मृणाल व सुमीतचे एकत्र ‘स्वीट होम’…! 

– राज चिंचणकर

  अभिनेत्री मृणाल कुलकर्णी आणि अभिनेता सुमीत राघवन या आघाडीच्या कलावंतांनी अनेक भूमिकांमध्ये स्वतःचा ठसा उमटवला आहे. पण असे असले, तरी या दोघांनी कधीच एकत्र काम केलेले नाही. मात्र आता तसे चित्र लवकरच पडद्यावर पाहायला मिळणार आहे. ‘होम स्वीट होम’ या चित्रपटाच्या निमित्ताने हे दोन कलावंत या ‘स्वीट होम’मध्ये एकत्र ‘इनिंग’ खेळताना दिसणार आहेत.

२८ सप्टेंबर रोजी प्रदर्शित होत असलेल्या या चित्रपटाचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे अभिनेता हृषिकेश जोशी याचे या निमित्ताने चित्रपट दिग्दर्शनात होत असलेले पदार्पण!

sumeet mrinalत्याच्या दिग्दर्शनाखाली  यात मृणाल व सुमीतसह अनेक नावाजलेले कलावंत झळकणार आहेत. मोहन जोशी, स्पृहा जोशी, हृषिकेश जोशी, विभावरी देशपांडे, क्षिती जोग, प्रसाद ओक आदी कलाकार तर या चित्रपटात आहेतच; परंतु काळाच्या पडद्यावरून अचानक एक्झिट घेतलेल्या ज्येष्ठ अभिनेत्री रीमा यांचीही या चित्रपटात महत्त्वाची भूमिका आहे. साहजिकच, या ‘स्वीट होम’मध्ये नक्की काय दडलेले आहे, याची उत्सुकता रसिकांना लागून राहिली आहे.

‘होम स्वीट होम’ चा ट्रेलर आणि म्युझिक लाँच सोहळा संपन्न!!

घर ही प्रत्येकाच्या आयुष्यातील मोहक आणि आपलीशी संकल्पना आहे. घराचा आणि त्याच्याशी निगडीत नातेसंबंधांचा प्रवास अतिशय अनोख्या पद्धतीने विषद करणाऱ्या ‘होम स्वीट होम’ या मराठी चित्रपटाचा नुकताच ट्रेलर आणि म्युझिक लाँच सोहळा नुकताच मोठ्या उत्साहात सर्व कलाकारांच्या उपस्थितीत मुंबईत पार पडला. ‘होम स्वीट होम’ या चित्रपटातून लेखक अभिनेता अशी ओळख असलेले हृषीकेश जोशी दिग्दर्शनात पदार्पण करत आहेत.

घर हे केवळ चार भिंती आणि दोन खिडक्यांपर्यंत मर्यादित न राहता कुटुंबाचे सदस्य बनण्याची क्षमता असणारी वास्तू आहे, असे या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये वैभव जोशी यांची कविता सांगून जाते. तसेच रीमा आणि मोहन जोशी या दांपत्यामधील निखळ आणि विनोदीकिस्से मनाला भावतात. शहराच्या मध्यवर्ती भागात असललेल्या घराच्या विक्रीतून मोठी रक्कम मिळेल हे कळताच रीमा यांची उतारवयात सर्वसुखसुविधायुक्त अशा उच्चभ्रू इमारतीतील घर घेण्याची इच्छा होते; पण घराविषयी जिव्हाळा बाळगणारे मोहन जोशी घर विकण्यास कदाचित तयार नाहीत. स्पृहा जोशी साकारात असलेली अवखळ देवीका आणि हृषिकेश जोशी यांचा साधा, मध्यमवर्गीय सोपान सुद्धा मनाला भावणारा आहे. येतो. शिवाय विभावरी देशपांडे, प्रसाद ओक, सुमित राघवन आणि मृणाल कुलकर्णी यांची झलक दिसते, यामुळे प्रेक्षकांच्या मनात उत्सुकता निर्माण होते.

‘होम स्वीट होम’ ची कथा हृषीकेश जोशी, वैभव जोशी, मुग्धा गोडबोले यांची आहे.

घराविषयीची प्रत्येकाची व्याख्या वेगळी असली तरी घर हे प्रत्येकाला हवं असतं आणि सर्वांचं आपलं घर हे ‘होम स्वीट होम’ असतं, असं सांगणारा ‘होम स्वीट होम’ येत्या २८ सप्टेंबर रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.

 

 

Door Poster_Rev2_For Digital

‘होम स्वीट होम’ चा टीझर रिलीज

‘होम स्वीट होम’ Door Poster_Rev2_For Digitalया मराठी चित्रपटाचा हृदयस्पर्शी टीजर नुकताच सोशल मिडीयावर प्रदर्शित करण्यात आला. यामध्ये ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी आणि रीमा यांची अफलातून केमीस्ट्री बघायला मिळते.

