी’ या चित्रपटात अभिनय लक्ष्मीकांत बेर्डे आणि हेमल इंगळे ही नवीन जोडी दिसणार आहे. या नवीन जोडीमध्ये फुलणारी आशिकी पाहणे, प्रेक्षकांसाठी न्यु इयरचं स्पेशल गिफ्ट असेल.
फ्रि-मांइडेड असलेले हे कपल आणि त्यांची लव्हस्टोरी ही किती इंटरेस्टिंग आणि सध्याच्या जनरेशनला रिलेट करणारी आहे याचा अंदाच टीझरमधून येतो. अभिनयने या चित्रपटात ‘स्वयम’ आणि हेमलने ‘अमरजा’ नावाचे पात्र साकारले आहे. नवीन जोडी, ऐकायला मिळणारी नवीन नावं आणि एकंदरीत संपूर्ण टीझर चित्रपटाविषयी उत्सुकता निर्माण करणारा ठरलाय.
चित्रपटाचे टायटल, हिरो-हिरोईनची जोडी, चित्रपटाची झलक, लोकेशन्स इत्यादी गोष्टींमुळे ही कलाकृती प्रेक्षकांच्या पसंतीस उतरेल. ‘अशी ही आशिकी’ची तितक्याच दर्जेची कथा-पटकथा आणि संवाद असणार कारण सचिनजी यांनी स्वत: ही जबाबदारी पार पाडली आहे. त्यामुळे कथा-संवाद यांचा दर्जा प्रत्येकाला पटेल,रुचेल असाच असणार.
Group photo 3
स्वयम आणि अमरजाची  ‘अशी ही आशिकी’च्या निमित्ताने नवीन वर्षाच्या फेब्रुवारी महिन्यात ‘व्हॅलेंनटाईन्स डे’ ऐवजी साजरा होणार ‘AHA DAY’ कारण ‘अशी ही आशिकी’ १४ फेब्रुवारीला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.

‘अशी हि आशिकी’ चा टीझर रिलीज

सचिन पिळगावकर लिखित-दिग्दर्शित ‘अशी हि आशिकी’ या चित्रपटाचा टीझर रिलीज झाला आहे . युथफुल सिनेमात अभिनय बेर्डे आणि अभिनेत्री हेमल इंगळे ही जोडी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. श्रीया पिळगावकर हिच्या हस्ते या सिनेमचा टीझर प्रदर्शित करण्यात आला.

टीझर लिंक – https://youtu.be/SsyLcnQMC_cIMG_20181224_204817

 

 

 

 

 

‘लव्ह यु जिंदगी’चा ट्रेलर प्रदर्शित

एसपी प्रॉडक्शन्स प्रायव्हेट लिमिटेड, सचिन बामगुडे निर्मित  मनोज सावंतदिग्दर्शित “लव यु जिंदगी” चित्रपटाचा ट्रेलर २० डिसेंबरला मुंबईतील सहारा स्टारहॉटेलमध्ये भव्यतेने प्रदर्शित झाला. चित्रपटाचा रंजक आणि उत्कंठावर्धक टीझर बघूनलव यु जिंदगी चित्रपटाबद्दल प्रचंड उत्सुकता प्रेक्षकांच्या आणि माध्यमांमध्ये निर्माणझाली होती. सचिन पिळगावकर, कविता लाड मेढेकर, प्रार्थना बेहरे यांची  प्रमुखभूमिका असलेला लव यु जिंदगीचा ट्रेलर आता प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे.ट्रेलरदेखील टीझर इतकाच रंजक झाला असून चित्रपट विनोदी, कौटुंबिक आणि आजप्रत्येक व्यक्तीला ‘रिलेट करता येण्याजोगा वाटतो. ट्रेलरमध्ये अनिरुद्ध दाते याजिंदादील व्यक्तीची कथा दर्शवते. आयुष्यावर प्रेम करायला वयाची सीमा नसते हे हासिनेमा सांगतो.

Photo3

 चित्रपटाची कथा आणि दिग्दर्शन मनोज सावंत यांचं आहे. दिग्दर्शक म्हणून त्यांचा हाप्रथम चित्रपट आहे. चित्रपटाची निर्मिती एस. पी. प्रॉडक्शन प्रायव्हेट लिमिटेड आणिएस. पी. एंटरप्राइजेज यांनी प्रस्तुती केली आहे. चित्रपटाचे निर्माते सचिन बामगुडेयांनी चित्रपटाची ही दुहेरी बाजू समर्थपणे सांभाळली आहे.

Photo5

        चित्रपटात अनिरुद्ध दाते यांची भूमिका सचिन पिळगावकर यांनी केली आहे.अनिरुद्ध दातेच्या बायकोच्या भूमिकेत कविता लाड मेढेकर आहेत. प्रार्थना बेहरेलाअनिरुद्ध दातेची तरुण मैत्रीण म्हणून ‘रिया’च्या टवटवीत भूमिकेत बघताना छानवाटतं. याशिवाय अतुल परचुरे आणि समीर चौघुले यांनी नेहमीप्रमाणे आपल्या सहजअभिनयाने आपापल्या भूमिकेला सजवलं आहे. चित्रपटाचं संगीत दिग्दर्शन समीरसापतिस्कर यांनी केलंय. चित्रपटाला साजेसं छायाचित्रण  पराग देशमुख यांचं आहे. पार्श्वगायनाची धुरा अवधूत गुप्ते आणि सचिन पिळगावकर यांनी सांभाळली आहे. लवयु जिंदगी चित्रपटाची पटकथा श्रीपाद जोशी आणि मनोज सावंत तर संवाद गणेशपंडित आणि श्रीपाद जोशी यांनी लिहिले आहेत. सचिन पिळगावकर, कविता लाडमेढेकर आणि प्रार्थना बेहरे यांची प्रमुख भूमिका असलेला एक  सकारात्मक चित्रपट“लव यु जिंदगी” ११ जानेवारीला  महाराष्ट्रभर प्रदर्शित होतोय.

