आणि सोनाली ला रडू कोसळले !

सध्या कोविड लॉक डाउन मध्ये आज आपल्याला आपले जवळचे मित्र मैत्रिणी यांना भेटायला सुद्धा मिळत नाही. पण आपल्या आयुष्यात अशा अनेक जवळच्या व्यक्ती असतात ज्यांना आपण विसरून जातो किंवा त्या आपल्यापासून एवढ्या लांब जातात की त्यांच्याशी आपल्याला कोणताच संबंध ठेवता येत नाही. त्या लोकांनी एखाद्या काळात आपल्याला प्रेम दिलं असत , माया केलेली असते , महत्वाचे सल्ले दिलेले असतात आणि कदाचित आपणच त्याला महत्व दिलेले नसते .

 

IMG-20200508-WA0000

कधी ना कधी या सर्व गोष्टींची आपल्याला आठवण होते आणि त्या गोष्टींचे महत्व समजते पण तेव्हा ती वेळ निघून गेली असते. नुकतेच इरफान खान आणि ऋषी कपूर सारखे दिग्गज कलाकार वेळेआधी सर्वाना सोडून निघून गेले आणि सोनालीला तिच्या एका अशाच वेळे आधी सोडून गेलेल्या जवळच्या मैत्रिणीची आठवण आली रडू कोसळले .  शुक्रवारी ८ मे ला मैत्री किती घट्ट आणि प्रत्येकाच्या आयुष्यात किती महत्वाची असते , आणि योग्य वेळी त्या मैत्रीला त्याचे महत्व देणं हे किती छान असतं हे सोनाली कुलकर्णी हॅशटॅग कन्टेक्ट च्या साहाय्याने तिच्या प्रेक्षकांना *हब हॉपर* या ऍप वर पॉडकास्ट च्या साह्यायाने सांगणार आहे .सोनाली ची अशी ही इमोशनल बाजू ऐकण्याची संधी आपल्याला या पॉडकास्टमुळे मिळणार आहे.

‘ती &ती’ चे पहिले पोस्टर रिलीज

TI & TI - 4 X 6 STANDY # 1Cदोन मुलींच्या मधोमध दिसणारा म्हणजेच ‘ती’ आणि ‘ती’च्या मध्ये अडकलेल्या पुष्कर जोगचा एक फोटो काही दिवसां अगोदर सोशल मिडीयावर प्रेक्षकांची उत्सुकता वाढवत होता. त्या दोन मुली नेमक्या कोण आहेत याचा प्रेक्षकांना अंदाज बांधायला लावणारे पोस्टर पुष्कर जोगच्या‘ती & ती’ या आगामी मराठी चित्रपटाचे पहिले टीझर पोस्टर होते. आणि आता त्या दोन मुली कोण या गोष्टीचा खुलासा करण्याची वेळ आली आहे.

आता ‘वेट इज ओव्हर’ असे म्हणत पुष्कर जोगच्या ‘ती & ती’ या चित्रपटाचे आणखी एक नवे कोरे पोस्टर नुकतेच सोशल मिडीयावर प्रदर्शित करण्यात आले आहे. प्रेक्षकांनी जो अंदाच बांधला तो योग्यच होता; या चित्रपटात पुष्कर जोगसोबत सोनाली कुलकर्णी आणि प्रार्थना बेहरे या दोघी ‘ती’ आणि ‘ती’ ची भूमिका साकारणार आहेत हे आपण पोस्टरमधून कळते.

अर्बन रोमँटिक कॉमेडी असलेल्या ‘ती & ती’ चे शूटिंग लंडनमध्ये झाले आहे. त्यामुळे पुष्कर जोग, सोनाली कुलकर्णी आणि प्रार्थना बेहरे यांच्या ‘ती & ती’ मधून एका आगळ्या-वेगळ्या-इंटरेस्टिंग आणि मनोरंजक कथेसोबत प्रेक्षकांची लंडन सफारी पण होणार हे नक्की.