‘होम स्वीट होम’ या चित्रपटाच्या टीजरमध्ये रीमा आणि मोहन जोशी यांच्या नात्याचा गोडवा विषद केला आहे,सोबतीला सुप्रसिद्ध कवी, गीतकार वैभव जोशी यांची‘नात्याचे रुटीन चेकअप’ सांगणारी त्यांच्याच आवाजातील सुंदर कविता आहे. नात्यात संवादाचे प्रेशर जपणे असेल, खाण्यासंबंधीचे पथ्य असेल, अथवा दाम्पत्यातील खट्याळपणा असेल, अशा सर्वच बाबी टीजर मध्ये कवितेच्या रूपाने सादर केल्या आहेत. ३५ वर्षे एकाच घरात वास्तव्य केलेल्या दाम्पत्याच्या मनात घराविषयी असणारे स्थान टीझरमध्ये उल्लेखिले आहे. टीझरच्या शेवटी प्रसाद ओक, विभावरी देशपांडे आणि हृषीकेश जोशी दारातून डोकावताना दिसतात. या अत्यंत हृदयस्पर्शी टीजर मधून ‘होम स्वीट होम’ बद्दल प्रेक्षकांच्या मनात उत्कंठा निर्माण झाली आहे.

अभिनेता, लेखक हृषीकेश जोशी ‘होम स्वीट होम’ मधून दिग्दर्शक म्हणून पदार्पण करत आहे, या चित्रपटात दिवंगत अभिनेत्री रीमा तसेच मोहन जोशी, हृषीकेश जोशी, स्पृहा जोशी, प्रसाद ओक, विभावरी देशपांडे यांच्या प्रमुख भूमिका आहेत. ‘होम स्वीट होम’ ची कथा हृषीकेश जोशी, वैभव जोशी, मुग्धा गोडबोले यांची आहे. आयुष्यात आपल्या घराचं स्थान काय असतं हे विषद करताना जीवनातील अनेक पैलूंवर प्रकाश टाकणारा अत्यंत हटके असा ‘होम स्वीट होम’ येत्या २८ सप्टेंबर रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.

 

https://www.youtube.com/watch?v=ve30L5svSbM

पुन्हा घडणार अभिनेत्री रिमा यांची भेट

दर्जेदार अभिनयाच्या जोरावर भारतीय सिनेसृष्टीत लौकिक प्राप्त करणाऱ्या अभिनेत्री म्हणजे रिमा. सौंदर्य आणि अभिनय कौशल्याच्या बळावर त्यांनी अल्पावधीतच सर्वांना आपली दखल घेण्यास भाग पाडले. मराठी – हिंदी नाटक, चित्रपट, मालिका अशा सर्वच माध्यमात त्यांनी आपल्या अभिनयाचा अमिट ठसा उमटविला. त्यांनी साकारलेल्या अनेक भूमिका गाजल्या. गेल्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्यामुळे त्या आपल्या मधून निघून गेल्या तरी त्यांच्या कलाकृती अजरामर आहेत. रिमा पुन्हा एकदा चाहत्यांच्या भेटीला येत आहेत ‘होम स्वीट होम’ या चित्रपटातून, या चित्रपटाचे दिग्दर्शन लेखक, अभिनेते हृषीकेश जोशी यांनी केले आहे.

हृषीकेश जोशी दिग्दर्शनात पदार्पण करत असलेल्या या ‘होम स्वीट होम’ या चित्रपटात रिमा यांनी एका गृहिणीची भूमिका साकारली आहे. रिमा यांच्यासह मोहन जोशी, स्पृहा जोशी, हृषीकेश जोशी, विभावरी देशपांडे यांच्या प्रमुख भूमिका ‘होम स्वीट होम’ मध्ये आहेत.Home sweet home FB cover

‘होम स्वीट होम’ ची कथा हृषीकेश जोशी, वैभव जोशी, मुग्धा गोडबोले यांची आहे, संगीतकार नरेंद्र भिडे, संतोष मुळेकर यांनी कवी, गीतकार वैभव जोशी यांच्या गीतांना स्वरबद्ध केले आहे. हेमंत रुपरेल आणि रणजीत ठाकूर हे चित्रपटाचे निर्माते तर नितीन प्रकाश वैद्य कार्यकारी निर्माते असून आकाश पेंढारकर, विनोद सातव, सचिन नारकर आणि विकास पवार हे प्रस्तुतकर्ते आहेत. नात्यांच्या रिडेव्हलपमेंटवर भाष्य करणारा ‘होम स्वीट होम’ येत्या २८ सप्टेंबर रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.

Create a website or blog at WordPress.com

Up ↑