Trailer on Youtube:

http://bit.ly/LoveYouZindagiTrailer

‘अशी ही आशिकी’ मधून दिसणार प्रेमाचा प्रवास

Poster

 

     अष्टपैलू व्यक्तिमत्व असलेले सचिन पिळगांवकर यांनी त्यांच्या ६०व्यावाढदिवसाला प्रेक्षकांसाठी एक खास भेट म्हणून त्यांच्या नवीन चित्रपटाचीघोषणा केली होती आणि खास सरप्राईज ठरलेला तो मराठी चित्रपटम्हणजेच ‘अशी ही आशिकी’. चित्रपटाचे नाव जाणून घेतल्यावर याचित्रपटातील कलाकार कोण हे जाणून घेण्याविषयी प्रेक्षकांची कुतूहलतावाढली. चित्रपटाचे नावंच इतके यंग आणि हटके आहे की या चित्रपटासाठीकलाकारांची निवड पण तितकीच हटके असणार. तर ‘अशी ही आशिकी’मध्ये अभिनय लक्ष्मीकांत बेर्डे युथफूल हिरोची भूमिका साकारणार आहे. आता अभिनयची हिरोईन कोण, हे देखील प्रेक्षकांसाठी सुंदर सरप्राईजअसेल. पण प्रेमाच्या महिन्यात अर्थात १४ फेब्रुवारीला प्रेमाचे नवे रंग, नवाअर्थ घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येतेय ‘अशी ही आशिकी’.

 अशी ही आशिकीच्या निमित्ताने तब्बल पाच वर्षांनी सचिन पिळगांवकर पुन्हा एकदा दिग्दर्शकाच्या भूमिकेतून प्रेक्षकांसमोर येत आहेत.दिग्दर्शनासह सचिनजी यांनी या चित्रपटाला संगीत दिले आहे, तसेच कथा-पटकथा-संवाद ही सचिनजी यांचेच आहेत. ‘अशी ही आशिकी’चा प्रेमाचा रोमँटिक प्रवास प्रेक्षकांसाठी नक्कीच नवीन अनुभव ठरेल.

      गुलशन कुमार आणि भूषण कुमार प्रस्तुत, ‘अशी ही आशिकी’चित्रपटाची निर्मिती ‘टी-सीरिज’ आणि ‘सिलेक्ट मिडिया’ यांनी केली असूनसहनिर्मिती सुश्रिया चित्र यांनी केली आहे. वजीर सिंह, जो राजन आणिसुप्रिया पिळगांवकर हे या चित्रपटाचे निर्माते आहेत.

सचिननी ३८ वेळा पाहिले ‘दिनूच्या सासूबाई’ हे नाटक..

DSR25‘फार्ससम्राट’ बबन प्रभू यांच्या रंगभूमीवर नव्याने आलेल्या ‘दिनूच्या सासूबाई राधाबाई’ या नाटकाने अल्पावधीतच २५ प्रयोगांचा टप्पा पार केला आहे. गेली चार दशके रंगभूमीवर हे नाटक गाजत आहे. १९७३ मध्ये प्रथम हे नाटक रंगभूमीवर सादर झाले होते. नव्या संचात हे नाटक रंगभूमीवर सादर होत असून, विनोदाचा बादशहा संतोष पवार याने या नाटकाचे दिग्दर्शन केले आहे.

       या नाटकाच्या रौप्यमहोत्सवी प्रयोगाला ज्येष्ठ अभिनेते व दिग्दर्शक सचिन पिळगावकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी संवाद साधताना त्यांनी या नाटकाच्या नव्या टीमचे कौतुक केले. माझ्या अतिशय आवडत्या नाटकांत ‘दिनूच्या सासूबाई राधाबाई’ हे नाटक वरच्या स्थानावर आहे. जेव्हा आत्माराम भेंडे हे नाटक करायचे; तेव्हा शिवाजी मंदिरात मी हे नाटक ३८ वेळा पाहिले आहे. आज नव्या संचातला या नाटकाचा प्रयोग पाहण्याचा मला योग आला. हा प्रयोग या मंडळींनी यशस्वी करून दाखवला आहे, असे गौरवोद्गार सचिन पिळगावकर यांनी यावेळी काढले.
       या प्रयोगाला सचिन पिळगावकर हे त्यांच्या मातोश्री व भगिनीसह उपस्थित होते. नाटकाच्या टीमविषयी बोलताना सचिन पिळगावकर म्हणाले, संतोष पवार हा माझ्या खूप जवळचा आहे. तो जेव्हा काही नवीन करतो; तेव्हा ते मी पाहण्याचा आवर्जून प्रयत्न करत असतो. विनय येडेकर हा माझा जुना मित्र आहे. आम्ही बऱ्याच चित्रपटांतून एकत्र काम केले आहे. नयना आपटे यांचा तर मी खूप चाहता आहे. त्यांच्याबद्दल बोलावे तेवढे थोडेच ठरेल. सचिन पिळगावकर पुढे म्हणाले, या नाटकाच्या ५० व्या प्रयोगालाही मी आवर्जून येणार आहे आणि त्यावेळी माझ्यासोबत सुप्रिया व श्रिया या दोघी असतील, असा शब्द या नाटकाच्या टीमला दिला.
– राज चिंचणकर

Create a website or blog at WordPress.com

Up ↑