उर्मिलाने केली सोनालीची   रॉकिंगस्टायलिंग

  अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने दरवेळी वेगवेगळ्या प्रकल्पातून प्रेक्षकांचे मनोरंजन केलेआहे आणि यावर्षी देखील एका आगळ्या-वेगळ्या, कूल भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस येतआहे. फक्त एक महिना आणि काही दिवस बाकी असणा-या सोनाली कुलकर्णीचा आगामीमराठी चित्रपट म्हणजे ‘माधुरी’. या चित्रपटातून सोनाली कोणती भूमिका साकारणार आहे,कथा काय आहे हे लवकरच प्रेक्षकांना कळेल. मुंबापुरी प्रॉडक्शन निर्मित ‘माधुरी’ या चित्रपटातसोनालीसह शरद केळकर आणि संहिता जोशी यांची देखील प्रमुख भूमिका आहे. याचित्रपटाचे निर्माते मोहसिन अख्तर यांनी एक सुंदर कलाकृती प्रेक्षकांसाठी आणली आहे जीनोव्हेंबर महिन्यात प्रेक्षकांना पाहायला मिळेल. पण नुकतेच, या चित्रपटाच्या पहिल्या-वहिल्यागाण्याचा टीझर सोशल मिडीयावर प्रदर्शित करण्यात आला आहे.MADHURI - SONALI SOLO POSTER 2.jpg

             ‘के सेरा’ हे या गाण्याचे नाव असून या गाण्यामध्ये सोनाली कुलकर्णीचा रॉंकिग लूकपाहायला मिळणार आहे. ‘के सेरा’ हे गाणं प्रत्येकासाठी खास असेल. अर्थात, हे गाणंप्रत्येकासाठी खास बनवण्यामागे संगीत दिग्दर्शक, गायक-गायिका, गीतकार यांची मेहनत आहे.मराठी मनोरंजन क्षेत्रातील प्रेक्षकांचे आवडते गायक स्वप्निल बांदोडकर, जान्हवी अरोरा आणिमुग्धा क-हाडे या गाण्यासाठी एकत्र आले आणि त्यांच्या सुमधूर, कमाल आवाजाने या गाण्यालारॉंकिंग बनवले. वैभव जोशी यांनी या गाण्याचे बोल लिहिले असून रॉकस्टार अवधूत गुप्ते यांनी या गाण्याला संगीत दिले आहे.

        जर गाणं रॉकिंग असेल तर ते गाणं खास जिच्यासाठी बनवलं आहे ती पण रॉकिंग दिसणंतितकंच महत्त्वाचं आहे ना. तर, ‘के सेरा’च्या गाण्यासाठी खास उर्मिला मातोंडकरने सोनालीकुलकर्णीची स्टायलिंग केली आहे. तसेच या गाण्याविषयी बोलताना उर्मिला मातोंडकरनेम्हटले, “जेव्हा मी हे गाणं ऐकलं तेव्हा मला वाटलं की खरं तर हे गाणं प्रत्येक जनरेशनसाठीजणू आयुष्याचं अँथम आहे. वैभवने लिहिलेले शब्द ही सुंदर कविता आहे. अगदी साध्या-सोप्याभाषेत संपूर्ण आयुष्याचे सार आणि आयुष्य कसे जगावे हे सांगितले आहे. अवधूत गुप्तेने तरसंगीत एका नवीन उंचीवर नेऊन ठेवले आहे, प्रत्येकजण या गाण्याशी जोडला जाईल असेसंगीत अवधूतने दिले आहे. या दोघांनीही यासाठी विशेष काम केले आहे.

        या गाण्यासाठी खूप मेहनत घेतली आहे त्यामुळे हे गाणं नक्की हिट होणार असा विश्वासचित्रपटाचे निर्माते मोहसिन अख्तर यांनी दाखविला आहे. मोहसिन अख्तर निर्मित ‘माधुरी’ हाचित्रपट येत्या ३० नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होत आहे.

Song Link-

https://www.youtube.com/watch?v=f2lyhGg-L40

‘आणि…डॉ.काशिनाथ घाणेकर’ मधील सोनाली कुलकर्णीने साकारलेली सुलोचना दीदी

ज्यांचे व्यक्तिमत्व म्हणजे वात्सल्य आणि सोज्वळता ह्यांचा सुरेख संगम.
फुला सारखी कोमल असलेली, वेळप्रसंगी वज्राहूनही कठोर होणारी वास्तवातील आई.
हिंदी-मराठी चित्रपट प्रेक्षकांच्या मनात आदराचे अढळ स्थान मिळवलेल्या महाराष्ट्राच्या लाडक्या… सुलोचना दीदी!
‘आणि…डॉ.काशिनाथ घाणेकर’ मधील सुलोचना दीदी साकारलीय सोनाली कुलकर्णी हिने

Create a website or blog at WordPress.com

Up ↑